व्हेज पुलाव, पुरी, जिलेबी, नवी मुंबईत 10 हजार मनसैनिकांसाठी जेवणाची भव्य व्यवस्था

मोर्चासाठी हजारो मनसे कार्यकर्ते आज मुंबईत दाखल झाले होते. या मोर्चाला आलेल्या कार्यकर्त्यांसाठी कळंबोली शहर अध्यक्ष राहुल चव्हाण यांच्याकडून दहा हजार कार्यकर्त्यांच्या जेवणाची भव्य व्यवस्था करण्यात आली (Food arrangement for MNS activist).

व्हेज पुलाव, पुरी, जिलेबी, नवी मुंबईत 10 हजार मनसैनिकांसाठी जेवणाची भव्य व्यवस्था

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (9 फेब्रुवारी) बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मुंबईत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी हजारो मनसे कार्यकर्ते आज मुंबईत दाखल झाले होते. या मोर्चाला आलेल्या कार्यकर्त्यांसाठी कळंबोली शहर अध्यक्ष राहुल चव्हाण यांच्याकडून दहा हजार कार्यकर्त्यांच्या जेवणाची भव्य व्यवस्था करण्यात आली. राहुल चव्हाण यांनी कार्यकर्त्यासांठी व्हेज पुलाव, पुरी, जिलेबी, डाळ, भात अशा विविध पक्वानांचा बेत आखला होता. ही सुविधा आज दिवसभर सुरु होती (Food arrangement for MNS activist).

मनसे महामोर्चासाठी पुणे, साताऱ्यासह राज्यभरातून अनेक कार्यकर्ते आले होते. दरम्यान, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या मार्गाने जाणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी मनसेच्या कळंबोली शहराध्यक्षांकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. ही व्यवस्था पुणे-मुंबई एक्सप्रेसवेजवळ असणाऱ्या कळंबोलीतील सुधागड शाळेच्या प्रांगणात करण्यात आली. पुण्याच्या आणि स्थानिक मनसे कार्यकर्त्यांनी या सुविधेचा लाभ घेतला आणि राहुल चव्हाण यांचे आभार मानले.

मनसेने बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात काढलेल्या महामोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण राज्यभरातून हजारोंच्या संख्येने मनसैनिक आज मुंबईत आले. मनसेने हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच मोर्चानिमित्ताने मनसेने जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. मनसेच्या विराट मोर्चामुळे आज मुंबई भगवामय झाली होती. मोर्चासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची जेवणाची व्यवस्थादेखील मनसेकडून करण्यात आली (Food arrangement for MNS activist).

…तर दगडाला दगडाने, तलवारीला तलवारीने उत्तर : राज ठाकरे

दरम्यान, मोर्चानंतर आझाद मैदानात केलेल्या भाषणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घुसखोरांवर निशाणा साधला. “ज्यांनी आज देशभरात मोर्चे काढले त्यांना मी सांगतो. मोर्चाला मोर्चाने उत्तर मिळालं आहे. यापुढे दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल,” असा इशारा राज ठाकरेंनी पाकिस्तानी घुसखोरांना दिला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *