LIVE: भारताच्या पायलटला उद्याच सोडू: इम्रान खान

नवी दिल्ली: भारत पाकिस्तान सीमेवर मोठा तणाव आहे. पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून भारताने 26 फेब्रुवारीला पहाटे 12 विमानं पाक हद्दीत घुसवून, शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर पाकिस्ताननेही दुसऱ्या दिवशी भारतीय हद्दीत विमान घुसवलं, मात्र भारतीय जवानांनी ते विमान पाडलं. सध्या पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे. तर भारतीय सैन्याकडून पाकला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. …

LIVE: भारताच्या पायलटला उद्याच सोडू: इम्रान खान

नवी दिल्ली: भारत पाकिस्तान सीमेवर मोठा तणाव आहे. पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून भारताने 26 फेब्रुवारीला पहाटे 12 विमानं पाक हद्दीत घुसवून, शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर पाकिस्ताननेही दुसऱ्या दिवशी भारतीय हद्दीत विमान घुसवलं, मात्र भारतीय जवानांनी ते विमान पाडलं.

सध्या पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे. तर भारतीय सैन्याकडून पाकला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. भारतानं पाकिस्तानला डोजियर सुपूर्द केलंय, त्यात दहशतवादाबाबत पूर्ण माहिती देण्यात आली आहे, CRPF च्या दलावर हल्ला करणाऱ्या आदिल दारची पूर्ण ऑडियो क्लीपसुद्धा देण्यात आली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी तीनही दलाच्या प्रमुखांची भेट घेतली. दरम्यान, पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय विंग कमांडरच्या सुटकेसाठी भारताने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

LIVE UPDATE

  • भारताच्या तीनही सैन्यदलाची पत्रकार परिषदेची वेळ बदलली, पाच ऐवजी आता सात वाजता पत्रकार परिषद
  • भारताच्या विंग कमांडरची उद्याच सुटका होणार, भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर पाकिस्तान सुटका करणार, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची माहिती
  • नवी दिल्ली –  भारताच्या परराष्ट्र सचिवांची दहा देशांच्या राजदूतांसोबत बैठक, भारत पाक सीमेवरील घडामोडींची माहिती दिली

पाकिस्तानच्या 20 विमानांची घुसखोरी

पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाक सीमेवर गेल्या अनेक दिवसांपासून तणावाचं वातावरण आहे. भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला केल्यानंतर, पाकिस्तान वायूसेनेनेही काल 20 विमानांसह भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केल्याचा दावा भारताने केला. मात्र भारतीय वायूसेनेने त्यांना चोख उत्तर देत पिटाळून लावलं. त्याआधी भारताने  पाकिस्तानचे F16 हे विमान पाडलं होतं.

पाकिस्तानी विमानाचे अवशेष

पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा बुरखा सातत्याने टराटरा फाटत आहे. भारताने आमचं लढाऊ विमान पाडलं नसल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानच्या F16 विमानाचे अवशेष अखेर सापडले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये या विमानाचे अवशेष सापडले. या विमानाला भारतीय वायूसेनेच्या मिग 21 विमानाने हवेतच टिपलं होतं.

LIVE आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, तीनही दलाची एकत्र पत्रकार परिषद  

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी भारताने चहूबाजूने प्रयत्न सुरु केले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय संरक्षण यंत्रणांची महत्त्वाच्या बैठकांचं सत्र सुरु आहे. आज संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे देशाच्या तीनही दलाचे प्रमुख लष्कर अर्थात भूदल, नौदल आणि वायूदलाच्या प्रमुख अधिकारी पत्रकार परिषद घेणार आहेत. आज संध्याकाळी पाच वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे.

संबंधित बातम्या

युद्ध हवं की नको, राज ठाकरेंकडून मोदींना मोठा पर्याय

LIVE आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, तीनही दलाची एकत्र पत्रकार परिषद

घ्या पुरावा! भारताने पाडलेल्या पाक विमानाचे अवशेष सापडले

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *