शरद पवारांचा सर्वात मोठा दावा, मविआ 35 तर महायुती फक्त 13 जागा जिंकणार?

महाराष्ट्रात मतदानाचे आणखी 2 टप्पे बाकी आहेत. त्याआधीच शरद पवारांनी नेमक्या किती जागा मिळू शकतात, यावरुन भाकीत केलंय. महाराष्ट्रात महाविकास आघाडी 30-35 जागांवर जिंकू शकते, असं शरद पवारांनी म्हटलंय.

शरद पवारांचा सर्वात मोठा दावा, मविआ 35 तर महायुती फक्त 13 जागा जिंकणार?
शरद पवार
Follow us
| Updated on: May 09, 2024 | 10:00 PM

शरद पवारांनी लोकसभेतला महाविकास आघाडीचा आकडाच सांगितला. आम्हाला 30-35 जागा मिळणार, असा दावा शरद पवारांनी केलाय. म्हणजेच शरद पवारांच्या दाव्याप्रमाणं भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या महायुतीला 13-18 जागा मिळतील. तर काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि त्यांच्याच राष्ट्रवादीला 30-35 जागा मिळतील अशी आशा शरद पवारांना आहे. 30-35 जागांचा दावा करुन, पवारांनी भाजपच्या गोटात चिंता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 2019च्या लोकसभेचा विचार केला तर, भाजपचे 23 खासदार जिंकले होते. युतीत शिवसेनेचे 18 जागा निवडून आले होते. काँग्रेसला 1 जागा, राष्ट्रवादीचे 4 खासदार जिंकले, एमआयएमचा 1 खासदार आणि अमरावतीतून नवनीत राणा अपक्ष निवडून आल्या होत्या. अर्थात अमरावतीत त्यांना राष्ट्रवादीचा पाठींबा होता.

अद्याप महाराष्ट्रात लोकसभेचे 3 टप्पे झाले आहेत. आणखी 2 टप्पे बाकी आहेत. महाराष्ट्राची जनता कोणाच्या बाजूने? याचा फैसला 4 जूनलाच होईल. पण 30-35 चा आकडा सांगताना, पवारांनी मोदींच्या प्रचाराच्या मुद्द्यावर बोट ठेवलंय. पहिल्या 2 टप्प्याच्या मतदानानंतर मोदी अस्वस्थ झाल्यानंच मुस्लीम विरोधी प्रचार करत असल्याचा आरोप पवारांनी केलाय.

काँग्रेस किंवा इंडिया आघाडी सत्तेत आल्यास, ओबीसींचं आरक्षण मुस्लिमांना दिलं जाईल. तसंच सोनं, मंगळसूत्रही मुस्लिमांना वाटून दिलं जाईल, अशी टीका मोदी प्रचार सभेतून करत आहेत. आता ज्या मुस्लीम आरक्षणावरुन वार पलटवार सुरु झालाय. त्या आरक्षणाची स्थितीही पाहुयात.

  • कर्नाटकात मुस्लीमांना 4 टक्के शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण आहे. सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित आहे
  • तामिळनाडू मुस्लीम आणि ख्रिश्चनांना साडे 3 टक्के आरक्षण आहे
  • आंध्र प्रदेशातही मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. कोर्टात प्रकरण सुरु आहे
  • केरळमध्ये मुस्लीमांना 12 टक्के आरक्षण आहे
  • पश्चिम बंगालमध्ये 10 टक्के मुस्लीम आरक्षण आहे
  • गुजरातमध्ये मुस्लिमांच्या 70 जातींचा समावेश ओबीसी आरक्षणात आहे
  • महाराष्ट्रात मुस्लिमांच्या 37 जातींचा ओबीसी आरक्षणात समावेश आहे
  • तसंच मुस्लिमांच्या काही जाती व्हीजे, एनटी ब आणि एनडी ड मध्येही आरक्षण मिळतंय

आंध्र प्रदेशात भाजपचाच मित्र पक्ष मुस्लीम आरक्षणाच्या बाजूने

लोकसभा निवडणुकीचा प्रचार मुस्लीम आरक्षणाच्या बाजूनं झुकलाय. पंतप्रधान मोदी, आक्रमकतेनं मुस्लिम आरक्षणावरुन इंडिया आघाडीवर तुटून पडत आहेत. तर आंध्र प्रदेशात भाजपचाच मित्र पक्ष असलेल्या चंद्राबाबूंच्या टीडीपीनं मुस्लीम आरक्षणाच्या बाजूनं भूमिका घेतलीय. आंध्रात मुस्लिमांना मिळत असलेल्या 4 टक्के आरक्षणाचं संरक्षण करणार, असं चंद्राबाबू म्हणाले आहेत. आंध्र प्रदेशात 23 जिल्ह्यांपैकी 8 जिल्ह्यांमध्ये मुस्लिम फॅक्टर फार महत्वाचा आहे. त्यामुळे भाजपची भूमिका वेगळी असली तरी, चंद्राबाबू मुस्लीम आरक्षणावर ठाम आहेत.

Non Stop LIVE Update
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.
तर खूप जड जाणार,जरांगेंचा मुंडे बंधू भगिनींवर गंभीर आरोप अन दिला इशारा
तर खूप जड जाणार,जरांगेंचा मुंडे बंधू भगिनींवर गंभीर आरोप अन दिला इशारा.
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी.
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.