आमदार मेधा कुलकर्णी भरजरी साडी नेसून धावल्या, लय भारी खो-खो खेळल्या!

पुणे: सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी अनेकांकडे वेळ नाही. व्यायाम किंवा वॉकिंग करणंही वेळेअभावी जमत नसल्याचं सांगितलं जातं. त्यात खेळ तर लांबच. सर्वसामान्य लोकांची अशी जीवनशैली असताना, आमदार-खासदारांनी मैदानी खेळ खेळणं हे उद्घाटनापुरतंच राहिलं आहे. क्रिकेट किंवा फुटबॉल स्पर्धांच्या उद्घाटनाप्रसंगी नेतेमंडळींनी आपलं कौशल्य दाखवल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र खो-खो सारख्या खेळात, ते सुद्धा महिला …

आमदार मेधा कुलकर्णी भरजरी साडी नेसून धावल्या, लय भारी खो-खो खेळल्या!

पुणे: सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी अनेकांकडे वेळ नाही. व्यायाम किंवा वॉकिंग करणंही वेळेअभावी जमत नसल्याचं सांगितलं जातं. त्यात खेळ तर लांबच. सर्वसामान्य लोकांची अशी जीवनशैली असताना, आमदार-खासदारांनी मैदानी खेळ खेळणं हे उद्घाटनापुरतंच राहिलं आहे. क्रिकेट किंवा फुटबॉल स्पर्धांच्या उद्घाटनाप्रसंगी नेतेमंडळींनी आपलं कौशल्य दाखवल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र खो-खो सारख्या खेळात, ते सुद्धा महिला आमदाराने आपलं कौशल्य दाखवल्याने वाहवा होत आहे.

पुण्यातील भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनी स्वत: खो-खो खेळून आनंद लुटला. कोथरुडमधील सीएम चषक स्पर्धेच्या उद्घाटनादरम्यान, मेधा कुलकर्णी यांनी खो खो स्पर्धेचं उद्घाटन केलं. आमदार कुलकर्णी केवळ उद्घाटनावरच थांबल्या नाहीत, तर त्या स्वत:ही मैदानात उतरुन खो खो खेळल्या. आमदार मेधा कुलकर्णी भरजरी साडी नेसून खो खो खेळताना पाहायला मिळाल्या. धावताना थोड्या अडखळल्या पण त्यांनी चपळाईने समोरच्या स्पर्धकाला बाद केलं.

मेधा कुलकर्णी यांनी खेळाच्या एका भागाचा व्हिडीओ स्वत: ट्विट केला आहे.

राजकारणाऱ्यांनी खेळ खेळणं हे  दुरापस्तच झालं आहे. मात्र भाजपा आमदार मेधा कुलकर्णी यांनी खो-खो खेळाचा थोडावेळ का असेना पण आनंद लुटला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *