नाराजी दूर करण्याचे अनेक मार्ग, माझ्याकडे विचारणा झाली तर पर्याय सांगेन : मनोहर जोशी

"नाराजी दूर करण्याचे अनेक मार्ग आहेत. माझ्याकडे विचारणा झाली तर मी पर्याय सांगेन", असं माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी (Shivsena Senior leader manohar joshi) यांनी सांगितले.

नाराजी दूर करण्याचे अनेक मार्ग, माझ्याकडे विचारणा झाली तर पर्याय सांगेन : मनोहर जोशी
Follow us
| Updated on: Jan 06, 2020 | 7:23 PM

मुंबई : “नाराजी दूर करण्याचे अनेक मार्ग आहेत. माझ्याकडे विचारणा झाली तर मी पर्याय सांगेन”, असं माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी (Shivsena Senior leader manohar joshi) यांनी सांगितले. महाविकासआघाडी सरकारचं मंत्रिमंडळ विस्तार झाल्यापासून तिन्ही पक्षातील काही नेत्यांमध्ये नाराजी नाट्य सुरु आहे. यावर जोशींनी माझ्याकडे (Shivsena Senior leader manohar joshi) अनेक मार्ग असल्याचे म्हटले.

“महाविकासआघाडीचं सरकार बनलं याचा मला आनंद आहे. सध्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. नाराजी दूर करण्याचे अनेक मार्ग आहेत. माझ्याकडे विचारणा झाली तर मी पर्याय सांगेन”, असं मनोहर जोशी यांनी सांगितले.

“जो काम करतो त्याला फळाची अपेक्षा असते. जे नाराज आहेत त्यांना सुद्धा वेगळ्या जागा देऊन त्यांचं समाधान करावं”, असा सल्लाही मनोहर जोशींनी दिला.

जोशी म्हणाले, “पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे या क्षेत्रात पहिल्यांदा आले असले तरी मंत्री म्हणून सुद्धा योग्य काम करतील. शरद पवारांचं व्यक्तिमत्त्व राष्ट्रपती पदासाठी योग्य आहे. शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील”, असं जोशींनी सांगितले.

“जेएनयू विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला चुकीचा आहे. पण एकमेकांवर हत्यार उपसण्याऐवजी जे शत्रू आहेत त्यांच्यावर हत्यार उपसा. यामध्ये सर्व राजकारण केलं जातं आहे. संघटनाचा वापर राजकारणासाठी केला जात आहे”, असा आरोपही जोशींनी केला.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.