‘अॅमेझॉन’च्या वापरकर्त्यांची माहिती लीक, कंपनीकडून दिलगिरी व्यक्त

मुंबई : ‘अॅमेझॉन’ या ई-कॉमर्स वेबसाईटवरील काही ग्राहकांची माहिती लीक झाली आहे. कंपनीने तांत्रिक कारण देत दिलगिरी व्यक्त केली. पण यामुळे ऑनलाईन बाजार पूर्णपणे सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. अमेझॉनवर कोणत्याही वस्तूची खरेदी करण्यासाठी ग्राहकाला स्वत:चा ई-मेल आयडी द्यावा लागतो. या आयडीच्या आधारे अॅमेझॉनचा स्वतंत्र आयडी तयार होतो. पण कंपनीच्या चुकीमुळे अॅमेझॉनच्या जगभरातील काही …

, ‘अॅमेझॉन’च्या वापरकर्त्यांची माहिती लीक, कंपनीकडून दिलगिरी व्यक्त

मुंबई : ‘अॅमेझॉन’ या ई-कॉमर्स वेबसाईटवरील काही ग्राहकांची माहिती लीक झाली आहे. कंपनीने तांत्रिक कारण देत दिलगिरी व्यक्त केली. पण यामुळे ऑनलाईन बाजार पूर्णपणे सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

अमेझॉनवर कोणत्याही वस्तूची खरेदी करण्यासाठी ग्राहकाला स्वत:चा ई-मेल आयडी द्यावा लागतो. या आयडीच्या आधारे अॅमेझॉनचा स्वतंत्र आयडी तयार होतो. पण कंपनीच्या चुकीमुळे अॅमेझॉनच्या जगभरातील काही ग्राहकांचा हा ई-मेल आयडी व अॅमेझॉन आयडी लीक झाला आहे. याची चोरी झाली असण्याची शक्यता आहे.

यासंबंधीचा एक ई-मेल अॅमेझॉनने ग्राहकांना पाठवला.

“काही तांत्रिक त्रुटींमुळे आमच्या वेबसाइटवरून आपले नाव आणि ई-मेल आयडी लीक झाली होती. आता समस्या सोडविण्यात आली आहे”.

“ज्या ग्राहकांचे आयडी लीक झाले आहेत त्यांचे अॅमेझॉन खाते सुरक्षित आहे, नव्याने पासवर्ड तयार करण्याची गरज नाही”, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

तरी यात किती लोकांची माहिती लीक झाली यासंबंधी कुठलीही माहिती अॅमेझॉनने दिलेली नाही.


आधी फेसबुक आणि आता अॅमेझॉनवरून ग्राहकांची खासगी माहिती लीक झाली. त्यामुळे या ऑनलाईन व्यवहार हे खरंच सुरक्षित आहेत की नाही अशा संभ्रमात सध्या जहभरातील ई-कॉमर्स वेबसाईट कस्टमर आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *