यूनियन बँकेचं ‘टू इन वन’, आता डेबिट-क्रेडिट कार्ड एकत्र

मुंबई : आता तुम्हाला वेग-वेगळे डेबिट आणि क्रेडिट कार्डसोबत घेऊन फिरायची गरज नाही. भारतातील सगळ्यात मोठी सरकारी बँक असलेल्या यूनियन बँकेने असे कार्ड लाँच केले आहे की, एकाच कार्डमध्ये आता डेबिट आणि क्रेडिट अशा दोन्ही कार्डचा वापर करता येणार आहे. यूनियन बँकेचे 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बँकेतर्फे या टू इन वन कार्डची सुविधा देण्यात …

यूनियन बँकेचं ‘टू इन वन’, आता डेबिट-क्रेडिट कार्ड एकत्र

मुंबई : आता तुम्हाला वेग-वेगळे डेबिट आणि क्रेडिट कार्डसोबत घेऊन फिरायची गरज नाही. भारतातील सगळ्यात मोठी सरकारी बँक असलेल्या यूनियन बँकेने असे कार्ड लाँच केले आहे की, एकाच कार्डमध्ये आता डेबिट आणि क्रेडिट अशा दोन्ही कार्डचा वापर करता येणार आहे. यूनियन बँकेचे 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बँकेतर्फे या टू इन वन कार्डची सुविधा देण्यात आली आहे.

काय आहे कार्डचं वैशिष्ट?

या कार्डचे वैशिष्ट असे आही की, हे डेबिट कार्ड ‘रुपे’ या प्लॅटफॉर्मचा उपयोग करतं. तसेच या कार्डसोबत बँक ग्राहकांना 24 लाखांचा अपघाती विमा मोफत देत आहे आणि यासाठी बँकेकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. डेबिट कार्डची मर्यादा 1 लाख रुपये आहे आणि क्रेडिट कार्डची मर्यादा बँकेनुसार ठरवली जाणार आहे.

कसा कराल वापर?

रुपे प्लॅटिनम डेबिट कार्ड आणि रुपे सेलेक्ट क्रेडिट कार्डसाठी ग्राहकांना दोन वेगवेगळे पीन जनरेट करावे लागणार आहेत. जो नंबर तुमच्या बँक खात्यासोबत जोडला आहे, त्याच फोन नंबरवरुन पीन जनरेट केला जाऊ शकतो. जेव्हा तुम्ही दोन्हींचे पीन जनरेट केल्यानंतर खरेदी दरम्यान कार्डचा वापर करणार, तेव्हा पीनच्या सहाय्याने डेबिट किंवा क्रेडिट कार्डने तुम्ही बील भरु शकता.

या कार्डमुळे एक फायदा आहे की, तुम्हाला आता दोन कार्ड घेऊन फिरण्याची गरज नाही. एकाच कार्डमध्ये आता दोन कार्डची सुविधा बँकेकडून देण्यात आली आहे. तसेच, डेबिट कार्डमधून एक लाख रुपये काढू शकता, अशी जास्त पैसे काढण्याची मर्यादाही देण्यात आली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *