Union Budget Live : अर्थसंकल्प 2020 : शेती ते बाजार, बँक ते व्यापार, अर्थसंकल्प जसाच्या तसा!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Union Budget Nirmala Sitharaman Live) यांनी वर्ष 2020-21 साठीचा अर्थसंकल्प सादर केला.

Union Budget Live : अर्थसंकल्प 2020 : शेती ते बाजार, बँक ते व्यापार, अर्थसंकल्प जसाच्या तसा!
Follow us
| Updated on: Feb 01, 2020 | 5:48 PM

Union Budget Nirmala Sitharaman Live नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Union Budget Nirmala Sitharaman Live) यांनी वर्ष 2020-21 साठीचा अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात कररचना अर्थात टॅक्सस्लॅबमध्ये बदल करण्यात आले आहेत. पूर्वी 3 टॅक्सस्लॅब होते, त्यामध्ये फोड करुन आता 6 टॅक्सस्लॅब करण्यात आले आहेत. याशिवाय यंदा शिक्षण, कृषी, आरोग्य यासारख्या योजनांवर भर देण्यात आला आहे.

नव्या टॅक्सस्लॅबनुसार जर तुमचं उत्पन्न 5 लाखाच्या आत असेल तर तुम्हाला एक रुपयाही टॅक्स भरावा लागणार  नाही. मात्र जर तुमचं उत्पन्न 5 लाखांच्या वर असेल, तर तुमचं करपात्र उत्पन्न हे अडीच लाखापासून मोजलं जाईल. म्हणजे अडीच ते 5 लाख रुपयांसाठी 5 टक्के,  5 ते 7 लाख 50 हजारांसाठी 10 टक्के याप्रमाणे कर आकारला जाईल.

Union Budget Live अर्थसंकल्प लाईव्ह

बँक

  • सर्व शेड्यूल व्यावसायिक बँकांवर देखरेख करण्यासाठी मजबूत यंत्रणा कार्यरत आहे आणि ठेवीदारांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत,
  • डिपॉझिट विमा 1 लाख रुपयांवरुन 5 लाखांवर नेला. आतापर्यंत 1 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना विमा कवच होतं, आता 5 लाखपर्यंत्च्या ठेवींवर असेल
  • IDBI बँकेतील सरकारी भागीदारी विकणार
  • PSU बँकांतील जागा लवकरच भरणार
  • सरकारी बँकांना बाजारातून भांडवल जमवण्यास मंजुरी
  • सहकारी बँकांना आणखी अधिकार देणार
  • MSME कर्ज पुनर्गठण योजना 1 वर्ष आणखी वाढवणार

प्रदूषण मुक्तीसाठी मोठं पाऊल

  • मोठ्या शहरातील स्वच्छ हवेसाठी 4400 कोटी
  • अतिरिक्त प्रदूषण करणारे औष्णिक विद्युत केंद्र बंद करणार

महिलांसाठी

  • महिलांशी निगडित विशेष उपक्रमांसाठी 28600 कोटींची तरतूद
  • बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेला प्रोत्साहन देणार
  • 10 कोटी कुटुंबाला पोषण मूल्यांची माहिती देणार
  • 6 लाखपेक्षा जास्त अंगणवाडीसेविकांना स्मार्टफोन देणार
  • महिलांच्या लग्नाचं वय वाढवलं होतं, आता आमचं सरकार मुलींना माता बनण्याचं किमान वयोमर्यादेवर विचार करेल. एक टास्क फोर्स तयार करुन 6 महिन्यात त्याबाबतचा अहवाल सोपवेल.

रेल्वे, हवाई आणि जल वाहतूक

  • मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती देणार
  • वाहतूक व्यवस्था बळकटीसाठी मॉडर्न रेल्वे स्टेशन, विमानतळ, बसस्थानके, लॉजिस्टिक सेंटर उभारणार
  • इंफ्रास्ट्रक्चर कंपन्यांच्या स्टार्टअपमध्ये तरुणांना संधी देण्याचं आवाहन
  • दिल्ली-मुंबई 6 हजार किमीचा एक्स्प्रेस वे लवकरच पूर्ण करणार
  • दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे 2023 पर्यंत पूर्ण करणार
  • 2024 पर्यंत देशात नवे 100 विमानतळं उभारणार
  • 24 हजार किमी रेल्वेचं इलेक्ट्रानिक जाळं उभारणार
  • तेजस सारख्या ट्रेनची संख्या वाढवणार
  • जलवाहतुकीला चालना देणार, हा मार्ग आसामपर्यंत वाढवणार
  • वाहतूक क्षेत्रात 1.70 लाख कोटी गुंतवणूक करणार

देशाला मॅन्युफॅक्चर हब बनवणार

  • गुंतवणूक सुलभीकरणावर भर
  • गुंतवणूक कक्षाची स्थापना
  • इलेक्ट्रॉनिक उत्पादन उद्योगासाठी नवीन योजना
  • मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मितीला प्रोत्साहन देणार
  • प्रत्येक जिल्ह्यात एक्स्पोर्ट हब तयार करण्यासाठी योजना
  • निर्विक योजने अंतर्गत कर्जवाटप
  • पुढील पाच वर्षांत 100 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष्य
  • 5 नवीन स्मार्ट शहरे तयार करणार

रेल्वे

  • तेजस एक्स्प्रेससारख्या आणखी काही ट्रेन पर्यटनस्थळांना जोडतील
  • 24 हजार किमी रेल्वेचं इलेक्ट्रानिक जाळं उभारणार
  • तेजस सारख्या ट्रेनची संख्या वाढवणार
  • मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती देणार
  • वाहतूक व्यवस्था बळकटीसाठी मॉडर्न रेल्वे स्टेशन, विमानतळ, बसस्थानके, लॉजिस्टिक सेंटर उभारणार

आरोग्य

  • आरोग्य क्षेत्रासाठी 69 हजार कोटी, ‘फिट इंडिया’ला प्रोत्साहन देणार,
  • ‘आयुष्मान भारत’ अंतर्गत रुग्णालयांची संख्या वाढवणार,
  • 2025 पर्यंत देश टीबीमुक्त करण्याचं लक्ष्य

शिक्षण

  • 2020-21 मध्ये शिक्षण क्षेत्रासाठी 99 हजार 300 कोटी रुपये आणि कौशल्य विकासासाठी 3000 कोटी रुपयांची तरतूद
  • प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज
  • प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज, ऑनलाईन डिग्री कार्यक्रम सुरु करणार
  • लवकरच नवं शिक्षण धोरण जाहीर करणार
  • जिल्हा रुग्णालयात आता मेडिकल कॉलेज बनवणार
  • तरुण इंजिनिअर्सना इंटर्नशिपची सुविधा
  • जगभरातील तरुणांना भारतात शिक्षणासाठी सुविधा देणार
  • भारतीय तरुणांनाही परदेशी शिक्षण सुलभ करणार
  • राष्ट्रीय पोलीस विद्यापीठ, राष्ट्रीय कायदे विज्ञान विद्यापीठाचा प्रस्ताव
  • डॉक्टरांसाठी नवं धोरण ठरवणार, प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना व्यावसायिक शिक्षणाबाबत शिकवणार

कोणत्या योजनेसाठी किती कोटी?

  • स्वच्छ भारत योजनेसाठी 12 हजार 300 कोटी
  • शिक्षण क्षेत्रासाठी 99 हजार 300 कोटी
  • कौशल्य विकासासाठी 3000 कोटी
  • आरोग्य क्षेत्रासाठी 69 हजार कोटी
  • वाहतूक पायाभूत सुविधेसाठी 1.70 लाख कोटी
  • ऊर्जा क्षेत्रासाठी 22 हजार कोटी
  • अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी 85 हजार कोटी रुपये,
  • अनुसूचित जमातीसाठी 53 हजार 700 कोटी
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी 9 हजार 500 कोटी
  • ऐतिसाहिसक वास्तू विकास/संरक्षणासाठी 3 हजार कोटी
  • मोठ्या शहरात स्वच्छ हवेसाठी 4400 कोटी
  • पर्यटन विकास 2500 कोटी
  • लडाखसाठी 5958 कोटी
  • भारत जी संमेलन – 100 कोटी

शेती

  • मत्स्यपालनाचा विस्तार करण्यासाठी 500 मत्स्य उत्पादक संस्था तयार करणार, ग्रामीण भागातील युवकांना सागर मित्रांप्रमाणे सक्षम केले जाईल
  • सेंद्रिय शेतीवर भर, 2025 पर्यंत दुग्ध उत्पादन दुप्पट करण्याचे लक्ष्य : अर्थमंत्री निर्मला सीतारमण
  • जलजीवन मिशनसाठी 3.6 लाख कोटींची तरतूद
  • आता विमानातून जाणार कृषी सामान, नाशवंत मालासाठी कृषी उडाण योजना, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मार्गावर योजना सुरु करणार – निर्मला सीतारमण

[svt-event title=”#Budget2020 शेतकऱ्यांसाठी काय? ” date=”01/02/2020,11:49AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

शेती पंपांना सौर उर्जेवर जोडण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. या अंतर्गत 20 लाख शेतकऱ्यांना सौरउर्जा संयंत्र दिलं जाईल. जी राज्ये केंद्र सरकारच्या कायद्यांचं मॉडेल स्वीकारतील त्यांना प्रोत्साहन दिलं जाईल. अन्नदाता उर्जादाता देखील आहे. पंतप्रधान कुसुम योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. पाण्याच्या प्रश्नाशी झुंज देत असलेल्या 100 जिल्ह्यांसाठी व्यापक उपाय योजना केल्या जातील. 2009-14 दरम्यान चलनवाढ 10.5% होती.

  • कृषी आणि संलग्न उपक्रम, सिंचन, ग्रामीण विकास क्षेत्रासाठी 2020-21 वर्षासाठी 2.83 लाख कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले : अर्थमंत्री निर्मला सीतारमण
  • देशभरात शेतकऱ्यांनासाठी शीतगृहांची साखळी तयार केली जाईल. यासाठी भारतीय रेल्वे ‘पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशीप’ (PPP) शेतकरी रेल्वे तयार करेल. त्याचा उपयोग करुन लवकर खराब होणारा माल तात्काळ ने-आण करता येईल. ही ‘कृषी उडाण’ योजना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवरही तयार केली जाईल.
  • शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य, शेतकऱ्यांसाठी 6.11 कोटी विमा योजना
  • प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा उथ्थान महाभियान’ (PM KUSUM) या पुढील काळात 20 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहचेल. या अंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणारे पाण्याचे पंप दिले जातील : अर्थमंत्री निर्मला सीतारमण

शेतकऱ्यांसाठी 16 सूत्रीय फॉर्म्युला 1 – आधुनिक शेतजमीन कायदा राज्य सरकारद्वारे लागू करणे 2 – 100 जिल्ह्यात पाण्यासाठी मोठी योजना आणणार, त्यामुळे शेतीला पाणी उपलब्ध होईल 3 – पंतप्रधान कुसूम योजनेअंतर्गत कृषी पंपांना सौर ऊर्जेशी जोडणार. यामध्ये 20 लाख शेतकऱ्यांचा समावेश असेल, 15 लाख शेतकऱ्यांच्या ग्रीड पंपांना सौर ऊर्जेशी जोडणार

*******

आमचं सरकार 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कटीबद्ध आहे. शेती व्यवसायाला स्पर्धात्मक बनवत शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चित केलं जाईल – सीतारमण

[svt-event title=”GST मुळे ग्राहकांना 1 लाख कोटींचा नफा झाला आणि ‘इन्स्पेक्टर राज’ही संपुष्टात आलं” date=”01/02/2020,11:32AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

जीएसटीमुळे (GST) देश आर्थिक पातळीवर एक झाला. देशातील इंस्पेक्टर राज संपलं आहे. 1 एप्रिल 2020 पासून अगदी साधी-सरळ कर प्रणाली सुरु झाली आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या कार्यक्रमाची गती अधिक पटीने वाढली आहे.

भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. भारतात 2014-19 दरम्यान, 284 अरब डॉलरची थेट परकीय गुंतवणूक आली. 2009-14 ही गुंंतवणूक 190 अरब डॉलर होती

[svt-event title=”बजेटमधील आतापर्यंतचे मुद्दे ” date=”01/02/2020,11:30AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

निर्मला सीतारमण यांनी काश्मिरी भाषेतील श्लोक हिंदीत वाचला, ‘हमारा वतन खिलते हुए शालिमार बाग जैसे, हमारा वतन दाल लेकमें खिलते हुए कमल जैसा, नौजवानों के गरम खून जैसा, मेरा वतन तेरा वतन, दुनिया का सबसे प्यारा वतन

[svt-event title=”परकीय गुंतवणूक वाढली – निर्मला सीतारमण ” date=”01/02/2020,11:23AM” class=”svt-cd-green” ] सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या धोरणावर आमचे सरकार पुढे जात आहे. भारत आज जगातील विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये आघाडीवर आहे. 2014 ते 2019 च्या दरम्यान मोदी सरकारच्या धोरणांमुळे 284 अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक आली ज्यामुळे व्यवसायात वाढ झाली. – निर्मला सीतारमण [/svt-event]

GST दरात घट झाल्याने प्रत्येक कुटुंबाची महिन्याला 4% बचही होणार आहे. GST ला काही अडचणींचाही सामना करावा लागला.

[svt-event title=”क्रयशक्ती वाढवणारा अर्थसंकल्प – निर्मला सीतारमण” date=”01/02/2020,11:19AM” class=”svt-cd-green” ] देशातील नागरिकांकडे रोजगार असणं अत्यावश्यक आहे. त्यामुळेच हा अर्थसंकल्प त्यांचं उत्पन्न निश्चित करणारं आणि त्यांची क्रयशक्ती वाढवणारं असेल. – निर्मला सीतारमण [/svt-event]

[svt-event title=”महागाईवर योग्यप्रकारे नियंत्रण – निर्मला सीतारमण” date=”01/02/2020,11:17AM” class=”svt-cd-green” ] अर्थव्यरवस्थेला मजबूत करण्यात आलं आहे. महागाईवर योग्यप्रकारे नियंत्रण आणले. बँकांच्या कर्जात सुधारणा केली जात आहे. 2014-19 दरम्यान, प्रशासनात आमुलाग्र बदल केले – निर्मला सीतारमण [/svt-event]

[svt-event title=”60 लाख नवे करदाते जोडले – निर्मला सीतारमण ” date=”01/02/2020,11:17AM” class=”svt-cd-green” ] 60 लाख नवे करदाते जोडले, 40 कोटी रिटर्न, 105 ई बिलं तयार झाली. पंतप्रधानांनी गरिबांना थेट फायदा होईल अशा योजना आणल्या – निर्मला सीतारमण [/svt-event]

[svt-event title=”जीएसटीसाठी जेटलींना सलाम” date=”01/02/2020,11:15AM” class=”svt-cd-green” ] जीएसटी लागू करणारे माजी अर्थमंत्री अरुण जेटली आज आपल्यात नाहीत. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करते. देशातील जनतेच्या सेवेसाठी, एक देश-एक टॅक्स योजना सरकारने आणली. जीएसटी उत्पन्न सातत्याने वाढत आहे. 1 लाख कोटीचा आकडा पूर्ण केला आहे. [/svt-event]

[svt-event title=”जनतेचा आमच्या धोरणांवर विश्वास- सीतारमण” date=”01/02/2020,11:11AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

  • लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला बहुमत मिळालं, 2019 मधील निवडणूक निकाल म्हणजे मोदी सरकारच्या धोरणांना मिळालेला जनादेश, जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला. हे बजेट देशाच्या इच्छा-आकांक्षेचं बजेट आहे – निर्मला सीतारमण
  • अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात, नव्या दशकातील पहिलं बजेट
  • थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर होणार

[svt-event title=”अर्थसंकल्पापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण राष्ट्रपतींच्या भेटीला” date=”01/02/2020,9:46AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सेन्सेक्सची घसरणीने सुरुवात, बाजार सुरु होताच निर्देशांक 140 अंकांनी घसरला” date=”01/02/2020,9:35AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

वाढलेली महागाई, मंदीचं आव्हान, रोजगार निर्मिती, ग्रामीण भारत यासारख्या आव्हानांचा सामना मोदी सरकारला करायचा आहे. त्याबाबत बजेटमध्ये काय असणार याची उत्सुकता आहे. कोणत्या वस्तू महागणार आणि कशाचे दर स्वस्त होणार? इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? सीतारमणयांच्या पोतडीतून रेल्वेसाठी काय मिळणार? याकडे सर्वसामान्यांचे डोळे लागले आहेत.

संसदेत काल आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला असून देशाच्या अर्थव्यवस्थेची आकडेवारी समोर आली आहे. देशाचा आर्थिक विकास दर 6 ते 6.5 टक्के राहिल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महिला अर्थमंत्री

1969 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अर्थमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आणि त्या देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री झाल्या. मात्र निर्मला सीतारमन यांना पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री ठरण्याचा मान मिळाला. स्वतंत्र भारताच्या इतिहासात अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत.

टॅक्स स्लॅबमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता

सध्या इन्कम टॅक्समध्ये तीन स्लॅब आहे. यामध्ये 2.5 ते 5 लाख पर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के आयकर लागतो. तर 5-10 लाख उत्पन्नावर 20 टक्के टॅक्स द्यावा लागतो. तर 10 लाखांच्या वर असलेल्या उत्पन्नावर 30 टक्के टॅक्स लावला जातो. येणाऱ्या बजेटमध्ये 10 लाखांच्या उत्पन्नावर मोठी सूट मिळू शकते. दहा लाख उत्पन्न गटातील नोकरदारांसाठी 10 टक्क्यांचा नवा स्लॅब येऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

संबंधित बातम्या 

Budget 2020 : इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता, कुणाला किती फायदा

Budget 2020 : केंद्रीय अर्थसंकल्पाकडे देशाचे डोळे, सीतारमन यांच्या पोतडीतून काय मिळणार?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.