Milind Soman : 60 व्या वर्षीही तरुणांना देतात टक्कर! 60 किलोमीटर अनवाणी धावतात मिलिंद सोमण, रोज फक्त १५ मिनिटं करतात वर्कआउट!

Milind Soman Fitness Routine: वयाच्या 60 व्या वर्षीही अभिनेता मिलिंद सोमण यांचा फिटनेस तरुणांना लाजवणारा आहे. ते रोज केवळ 15 मिनिटे वर्कआउट करतात आणि 60 किलोमीटर अनवाणी धावतात. चला जाणून घेऊया त्यांच्या फिटनेसचं खास रहस्य.

Milind Soman : 60 व्या वर्षीही तरुणांना देतात टक्कर! 60 किलोमीटर अनवाणी धावतात मिलिंद सोमण, रोज फक्त १५ मिनिटं करतात वर्कआउट!
Milind Soman
| Edited By: | Updated on: Oct 16, 2026 | 11:13 AM

वयाच्या ६० व्या वर्षी अनेकांच्या फिटनेसवर आणि शारीरिक क्षमतेवर परिणाम होऊ लागतो. मात्र, अभिनेता मिलिंद सोमण यांच्याकडे पाहिल्यावर वय हा केवळ आकडा वाटतो. सोशल मीडियावर ते अनेकदा व्यायाम करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. विशेष म्हणजे, फिट राहण्यासाठी ते तासन्‌तास जिममध्ये घाम गाळत नाहीत, तर रोजच्या अवघ्या १५ मिनिटांच्या वर्कआउटवर भर देतात. त्याचबरोबर अनवाणी धावणे आणि साधा शाकाहारी आहार ही देखील त्यांच्या जीवनशैलीची वैशिष्ट्ये आहेत. महागडी जिम किंवा कठीण डाएट न करता फिटनेस कसा टिकवून ठेवता येतो हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर जाणून घ्या मिलिंद सोमण यांचा फिटनेस रूटीन.

मिलिंद सोमण यांचा व्यायाम करण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. फिट राहण्यासाठी जिममध्ये तासन्‌तास घालवण्यापेक्षा नैसर्गिक पद्धतीने शरीर सक्रिय ठेवण्यावर भर देत असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले. ते दररोज केवळ १५ मिनिटे वर्कआउट करतात. यात पुश-अप्स, पुल-अप्स आणि प्लँक यांसारख्या प्रकारांचा समावेश असतो. जिममध्ये वर्कआउट करण्याऐवजी ते धावणे, सायकलिंग आणि पोहणे यांसारख्या शारीरिक हालचालींना महत्त्व देतात.

Loading...

अनवाणी धावण्याला प्राधान्य

मिलिंद सोमण यांच्या फिटनेस रूटीनमधील सर्वाधिक चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे अनवाणी धावणे. त्यांना धावण्याची विशेष आवड असून, साधारण ६० ते ७० किलोमीटर धावण्याचाही त्यांच्या रूटीनमध्ये उल्लेख केला जातो. अनवाणी धावण्यामुळे पायांचा जमिनीशी थेट संपर्क येतो. त्यामुळे पायांच्या स्नायूंच्या हालचालींसोबतच शरीराचा तोल राखणे, घोट्यांची हालचाल आणि पायांची संवेदनशीलता यांवरही परिणाम होऊ शकतो. मात्र, अनवाणी धावण्याचा सराव करताना दुखापत होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

आयर्नमॅन आणि अल्टिमेट मॅनचा किताब

मिलिंद सोमण यांनी वयाच्या ५० व्या वर्षी आयर्नमॅन ट्रायथलॉन आणि अल्टिमेटमॅन यांसारखी कठीण आव्हाने पूर्ण केली. या स्पर्धांसाठी उत्तम शारीरिक क्षमता, सहनशक्ती आणि नियमित सराव आवश्यक असतो. याशिवाय, ते फिटनेसशी संबंधित विविध रेसमध्येही सहभागी होत असतात.

साधा आणि शाकाहारी आहार

मिलिंद सोमण यांच्या फिटनेस रूटीनमध्ये आहारालाही महत्त्वाचे स्थान आहे. ते मांसाहार टाळतात आणि साध्या घरगुती जेवणाला प्राधान्य देतात. त्यांच्या आहारात फळे, ड्राय फ्रूट्स, डाळ, भात, पोळी, भाजी आणि कोशिंबीर यांसारख्या पदार्थांचा समावेश असतो. तसेच बाहेरचे पदार्थ आणि फास्ट फूड टाळण्यावर त्यांचा भर असतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us