गॅस, ॲसिडीटी गायब, आठवड्यातून दोनदाच ही भाजी खा, एकदम रामबाण उपाय

Digestion And Constipation Remedies : फास्ट फूड, जंक फूडमुळे अगदी लहान मुलांना सुद्धा गॅस, ॲसिडीटी, पोटदुखीचा त्रास सतावत आहेत. मोठ्या माणसांमध्ये सुद्धा आजच्या जीवनशैलीमुळे ही समस्या दिसते. अशावेळी या वनस्पतीच्या शेंगा आणि हिरवी पानं पोट साफ करण्यासाठी रामबाण उपाय ठरेल. कोणती आहे ही हिरव्या पानाची भाजी?

गॅस, ॲसिडीटी गायब, आठवड्यातून दोनदाच ही भाजी खा, एकदम रामबाण उपाय
पोटफुगी, गॅस, अपचनावर बहुगुणी
| Updated on: Sep 16, 2026 | 2:48 PM

आता पावसाने ओढ दिली आहे. ऑक्टोबर हिटची चाहुल लागली आहे. या काळात दमट वातावरणामुळे जीव कासावीस होतो. आहारात भरपूर पाणी आणि पालेभाज्यांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येतो. सध्या जंक फूड आणि फास्ट फूडमुळे पोटाचा निचरा व्यवस्थित होत नाही. अनेकांना गॅस, अपचन आणि पोट दुखीचा त्रास होतो. अबालवृद्धांना हा त्रास सतत जाणवतो. पण काही झाडं ही बहुगुणी असतात. त्यांची पानं, फुलंच नाही तर शेंगाही औषधी गुणांनी युक्त असतात. आयुर्वेदातही या औषधी वनस्पतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर या वनस्पतीच्या शेंगांचीच नाही तर पानाची पूड करून खाल्यास अनेक आजारांत आराम मिळतो. इतकेच नाही तर हिरव्या पानांची पूड थकवा दूर करण्यासाठी आणि बलवर्धक मानली जातात.

पोटफुगी, गॅस, अपचनावर बहुगुणी

तर ही भाजी तंतुमय, जीवनसत्त्वयुक्त आणि इतर खनिजयुक्त मानली जाते. ती चांगली अँटिऑक्सिडंटही आहे. तुमच्या आहारात आठवड्यातून दोनदा ही भाजी सेवन केल्यास पचनसंस्था सुरळीत काम करेल. पचनाची प्रक्रिया चांगली होईल. गॅस, अपचन आणि पोटदुखीचा त्रास कमी होईल. पोटफुगीचा त्रास कमी होईल. इतकेच नाही तर शरीरातील थकवाही हळूहळू कमी होऊन तुम्हाला शरीरात ऊर्जा असल्याचे जाणवेल. पोटातील दाह, शरीरातील दाह कमी होईल. अनेक जीम ट्रेनर या झाडाची पानं वाळवून तिची बारीक पूड खाण्याचा सल्ला देतात.

शेंगाच्या भाजीने जेवणाला चव

या झाडाच्या शेंगांची भाजी चविष्ठ आणि रूचकर होते. अनेकांनी ही भाजी आवडते. वरणातील आणि काळ्या मसाल्यातील शेंगांची ही भाजी मन तृप्तच करत नाही तर पोटासाठी आणि शरीरासाठीही फायदेशीर ठरते. अनेक हॉटेलमध्ये या भाजीची खासियत असते. या भाजीची हमखास ऑर्डर देण्यात येते. तर काही जण केवळ सूप पितात. तेही शरीराला टॉनिकसारखे गुणकारी ठरते.

ही भाजी कोणती?

तर ही भाजी शेवग्याची आहे. शेवगा ही बहुगुणी वनस्पती आहे. तिच्या शेंगाच नाही तर हिरवी पानं पोटाच्या आजारावरच नाही तर हेल्थ सप्लिमेंट म्हणूनही प्रसिद्ध आहेत. पोटाच्या आजारावर ही वनस्पती फायदेशीर ठरते. शेवग्याच्या शेंगांची भाजी प्रसिद्ध आहे. तर हिरव्या पानं सुकवून, त्याचे वस्त्रगाळ करून पावडर नियमित सेवन केल्यास पोटाच्या आजारावरच नाही तर शारीरिक थकवा आणि इतर आजारांवर रामबाण उपाय ठरतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us