AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tea-Coffee: उपवासाला चहा प्यावा की कॉफी? शरीरासाठी काय फायदेशीर

Tea Coffee Fasting: उपवास असताना अनेक जण शाबुदाण्याची उसळ, दूध, चहा अथवा कॉफी पितात. पण उपवास करताना सतत चहा अथवा कॉफी पिणे शरीरासाठी चांगले आहे का? की त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो?

Tea-Coffee: उपवासाला चहा प्यावा की कॉफी? शरीरासाठी काय फायदेशीर
उपवासाला चहा प्यावा की कॉफी?
| Updated on: Sep 15, 2026 | 3:19 PM
Share

Tea Coffee Fasting: आता सणासुदीच्या काळात अनेक जण उपवास करतात. भारतीय धार्मिक परंपरेत उपवासाला खूप महत्त्व आहे. शरीर शुद्धीसाठी आणि मनावर ताबा मिळवण्यासाठी, देवाचे एकाग्रतेने नामस्मरण करण्यासाठी उपवास करण्यात येतो. पण उपवासाला अनेक जण भूक मारण्यासाठी मग शाबुदाण्याची खिचडी, चहा, कॉफीचा धडाका सुरू करतात. रिकाम्या पोटी चहा अथवा कॉफी पिणे आरोग्यासाठी अपायकारक असते. पण चहा अथवा कॉफी पैकी कोणते सर्वाधिक हानीकारक कोणते पेय?

उपवासाच्या दिवशी चहा प्यावा की नाही?

उपवासाच्या दिवशी अनेक जण दुधाचा चहा पितात. तर काही विना दुधाचा चहा घेतात. हर्बल टी, ग्रीन टी अथवा कमी साखरेचा, दुधाचा चहा करतात. यामुळे शरीराला थोडी ऊर्जा मिळते. ताण कमी होतो. थोडी तरतरी येते. पण रिकाम्या पोटी असा जास्त दुधाचा, साखरेचा चहा पिल्यास अपचन, गॅस, पित्त अथवा छातीत जळजळ होते. किंचित डोके दुखाल्यासारखे वाटू शकते. त्यामुळे अति चहा टाळणे गरजेचे आहे.

कॉफी पिण्याचे फायदे आणि तोटे?

अनेक जण ब्लॅक कॉफी अथवा कमी दुधाची कॉफी पितात. यामुळे अशक्तपणा अथवा आळस तात्काळ पळतो. मेंदू सतर्क होतो. ब्लॅक कॉफी पचनास मदत करते. मेटाबॉलिझम वाढवते. पण रिकाम्या पोटी जास्त कॉफिन शरीरात गेल्यास डिहायड्रेशन आणि हृदयाचे ठोके वाढण्याची शक्यता असते. चहासारखीच उपवासाच्या दिवशी अति कॉफी सुद्धा घातक ठरते.

मग सर्वोत्तम पर्याय काय?

उपवासाच्या दिवशी अतिप्रमाणात चहा अथवा कॉफी दोन्ही घातक ठरते. या दोन्हीपैकी एखादं पेय प्यायचे असेल तर कमी साखर आणि कमी दुधाचा चहा आणि कॉफी फायदेशीर ठरू शकते. दिवसातून एक अथवा दोन कप चहा अथवा कॉफी चांगली ठरू शकते. पण उपवासाच्या दिवशी चहा अथवा कॉफीऐवजी भरपूर पाणी, लिंबू पाणी, नारळाचे पाणी, ताक पिणे अधिक फायदेशीर ठरू शकते.

डिस्क्लेमर: ही विविध स्त्रोतावरून घेतलेली माहिती आहे, टीव्ही 9 मराठी त्याला दुजोरा देत नाही. तुमच्या वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला आवर्जून घ्या.

Follow Us
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे दर्शन
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी...
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पांचे दर्शन, पहा खास व्हिडीओ
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट; भाजपचा पलटवार!
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, ड्रोन...
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, पाहा ड्रोन दृश्य...
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुर
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुरांसाठी 25 हजारांची मागणी
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले...
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले यांचे मोठे विधान
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध...
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध पास असूनही पोलिसांची अडवणूक
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार, मुंबईला रवाना
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन अन् बाप्पाचे दर्शन