447 आरोग्य सेवकांमध्ये लसीचे साईड इफेक्ट; प्रकृती बिघडल्याने तिघे रुग्णालयात

| Updated on: Jan 17, 2021 | 8:40 PM

देशभरात काल शनिवारी लसीकरण करण्यात आलं. यावेळी हजारो आरोग्य सेवकांना कोरोनाची लस देण्यात आली. मात्र, त्यापैकी आतापर्यंत 447 लोकांमध्ये लसीचे साईड इफेक्ट जाणवले. (Corona vaccination: Government says saw 447 cases of adverse effects)

447 आरोग्य सेवकांमध्ये लसीचे साईड इफेक्ट; प्रकृती बिघडल्याने तिघे रुग्णालयात
corona-vaccination
Follow us on

नवी दिल्ली: देशभरात काल शनिवारी लसीकरण करण्यात आलं. यावेळी हजारो आरोग्य सेवकांना कोरोनाची लस देण्यात आली. मात्र, संपूर्ण देशात त्यापैकी आतापर्यंत 447 लोकांमध्ये लसीचे साईड इफेक्ट जाणवले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर वाटल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेच ही माहिती दिली. (Corona vaccination: Government says saw 447 cases of adverse effects)

केंद्रीय आरोग्य विभागाचे अतिरिक्त सचिव मनोहर अगणानी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. देशात शनिवारी 2,24,301 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली. त्यापैकी 447 लोकांना लस टोचल्यानंतर साईड इफेक्ट जाणवला. त्यामुळे त्यांना तात्काल इम्युनिसेशन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं. यापैकी केवळ तिघांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं अगणानी यांनी सांगितलं.

दिल्लीत काल 52 आरोग्य सेवकांना लस टोचल्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागल्याचं समजलं. यात काहींना अॅलर्जीचा त्रास झाला तर काही जणांना थरथरल्यासारखं वाटू लागंल. त्यातील एका आरोग्य सेवकाला एईएफआयमध्ये पाठवण्याची वेळ आली. आज लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी 17,072 लोकांना कोरोनाची लस देण्यता आली आहे. आतापर्यंत देशात 2, 24, 301 लोकांना कोरोनाची लस देणअयात आली आहे.

दिल्लीत 51 जणांना त्रास

दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यानेही शनिवारी कोरोनाची लस टोचल्यानंतर 51 जणांना त्रास झाल्याचं सांगितलं. त्यातील काही जणांना किरकोळ त्रास झाला, तर एकाची प्रकृती चिंताजनक झाली होती. या व्यक्तिला तात्काळ एम्समध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर 51 जणांना थोड्या निरीक्षणानंतर डिस्चार्ज देण्यात आला. सरकारने प्रत्येक केंद्रावर एईएफआय केंद्र तयार केलं आहे. लस टोचल्यानंतर एखाद्या व्यक्तीला त्रास जाणवल्यास त्याला या ठिकाणी ठेवून त्याच्यावर उपचार केले जातात. (Corona vaccination: Government says saw 447 cases of adverse effects)

 

संबंधित बातम्या:

Covaxin लसीचे दुष्परिणाम आढळल्यास भरपाई, भारत बायोटेकची मोठी घोषणा

मोठी बातमी : कोविन ॲपमधील तांत्रिक दोषामुळे कोरोना लसीकरण 2 दिवस बंद

अफवा टाळा, लसीकरणानंतरही ‘दो गज दुरी’ आवश्यक, जाणून घ्या 10 मोठ्या गोष्टी!

(Corona vaccination: Government says saw 447 cases of adverse effects)