AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल, परेलमध्ये साठवणूक, एका दिवसात किती जणांना लस?

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट कडून सुमारे 1,39,500 डोस बृहन्मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाले आहेत (COVID Vaccine reaches Mumbai from Serum Institute)

कोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल, परेलमध्ये साठवणूक, एका दिवसात किती जणांना लस?
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Jan 13, 2021 | 8:03 AM
Share

मुंबई : केंद्र सरकारने भारत आणि सीरमच्या दोन कोरोना लसींना परवानगी दिली आहे. कोरोनाबाबत येत्या 16 जानेवारीपासून देशभरात लसीकरण सुरु केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून देशभरात 13 ठिकाणी लस पाठवण्यात आल्या आहेत. कोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल झाला आहे. महानगरपालिकेच्या विशेष वाहनाने ही लस पुण्याहून मुंबईत आणण्यात आली. मुंबईत कांजूर येथील कोल्ड स्टोरेजमध्ये लस साठवली जाणार होती, मात्र या स्टोरेजचे काम अपूर्ण असल्याने लसीचा साठा परेलमधील एफ साऊथच्या पालिका कार्यालयात ठेवला जाणार असल्याची माहितीही संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट कडून सुमारे 1,39,500 डोस बृहन्मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाले आहेत. एफ/ दक्षिण विभाग कार्यालयातून मुंबईत लसीकरण केंद्रांमध्ये ही लस पोहोचवण्यात येईल. त्यामुळे 16 जानेवारीला लसीकरणाच्या राष्ट्रीय शुभारंभावेळी मुंबईतही लसीकरण सुरू करणे शक्य होणार आहे. (COVID Vaccine reaches Mumbai from Pune Serum Institute)

लसीकरणाची तयारी 

मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. गेल्या दहा महिन्यात कोरोनाविरोधात मुंबईकर लढा देत आहेत. मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे काही प्रमाणात कोरोना आटोक्यात आला आहे. याच दरम्यान केंद्र सरकारने कोरोनावरील भारत आणि सीरम या दोन कंपन्यांच्या लसीला मान्यता दिली आहे. लस लवकरच उपलब्ध होणार असल्याने देशात आणि महाराष्ट्रात कोल्ड स्टोरेज उभारण्यात आले आहेत. मास्टर ट्रेनरला ट्रेनिंग देऊन लसीकरणासाठी कर्मचारी प्रशिक्षित करण्यात आले आहेत.

लसीकरण केंद्रांवर लसीकरणाचा ड्राय रन घेण्यात आला आहे. त्यानंतर लस कधी येणार याची प्रतीक्षा असताना आज देशभरातील दिल्ली, चेन्नई, कोलकाता, गुवाहाटी, शिलाँग, अहमदाबाद, हैदराबाद, विजयवाडा, भुवनेश्वर, पाटणा, बंगळुरु, लखनौ, चंदिगढ अशा 13 ठिकाणी लस पाठवण्यात आली आहे.

पहिली लस परेलमध्ये साठवणार

मुंबईत लस आल्यावर ती साठवून ठेवण्यासाठी कांजूरमार्ग येथे महापालिकेच्या जागेत कोल्ड स्टोरेज उभारण्यात आले आहे. या कोल्ड स्टोरेजमध्ये एका वेळी एक कोटी लसी साठवता येऊ शकतात. तसेच परेल येथे एफ साऊथ येथे दहा लाख लसी साठवता येऊ शकतात. अशी व्यवस्था पालिकेकडून करण्यात आली आहे. देशभरात 13 ठिकाणी लस पाठवण्यात आल्यावर आता उद्या मुंबईत लस येणार आहे. मुंबईमधून सव्वा लाख आरोग्य कर्मचारी आणि इतर फ्रंटलाईन वर्कर अशा दोन लाख जणांची नावे कोविन अॅपवर नोंदवण्यात आली आहेत. या दोन लाख व्यक्तींना लसीचे प्रत्येकी दोन डोस दिले जाणार आहेत. त्या प्रमाणात लस येईल अशी अपेक्षा आहे.

सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट्स, पाहा गुड मॉर्निंग महाराष्ट्र, दररोज सकाळी 7 वा. @TV9Marathi वर

लस मोठ्या प्रमाणात आल्यास ती कांजूरमार्ग येथे कोल्ड स्टोरेजमध्ये साठवली जाईल. मात्र लस कमी प्रमाणात आल्यास परेल एफ साऊथ येथे लस साठवली जाईल. पहिली येणारी लस परेल येथे साठवण्याची तयारी करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

पाच हजार कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग

मुंबई महानगरपालिकेने 275 मास्टर ट्रेनर तयार केले आहेत. त्यांच्या माध्यमातून 2500 कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे ट्रेनिंग देण्यात आले आहे. 5 कर्मचाऱ्यांची एक टीम या प्रमाणे 500 टीम तयार करण्यात आल्या आहेत. लसीकरण मोठ्या प्रमाणात करता यावे म्हणून आणखी 10 हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरु आहे. त्यापैकी 5 हजार कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्यात आले आहे असे काकाणी यांनी सांगितले. (COVID Vaccine reaches Mumbai from Pune Serum Institute)

सभागृह, शाळांमध्येही होणार लसीकरण

मुंबईत लसीकरण करता यावे म्हणून केईएम, नायर, सायन, कूपर, राजावाडी, व्ही. एन. देसाई, भाभा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी रुग्णालयात लसीकरण केले जाणार आहे. बीकेसी येथील कोविड सेंटरमध्येही लसीकरण केले जाणार आहे. पालिकेची रुग्णालये, दवाखाने, आरोग्य केंद्र आदी ठिकाणी पुढील काळात लसीकरण केले जाणार आहे. तसेच मुंबईत मोठ्या प्रमाणात लसीकरण करता यावे यासाठी येत्या काही महिन्यात शाळांमध्ये आणि विभागातील सभागृहे ताब्यात घेतली जाणार असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.

दिवसाला किमान 14 हजार लोकांना लस 

पालिकेच्या केईएम, सायन, नायर, व्ही. एन. देसाई, वांद्रे भाभा, कुर्ला भाभा, राजावाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, बीकेसी कोरोना जंबो सेंटर आदी 9 ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी 72 बूथ असणार आहेत. प्रत्येक बुथवर नर्ससह प्रत्येकी आरोग्य कर्मचारी असणार आहेत. तसेच, प्रत्येक 5 बूथसाठी एक डॉक्टर असणार आहे. या बूथवर एका शिफ्टमध्ये किमान 100 जणांना लस देता येणार आहे. दोन शिफ्टमध्ये आरोग्य कर्मचारी लसीकरण करणार आहेत. एका दिवसाला किमान 14 हजार लोकांना लस देण्याची आपल्या आरोग्य यंत्रणेची क्षमता आहे, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी दिली.

कांजूरच्या कोल्ड स्टोरेजचे काम अपूर्ण 

पालिकेने लस साठवण्यासाठी कांजूरमार्ग येथील आरोग्य केंद्राची निवड मध्यवर्ती लस साठवणूक केंद्रासाठी केली असली तरी या केंद्राचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आता लसीचा साठा हा एफ दक्षिण येथील लस साठवणूक केंद्रात करण्यात येणार आहे, असल्याचे गोमारे यांनी सांगितले.

पंतप्रधान साधणार संवाद 

येत्या 16 जानेवारीला लसीकरणाला सुरुवात होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पालिकेच्या कूपर रुग्णालयातील लाभार्थी आणि लस देणारे डॉक्टर, कर्मचारी यांच्याशी संवाद साधणार आहेत. कोवीन अॅपमध्ये आलेल्या अडचणी यावेळी पंतप्रधान जाणून घेणार आहेत. यासाठी पालिका प्रशासनाला टू वे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सेवा उपलब्ध करुन देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

जगभरात भारतीय कोरोना लसी सर्वाधिक स्वस्त, अफवांवर विश्वास ठेवू नका, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं आवाहन

(COVID Vaccine reaches Mumbai from Pune Serum Institute)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!.

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं.

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं