बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी जिऱ्याचे पाणी की पाण्यासोबत साधं तूप, काय अधिक ठरतं प्रभावी

बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी तसेच पोट स्वच्छ करण्यासाठी जिऱ्याचे पाणी किंवा तूप मिसळलेले कोमट पाणी पिणे, यापैकी कोणता उपाय अधिक प्रभावी ठरेल ते आजच्या लेखात जाणून घेऊयात.

बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी जिऱ्याचे पाणी की पाण्यासोबत साधं तूप, काय अधिक ठरतं प्रभावी
| Edited By: | Updated on: May 30, 2026 | 5:14 PM

बद्धकोष्ठतेचा त्रास होणे म्हणजे आजकाल खूप सामान्य समस्या बनली आहे. त्यामुळे ज्या ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्या लोकांनी औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी सर्वप्रथम आपल्या आहारात सुधारणा केली पाहिजे. कारण खाण्याच्या चुकीच्या सवयी अनेकदा या समस्येचे कारण बनते. सकाळी नियमित शौचास न होणे, तसेच मळमळ आणि पोट फुगणे ही बद्धकोष्ठतेची प्रमुख लक्षणे मानली जातात. चला बद्धकोष्ठता कशी ओळखावी आणि कोणते पदार्थ त्यापासून आराम मिळवण्यासाठी मदत करू शकतात हे आजच्या लेखात जाणून घेऊयात.

जिऱ्याचे पाणी किंवा तुपाचे पाणी

आहार तज्ञांच्यामते, जिऱ्याचे पाणी पचनासाठी खूप चांगले असते, परंतु बद्धकोष्ठता असल्यास त्याचे सेवन करू नये. साजूक तुपाचे पाणी बद्धकोष्ठतेसाठी फायदेशीर आहे कारण ते आतड्यांना ओलसर ठेवण्यास मदत करते. यामुळे सकाळी शौचास जाणे सोपे होते आणि आतडे व्यवस्थित स्वच्छ होते.

डाळिंब किंवा पपई

डाळिंब आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते, परंतु त्यामुळे शौचास घट्टपणा येऊ शकतो आणि पचनक्रिया मंदावते. त्याऐवजी पपई खाणे अधिक फायदेशीर आहे कारण या फळांमुळे शौचास साफ होण्यास मदत होते.

दूध किंवा एरंडेल तेल

बरेच लोकं बद्धकोष्ठतेसाठी दूध पिण्याचा सल्ला देतात पण ते टाळावे. त्याऐवजी तुम्ही झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत अर्धा चमचा एरंडेल तेल घेऊ शकता. यामुळे मोठे आतडे स्वच्छ होतात, ज्यामुळे सकाळी शौचास जाणे सोपे होते.

इसबगोल किंवा सुके आलुबुखारा

तुम्ही अनेकदा ऐकले असेल की इसबगोल पचनासाठी उत्तम आहे, परंतु जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर तुम्ही त्याचे सेवन टाळावे. त्यामुळे तात्पुरता आराम मिळत असला तरी, आतड्यांमध्ये कोरडेपणा येऊन सूज येऊ शकते. त्याऐवजी सुकी आलुबुखारे खाणे अधिक फायदेशीर आहे, कारण ते नैसर्गिक रेचक असून आतड्यांसाठी सौम्य असतात.

बद्धकोष्ठता झाल्यास आहार कसा सांभाळावा?

बद्धकोष्ठता कायम राहिल्यास, तुम्ही तुमच्या आहारात फायबरचे प्रमाण वाढवावे, पण हलके आणि सहज पचणारे पदार्थ खावेत. याव्यतिरिक्त, तुम्ही भरपूर पाणी प्यावे. अनेकदा योग्य प्रमाणात पाणी न प्यायल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते. चहा आणि कॉफीसारखी कॅफीनयुक्त पेये टाळा, तसेच मसालेदार आणि तळलेले पदार्थ खाणे टाळा. यामुळे समस्या आणखी वाढू शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us