Health | मधुमेहाच्या समस्येने त्रस्त आहात? मग डाॅक्टरांनी सांगितलेल्या या खास टिप्स फाॅलो करा आणि निरोगी जीवन जगा!

| Updated on: Jun 16, 2022 | 1:54 PM

वडिल असणे ही पुरूषाच्‍या जीवनातील सर्वात मोठी जबाबदारी आहे. तुम्‍ही मुले व कुटुंबाची काळजी घेण्‍यासाठी जितकी अथक मेहनत घेता तितकेच स्‍वत:साठी वेळ काढणे देखील महत्त्वाचे आहे. तणाव अनेक हार्मोन्‍स रीलीज होण्‍यास कारणीभूत असल्‍याचे निदर्शनास आले आहे, ज्‍यामुळे शर्करेच्‍या पातळ्यांमध्‍ये वाढ होऊ शकते. योगा व चिंतन सारखे मनाला शांती देणारे व्‍यायाम अत्‍यंत महत्त्वाचे आहे, ज्‍यामुळे तणाव कमी होण्‍यास मदत होऊ शकते.

Health | मधुमेहाच्या समस्येने त्रस्त आहात? मग डाॅक्टरांनी सांगितलेल्या या खास टिप्स फाॅलो करा आणि निरोगी जीवन जगा!
Follow us on

मुंबई : मधुमेह हा गंभीर आजार आहे आणि या आजाराचे आजीवन व्‍यवस्‍थापन करणे आवश्‍यक असते. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीन (National Library of Medicine) संशोधनानुसार महिलांच्‍या 1.4.४ टक्‍के तुलनेत पुरूषांमध्‍ये 2.3 टक्‍के मधुमेहाचे प्रमाण सर्वाधिक आहे. नुकतेच करण्‍यात आलेल्‍या संशोधनामधून निदर्शनास येते की, वर्ष 2015 पर्यंत जवळपास एक-तृतीयांश भारतीय लोकांना मुधमेह होण्‍याचा अंदाज आहे. अनुवांशिक, पर्यावरणीय स्थिती, जीवनशैली पद्धती, खाण्‍याच्‍या सवयी आणि लठ्ठपणा असे अनेक घटक मधुमेह होण्‍यास कारणीभूत आहेत. आपले वय वाढत जाते तसे शरीराची रचना आणि इन्‍सुलिन प्रतिकारशक्‍ती बदलत जाते, परिणामत: शारीरिक कार्यांचे नियमन कमी होत जाते आणि लठ्ठपणा व मधुमेह होऊ शकतो. आज असे अनेक वडिल आहेत, जे प्रत्‍येक दिवस मधुमेहासह जगत आहेत.

डॉ. सुनिल बोहरा म्‍हणाले की…

बेंगळुरूमधील हॉसमॅट हॉस्पिटल्‍सच्‍या इंटर्नल मेडिसीन, डायबेटोलॉजी व नॉन-इन्‍वेसिव्‍ह कार्डियोलॉजीचे सीनियर कन्‍सल्‍टण्‍ट डॉ. सुनिल बोहरा म्‍हणाले, ”टाइप 2 मधुमेहाचे व्‍यवस्‍थापन म्‍हणजे जीवनशैली बदल करणे, औषधोपचार घेणे आणि रक्‍तातील शर्करेच्‍या प्रमाणाची तपासणी करणे, या सर्व गोष्‍टींसाठी योग्‍य नियोजनाची गरज असते. तंत्रज्ञान मधुमेह व्‍यवस्‍थापनामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतात, ते उत्तमपणे व्‍यवस्‍थापन करण्‍यामध्‍ये मदत करतात. म्‍हणूनच सर्वोत्तम ठरू शकते असे नियोजन करणे महत्त्वाचे आहे, मग ते त्‍यांचे औषधोपचाराचे वेळापत्रक निर्धारित करायचे असो वा त्‍यांच्‍या स्‍मार्टफोन्‍समध्‍ये रिमांइडर्स लावायचा असो.”पिढीच्‍या भूमिकेमध्‍ये बदल होण्‍यासह मुले पालकांची काळजी घेत आहेत, काही सोपे उपाय आहेत, जे मुलांना त्‍यांच्‍या प्री-डायबेटिक किंवा मधुमेही वडिलांची काळजी घेण्‍यास मदत करू शकतात.

हे सुद्धा वाचा

व्‍यायाम नित्‍यक्रम तयार करा

संशोधनामधून निदर्शनास आले आहे की मधुमेह असलेल्‍या व्‍यक्‍ती लठ्ठ असतात, जे त्‍यांच्‍यामध्‍ये हृदयविकाराचा झटका, स्‍ट्रोक किंवा मूत्रपिंड आजार असे एथेरोस्क्लेरोसिस-संबंधित आजारांचा धोका वाढण्‍यास कारणीभूत ठरते[2]. पोहणे, सायकल चालवणे, जॉगिंग, ऐरोबिक्‍स इत्‍यादी सारख्‍या नियमित शारीरिक व्‍यायाम करण्‍याची खात्री घ्‍या. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्‍याचा सर्वोत्तम मार्ग म्‍हणजे सक्रिय राहणे.

रिफाइन्‍ड साखर टाळा

मद्य पेये, शीतपेये, ज्‍यूस, मिठाई, कँडी यामध्‍ये असलेली साखर उच्‍च रिफाइन्‍ड केलेली असते आणि त्‍यामुळे शरीरातील शर्करेच्‍या प्रमाणामध्‍ये वाढ होते. गोड पदार्थ आवडणा-या व्‍यक्‍तींना अशी उत्‍पादने टाळून त्‍याऐवजी नैसर्गिक साखरेचे सेवन करण्‍याचा सल्‍ला दिला जातो.

नियमितपणे रक्‍तातील शर्करेवर लक्ष ठेवा

मधुमेहाच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी ग्‍लुकोज चाचणी महत्त्वाची आहे. व्‍यस्‍त जीवनशैलींसह शर्करा पातळ्यांची तपासणी करणे अवघड बनले आहे. प्रिक-फ्री फ्रीस्‍टाइल लिब्रे सारखे सतत शर्करेचे देखरेख करणारे डिवाईस दिवसभरात कधीही सुलभ स्‍कॅनसह शर्करा पातळ्यांची तपासणी करण्‍याची सुविधा देतात. शर्करा पातळ्यांवर देखरेख ठेवल्‍याने अनुकूल आहार योजना, व्‍यायाम नित्‍यक्रम व आरोग्‍यदायी जीवनशैली राखण्‍यास मदत होते.

तणावाचे व्‍यवस्‍थापन करा

वडिल असणे ही पुरूषाच्‍या जीवनातील सर्वात मोठी जबाबदारी आहे. तुम्‍ही मुले व कुटुंबाची काळजी घेण्‍यासाठी जितकी अथक मेहनत घेता तितकेच स्‍वत:साठी वेळ काढणे देखील महत्त्वाचे आहे. तणाव अनेक हार्मोन्‍स रीलीज होण्‍यास कारणीभूत असल्‍याचे निदर्शनास आले आहे, ज्‍यामुळे शर्करेच्‍या पातळ्यांमध्‍ये वाढ होऊ शकते. योगा व चिंतन सारखे मनाला शांती देणारे व्‍यायाम अत्‍यंत महत्त्वाचे आहे, ज्‍यामुळे तणाव कमी होण्‍यास मदत होऊ शकते.

टस्‍टोस्‍टेरोन पातळ्यांमध्‍ये वाढ करा

संशोधनामधून निदर्शनास येते की, पुरूषाच्‍या शरीरामध्‍ये टेस्‍टोस्‍टेरोन पातळ्यांमधील असंतुलामुळे मधुमेह होऊ शकतो. हार्मोन्‍सची योग्‍य पातळी राखल्याने मधुमेहाचा धोका कमी होण्‍यास मदत होऊ शकते. जीवनसत्‍व ड व झिंक असलेले खाद्यपदार्थ टेस्‍टोस्‍टेरोन पातळ्या आणि पुरूषांची प्रजननक्षमता वाढवण्‍यास मदत करतात.

धूम्रपान सोडा

तंबाखू आणि सिगारेटच्‍या धूरामधील टॉक्झिन्‍स मधुमेह नियंत्रण अधिक बिकट करू शकतात. धूम्रपान व उच्‍च शर्करा पातळ्यांचे संयोजन रक्‍तवाहिन्‍यांचे नुकसान करू शकते आणि हृदयविकाराचा झटका, स्‍ट्रोक किंवा मूत्रपिंड आजारामुळे मधुमेह असलेल्‍या व्‍यक्‍तींचा लवकर मृत्‍यू होण्‍याचा धोका वाढू शकतो. तुम्‍हाला कोणत्‍याही शंका असतील तर कृपया अधिक माहितीसाठी डॉक्‍टरांशी सल्‍लामसलत करा.