AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breakfast | पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी नाश्त्यात या गोष्टींचे सेवन करा!

पपईमध्ये पपेन हे एन्झाइम असते. त्यामुळे आतडे निरोगी राहण्यास मदत होते. इतकेच नाहीतर पपईमुळे आपली पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. यामुळे दररोजच्या नाश्त्यामध्ये एक वाटी पपईचा नक्कीच समावेश करा. पपई पचनाशी संबंधित अनेक समस्यांपासून दूर ठेवण्यास मदत करते. लहान मुलांना आपण पपईचा रस देखील पिण्यास देऊ शकता.

Breakfast | पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी नाश्त्यात या गोष्टींचे सेवन करा!
Image Credit source: 1zoom.me
| Updated on: Jun 16, 2022 | 8:36 AM
Share

मुंबई : सकाळचा नाश्ता आपल्या आरोग्यासाठी (Health) अत्यंत आवश्यक आहे. यामुळे आपल्याला दिवसभराची ऊर्जा मिळण्यास मदत होते. रात्री साधारण 8 ते 9 दरम्यान आपण जेवण करतो, त्यामुळे आपले पोट आठ ते दहा तास साधारण रिकामेच राहते. नाश्त्यामध्ये शक्यतो निरोगी पदार्थांचा (Food) समावेश करा. तेलकट, तुपकट आणि मसालेदार पदार्थांचा नाश्त्यामध्ये अजिबात समावेश करू नका. बरेच लोक वजन कमी करण्याच्या नादात सकाळचा नाश्ता करणे टाळतात. मात्र, असे करणे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरते. निरोगी राहण्यासाठी सकाळचा नाश्ता खूप जास्त आवश्यक आहे. सकाळी गरमा-गरम नाश्त्यासोबत चहा (Tea) घेण्याची सवय अनेकांना असते. परंतू ही सवय आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते.

पपई

पपईमध्ये पपेन हे एन्झाइम असते. त्यामुळे आतडे निरोगी राहण्यास मदत होते. इतकेच नाहीतर पपईमुळे आपली पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. यामुळे दररोजच्या नाश्त्यामध्ये एक वाटी पपईचा नक्कीच समावेश करा. पपई पचनाशी संबंधित अनेक समस्यांपासून दूर ठेवण्यास मदत करते. लहान मुलांना आपण पपईचा रस देखील पिण्यास देऊ शकता.

पोहे

पोहे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहेत. विशेष म्हणजे पोह्याचे सेवन केल्याने वजन कमी होण्यासही मदत होते. त्यात कमी प्रमाणात कॅलरीज असतात. त्यात फायबर -जास्त प्रमाणात असते. यामुळे तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. ते पचनसंस्था चांगली ठेवण्यास मदत करते. एक प्लेट पोहे खाल्ल्याने आपल्याला बऱ्याच काळ भूक लागत नाही. यामुळे आपल्या दररोजच्या आहारामध्ये पोह्याचा समावेश करा.

सफरचंद

सफरचंदचे सेवन करून आपण अनेक रोग आपल्यापासून दूर ठेऊ शकतो. सकाळचा नाश्त्यामध्ये एका सफरचंदचा नक्कीच मसावेश करा. त्यात पोटॅशियम, खनिजे आणि जीवनसत्त्वे ए आणि सी असतात. त्यात फायबर देखील असते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्याचे काम करते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. तसेच सफरचंद वजन कमी करण्यास देखील मदत करते.

नाश्ता

अनेकजण वजन वाढत आहे, म्हणून सकाळचा नाश्ता करणे टाळतात. पण त्यामुळे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतात. हल्ली उपाशी राहण्याची क्रेझ आली आहे. मात्र यामुळे तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. जर आपण सकाळचा नाश्ता योग्य वेळी केला नाही, तर आपली स्मरणशक्तीही कमी होऊ लागते. तसेच आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्यास सुरूवात होते.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.