AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सकाळी जर तुम्हाला ‘हे’ त्रास होत असतील तर तुम्ही आहात Unfit!

तुमच्या शरीरात एखादी समस्या असेल तर सुरुवातीच्या काळात शरीर त्याची लक्षणे दाखवतं. होय, सकाळी उठून काही लक्षणे दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण ही लक्षणे एखाद्या मोठ्या आजाराचे लक्षण असू शकतात.

सकाळी जर तुम्हाला 'हे' त्रास होत असतील तर तुम्ही आहात Unfit!
unfit body symptoms
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jul 11, 2023 | 3:42 PM
Share

मुंबई: प्रत्येकाला रोगांपासून मुक्त होण्याची इच्छा असते. अशा वेळी तुम्हाला चांगली जीवनशैली आणि आपल्या आहाराकडे लक्ष देण्याची गरज आहे. जर तुमच्या शरीरात एखादी समस्या असेल तर सुरुवातीच्या काळात शरीर त्याची लक्षणे दाखवतं. होय, सकाळी उठून काही लक्षणे दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण ही लक्षणे एखाद्या मोठ्या आजाराचे लक्षण असू शकतात. चला जाणून घेऊ आपण कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये?

शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका-

कोरडा घसा

सकाळी उठल्याबरोबर घसा कोरडा वाटत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण हे अस्वस्थ असण्याचे लक्षण आहे. हे मधुमेहाचे सामान्य लक्षण आहे. याव्यतिरिक्त, कोरडा घसा म्हणजे डिहायड्रेशन देखील असू शकते. त्यामुळे या काळात तुम्हाला पाण्याची कमतरताही जाणवू शकते. त्यामुळे सकाळी घसा कोरडा वाटत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

थकवा जाणवणे

विश्रांती घेतल्यानंतरही तुम्हाला रिलॅक्स वाटत नसेल आणि तुम्हाला नेहमी थकवा जाणवत असेल तर तुम्ही स्वत:कडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करू नका. असे केल्याने तुम्हाला त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

उलट्या आणि मळमळ

सकाळी उठल्यानंतर उलट्यांचा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण असे केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता. कारण सकाळी उलट्या किंवा मळमळ होणे ही पचनाशी संबंधित समस्या असू शकते. त्यामुळे जर तुम्हाला रोजच हा त्रास होत असेल तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नये.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
मोठी बातमी! दोन दिवस कसून चौकशी, रात्रभर प्रश्नांचा मारा...अखेर
मोठी बातमी! दोन दिवस कसून चौकशी, रात्रभर प्रश्नांचा मारा...अखेर.
मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊतांचं हटके उत्तर चर्चेत...
मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊतांचं हटके उत्तर चर्चेत....
पेपरफुटीपासून आत्महत्यांपर्यंत….भाजपच जबाबदार, राऊतांचे गंभीर आरोप
पेपरफुटीपासून आत्महत्यांपर्यंत….भाजपच जबाबदार, राऊतांचे गंभीर आरोप.
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार...
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार....
ठो ठो आवाज आला... एकदा नव्हे दोनदा... नागपूरमधल्या गजबजलेल्या भागात...
ठो ठो आवाज आला... एकदा नव्हे दोनदा... नागपूरमधल्या गजबजलेल्या भागात....
मुंबईत मराठी फलक नाही? मग कारवाई अटळ; हजारो आस्थापनांची तपासणी....
मुंबईत मराठी फलक नाही? मग कारवाई अटळ; हजारो आस्थापनांची तपासणी.....
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?.
ही वादळापूर्वीची शांतता….डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात तणाव
ही वादळापूर्वीची शांतता….डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात तणाव.
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...