AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

kitchen tips | मऊ आणि फुगलेल्या पोळ्या बनवणं कठीण आहे?, या टिप्स फॉलो करा

पोळ्या फुगलेल्या आणि मऊ न होण्याची समस्या बहुतेक घरांमध्ये दिसून येते. तसं पाहिलं तर थंडीचं वातावरण आहे. त्यातही कोरडेपणा लवकर येतो, अशा परिस्थितीत पोळ्यांना जास्त वेळ फुगवणे आणि मऊ ठेवणं हे सोपे काम नाही.

kitchen tips | मऊ आणि फुगलेल्या पोळ्या बनवणं कठीण आहे?, या टिप्स फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jan 02, 2022 | 12:27 PM
Share

बर्‍याच घरांमध्ये पोळी कडक होण्याची आणि लवकर खराब होण्याची समस्या असते. यासाठी गृहिणी काही टिप्स फॉलो करतात. परंतु तरीही त्यांचे चांगले परिणाम मिळत नाहीत. घरोघरी कणीक आणणारी अनेक दुकानेही बदलली आहेत. पोळ्या फुगलेल्या आणि मऊ होण्याची समस्या बहुतेक घरांमध्ये दिसून येते. तसं पाहिलं तर थंडीचं वातावरण आहे. त्यामध्ये कोरडेपणा लवकर येतो. अशा स्थितीत पोळ्यांना जास्त वेळ फुगवून मऊ ठेवणं कठीण काम आहे. जर तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो केल्यात, तर तुम्ही फुगीर आणि मऊ रोटीचाही आनंद घेऊ शकता. त्यासाठी आधी कणकीचा दर्जाही चांगला असणे आवश्यक आहे. यानंतर, तुम्ही पोळी कशी बनवता याची प्रक्रिया सुधारणे आवश्यक आहे. या टिप्स फॉलो करून तुम्ही घरच्या घरी मऊ पोळ्या बनवू शकता.

कणीक मळणे

जेव्हा तुम्ही कणीक मळून घ्यालं तेव्हा लक्षात ठेवा की ते मऊ ठेवणे चांगले आहे. कडक कणीक मळून घेतल्यावर पोळ्या जास्त काळ मऊ राहत नाहीत. वाटल्यास कणीक मळताना त्यात थोडे दूधही वापरू शकता.

कणीक मळून थोडा वेळ ठेवा

कणीक मळल्यानंतर थोडा वेळ थांबा. कणीक मळून घेतल्यानंतर त्यावर हलक्या हाताने पाण्याचा थर तयार करून 15 मिनिटे असेच राहू द्या. असे केल्याने तुमच्या पोळ्या मऊ आणि नरम होतील. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही मैद्यामध्ये थोडे तेलही मिक्स करू शकता.

अशा लाटा पोळ्या

पोळी लाटताना हात नेहमी मऊ ठेवा. पोळी लाटताना प्रथम कणकीच्या कडा लाटून घ्या आणि नंतर उरलेली कणीक लाटून आकार द्या.

कोरडी कणीक कमी घ्या

अनेकदा लोक पोळ्या लाटताना जास्त कोंडा म्हणजेच कोरडी कणीक वापरतात. असे केल्याने पोळी सहज लाटली जाते. पण त्यामुळे पोळीतील ओलावा संपून ती कडक होते. त्यामुळे हे करणे टाळा.

मंद आचेवर शेका

तवा गरम केल्यानंतर, पोळी भाजताना करताना गॅस मंद ठेवणे चांगले. तवा खूप गरम असेल तर पोळ्या आधीच जास्त शिजल्या जातात आणि चुलीवर भाजून घेतल्यास त्या कडक होतात. पोळ्यांवर तूप लावून मजा घ्या.

Daddy issue | डॅडी इश्यूमुळं बिघडू शकते मुलींचे जीवन!, अशाप्रकारे सोडवू शकता समस्या

Dry cough | कोरड्या खोकल्यादरम्यान या घरगुती उपचारांना करा ट्राय, समस्या होईल दूर!

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी