व्यक्ती अचानक बेशुद्ध पडली? घाबरू नका, जीव वाचवण्यासाठी पहिल्या 5 मिनिटांत करा ‘ही’ कामं!

Nana Patekar Death: अभिनेते नाना पाटेकर यांचा कार्डियाक अरेस्टमुळे मृत्यू झाला. ते घरी बेशुद्ध अवस्थेत होते. अशा परिस्थिती एखादी व्यक्ती अचानक बेशुद्ध पडल्यास घाबरून न जाता पहिल्या ५ मिनिटांत नेमकं काय करावं आणि जीव वाचवण्यासाठी कोणती पावलं उचलावीत, हे जाणून घ्या.

व्यक्ती अचानक बेशुद्ध पडली? घाबरू नका, जीव वाचवण्यासाठी पहिल्या 5 मिनिटांत करा ‘ही’ कामं!
| Edited By: | Updated on: Oct 16, 2026 | 1:24 PM

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा ८ ऑक्टोबर रोजी कार्डियाक अरेस्टमुळे मृत्यू झाला. ते गोव्यातील घरी बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते. एखादी व्यक्ती अचानक बेशुद्ध पडली किंवा जमिनीवर कोसळली, तर अशा वेळी नेमकं काय करावं, हे अनेकांना समजत नाही. काही जण घाबरून जातात, तर काही जण रुग्णाला पाणी पाजण्याचा किंवा त्वरित उठवण्याचा प्रयत्न करतात. मात्र अशा आपत्कालीन परिस्थितीत सुरुवातीची काही मिनिटं अत्यंत महत्त्वाची मानली जातात. अशा परिस्थितीत पहिल्या पाच मिनिटांत कोणती पावलं उचलावीत आणि कोणत्या चुका टाळाव्यात, याबाबत महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

तातडीने प्रतिसाद द्या एखादी व्यक्ती बेशुद्ध पडल्यास तिच्या खांद्याला हलकेच थोपटून मोठ्याने हाक मारा. ती प्रतिसाद देत नसेल आणि श्वास घेत नसेल किंवा केवळ अधूनमधून श्वास घेत असल्यास कार्डिअ‍ॅक अरेस्टची शक्यता समजून तातडीने मदत घ्या. कुटूंबातील एखाद्या व्यक्तीची डॉक्टरांची वाट पाहत बसू नका. त्याऐवजी, त्या व्यक्तीला हलक्या हाताने हलवून जागृत करण्याचा प्रयत्न करा, त्यांना थोडे पाणी द्या किंवा त्यांना गाडीत बसवून रुग्णालयात घेऊन जा.

Loading...

तातडीने ॲम्बुलन्सला फोन करा घरात एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील, तर एकाने तातडीने रुग्णवाहिकेला फोन करावा आणि फोन स्पीकरवर ठेवून आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. दुसऱ्या व्यक्तीने सीपीआर (CPR) देण्याचा प्रयत्न करावा. तर तिसऱ्या व्यक्तीने इमारतीच्या प्रवेशद्वारावर जाऊन पॅरामेडिक्सला योग्य दिशा दाखवावी.

व्यक्ती शुद्धीवर आहे, पण छातीत दुखत असल्यास काय कराल? एखादी व्यक्ती शुद्धीत असेल पण छातीत दुखणे, घाम येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ही हार्ट अटॅकची लक्षणं असू शकतात. अशा व्यक्तीला आरामदायी स्थितीत बसवा, घट्ट कपडे सैल करा आणि तातडीने रुग्णवाहिका बोलवा. तिला चालायला लावू नका किंवा जिने चढायला सांगू नका. रुग्णाला शांत आणि स्थिर ठेवा; कारण हार्ट अटॅकचे रूपांतर कोणतीही पूर्वसूचना न देता कार्डिअ‍ॅक अरेस्टमध्ये होऊ शकते.

आपत्कालीन परिस्थितीसाठी आधीच तयारी ठेवा ; घ रात ज्येष्ठ नागरिक किंवा हृदयविकाराचे रुग्ण असल्यास आपत्कालीन संपर्क क्रमांक सहज दिसतील अशा ठिकाणी ठेवा. हृदयविकारांवर उपचार करणाऱ्या जवळच्या रुग्णालयाचा पत्ता उपलब्ध ठेवा. जरी ५ मिनिटांचा कालावधी अत्यंत अल्प असला, तरी कुटुंबाला काय करावे हे माहित असल्यास परिस्थिती बदलू शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us