AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, सक्रिय रुग्णसंख्या 199 दिवसांतील निचांकी

गेल्या 24 तासात भारतात 22 हजार 842 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 244 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 25 हजार 930 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, सक्रिय रुग्णसंख्या 199 दिवसांतील निचांकी
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: Anish Bendre | Updated on: Oct 03, 2021 | 9:47 AM
Share

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या घटताना दिसत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाली. कालच्या दिवसात देशात 22 हजार 842 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 244 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. देशातील सक्रिया कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पावणे तीन लाखांच्या खाली आहे. कालच्या दिवसात या संख्येने गेल्या 199 दिवसातील निचांक गाठला.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 22 हजार 842 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 244 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 25 हजार 930 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 37 लाख 66 हजार 707 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 30 लाख 94 हजार 529 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 48 हजार 817 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 2 लाख 70 हजार 557 इतके सध्याच्या घडीला सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 90 कोटी 51 लाख 75 हजार 348 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 22,842

देशात 24 तासात डिस्चार्ज – 25,930

देशात 24 तासात मृत्यू – 244

एकूण रूग्ण –

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 2,70,557

एकूण डिस्चार्ज (रिकव्हरी) – 3,30,94,529

एकूण मृत्यू  – 4,48,817

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 90,51,75,348

गेल्या 24 तासातील लसीकरण – 

कालच्या दिवसात देशात सापडलेल्या 22 हजार 842 नवीन कोरोनाबाधित रुग्णांपैकी केरळ राज्यात 13 हजार 217 रुग्णांची नोंद झाली. तर 244 कोरोनाबळींपैकी केरळातील 121 जणांचा समावेश आहे.

कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये शिखर गाठेल?

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपाठोपाठ तिसऱ्या लाटेची भीती वाढू लागली आहे. देशात पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे सरकार आणि आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान कहर करू शकेल. परंतु या लाटेची तीव्रता दुसऱ्या लाटेपेक्षा खूपच कमी असेल. साथीच्या गणिती मॉडेलिंगमध्ये सहभागी असलेल्या एका शास्त्रज्ञाने सोमवारी ही माहिती दिली. आयआयटी-कानपूरचे शास्त्रज्ञ मनींद्र अग्रवाल म्हणाले की, जर कोरोना विषाणूचे नवे स्वरूप आले नाही तर परिस्थिती बदलण्याची शक्यता नाही. अग्रवाल हे तज्ज्ञांच्या तीन सदस्यीय पथकाचे सदस्य आहेत. या पथकाकडे कोरोनाच्या संसर्गवाढीचा अंदाज लावण्याचे काम देण्यात आले आहे

संबंधित बातम्या :

कोरोनाची तिसरी लाट ‘या’ महिन्यांत शिखर गाठेल; शास्त्रज्ञांनी वर्तवला अंदाज

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!