AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Cases In India | कोरोना ओसरल्याचं चित्र एका दिवसात विरलं, नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये 14 हजारांनी वाढ

गेल्या 24 तासात भारतात 43 हजार 654 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 640 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 41 हजार 678 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | कोरोना ओसरल्याचं चित्र एका दिवसात विरलं, नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये 14 हजारांनी वाढ
CORONA
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 28, 2021 | 10:45 AM
Share

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 14 हजारांनी वाढ झाली. सोमवारी नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये दहा हजारांची घट झाल्याने कोरोना ओसरत असल्याचं आशादायक चित्र निर्माण झालं होतं. कालच्या दिवसात (मंगळवारी) 43 हजार 654 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मात्र अॅक्टिव्ह केसेस चार लाखांच्या खालीच आहेत. कालच्या दिवसात 640 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 43 हजार 654 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 640 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 41 हजार 678 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 14 लाख 81 हजार 605 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 6 लाख 63 हजार 147 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 22 हजार 22 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 99 हजार 436 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 44 कोटी 61 लाख 56 हजार 659 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 43,654

देशात 24 तासात डिस्चार्ज – 41,678

देशात 24 तासात मृत्यू – 640

एकूण रूग्ण – 3,14,81,605

एकूण डिस्चार्ज – 3,06,63,147

एकूण मृत्यू – 4,22,022

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 3,99,436

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 44,61,56,659

संबंधित बातम्या :

लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना बाहेर फिरण्याची परवानगी मिळणार?132

(New 43654 Corona Cases in India in the last 24 hours)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...