Mental Health : जब मिल बैठेंगे सब यार…. मित्रांशी गप्पा मारल्याने मानसिक आरोग्य राहते उत्तम

| Updated on: Feb 11, 2023 | 9:11 AM

दिवसभरात एकदा मित्रांना भेटून, त्यांच्याशी गप्पा मारून, मजा-मस्ती केल्याने तुमचा आनंद वाढू शकतो आणि तणावाची पातळी कमी होण्यास मदत मिळू शकते.

Mental Health : जब मिल बैठेंगे सब यार.... मित्रांशी गप्पा मारल्याने मानसिक आरोग्य राहते उत्तम
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली : यारों दोस्ती बडी ही हसीन है…. हे गाणं तर आपण सर्वांनीच ऐकलं असेल. दोस्तीची व्याख्या (Friendship) सांगणारं हे गाणं बहुतांश जणांच आवडतं गाणंही असेलच. दोस्त आपल्यासाठी काय असतात, प्रत्येकाच्या मनातला हळवा कोपरा असतात. आपला यश सेलिब्रेट करून आनंद द्विगुणित करतात, तर दु:खाच्या, संकटाच्या वेळेस नुसता त्यांचा पाठीवरचा हातही आपल्याला शंभर हत्तींच बळ देतो… असे असतात आपले मित्र ! दिवसभरात थोडा वेळ तरी मित्रांशी बोलल्याने मानसिक आरोग्य (mental health) सुधारू शकते. नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून (research)ही बाब समोर आली आहे.

या अभ्यासाने मानसिक आरोग्य राखण्यासाठी मानसिक आणि भावनिक जोडणीचे महत्त्व दर्शविले आहे. याशिवाय दिवसभरात एकदा मित्रांना भेटून, त्यांच्याशी गप्पा मारून, मजा-मस्ती केल्याने तुमचा आनंद वाढू शकतो आणि तणावाची पातळी कमी होण्यास मदत मिळू शकते. त्याशिवाय नैराश्य आणि चिंता यांसारख्या मानसिक आजारांचा धोकाही कमी असतो. इतर अनेक अभ्यासांनी असे दर्शविले आहे की सामाजिक संबंध एखाद्याचा मूड सुधारू शकतात आणि भावनांवर नियंत्रण ठेवू शकतात.

अभ्यासात काय आढळले ?

हे सुद्धा वाचा

या अभ्यासात 900 लोकांचा समावेश करण्यात आला होता. हे सर्व पाच वेगवेगळ्या विद्यापीठांचे आणि त्यांचे सामाजिक संपर्कचे विद्यार्थी होते, ज्यांचा लॉकडाऊनच्या आधी, लॉकडाऊन दरम्यान आणि नंतर अभ्यास करण्यात आला. नाते-संबंधांच्या संदर्भात संवादाची गुणवत्ता समजून घेणे हा या अभ्यासाचा उद्देश होता. सर्व लोकांना दिवसा सात कम्युनिकेशन व्यवहारांपैकी एकामध्ये सहभागी होण्यास सांगितले गेले आणि नंतर तणाव, कनेक्शन, चिंता, कल्याण, एकटेपणा आणि त्यांच्या दिवसाची गुणवत्ता याबद्दल अहवाल देण्यास सांगण्यात आले होते. ते 7 कम्युनिकेशन व्यवहार खालीलप्रमाणे –

– एखाद्या व्यक्तीशी बोलणे

– अधिक काळजी घेणे

– ऐकणे

– दुसऱ्या व्यक्तींना व त्यांच्या मतांना महत्व देणे

– एकमेकांचे कौतुक करणे

– जबाबदारीने, सांमजस्याने बोलणे

– गंमत अथवा विनोद करणे

वैयक्तिकरित्या, या वर्तनांचा मानसिक आरोग्यावर लक्षणीय परिणाम झाला नाही, असे अभ्यासात आढळून आले.

क्वॉंटिटी व क्लॉलिटी दोन्ही महत्वाचे

दैनंदिन संभाषणांचे प्रमाण आणि गुणवत्ता (Quantity and Quality) या दोन्हींचा प्रभाव समजून घेणे हा अभ्यासाचा उद्देश होता. यावरून असे दिसून आले की संवाद किती वेळा साधण्यात आला व त्याची गुणवत्ता कशी होती, या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. ज्यांनी अधिक दर्जेदार, गुणवत्तापूर्ण संभाषण केले, त्यांचा दिवस चांगला गेल्याचे दिसून आले. मुख्य लेखकाच्या मते, जर तुमचे मित्र, तुम्ही काय म्हणताय हे लक्षपूर्वक ऐकत असतील आणि अधिक काळजी घेत असतील तर त्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य वाढू शकते. तसेच इलेक्ट्रॉनिक किंवा सोशल मीडिया संपर्काच्या तुलनेत जर तुम्ही तुमच्या मित्रांशी समोरासमोर बोललात तर तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहते, असे या अभ्यासात आढळून आले आहे.