इंटरेस्टिंग आणि आश्चर्यकारक… ब्रेकअपनंतर तरुणी होतात लठ्ठ; कारण काय?

जेव्हा तुम्ही आनंदी असता , तुम्हाला सर्वोत्तम रहायचं आणि दिसायचं असतं. पण दु:खी असताना काहीही करण्याची इच्छा नसते, तुम्ही स्वत:कडे दुर्लक्ष करू लागता. मात्र, हे आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.

इंटरेस्टिंग आणि आश्चर्यकारक... ब्रेकअपनंतर तरुणी होतात लठ्ठ; कारण काय?
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 07, 2023 | 1:47 PM

नवी दिल्ली – ब्रेकअप (breakup) हा असा शब्द आहे, जो आपल्या आयुष्यातील अनेक इच्छा आणि अनेक गैरसमजांना तोडण्याचे काम करतो. जेव्हा एखादा मुलगा आणि मुलगी काही कारणाने एकमेकांपासून विभक्त होतात तेव्हा त्यांना सर्वत्र अंधार दिसू लागतो. आत्तापर्यंत जे स्वप्न सुखद वाटत होते, हळुहळु ते डोळ्यांसमोरून नाहीसं होतं. अशावेळी दिवस खूप त्रासात आणि रागात जातात. त्याचा आरोग्यावर परिणाम (effect on body) स्पष्टपणे दिसून येतो. तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर ब्रेकअपनंतर या टिप्स फॉलो करा आणि स्वत:ची काळजी (self care) घ्या.

तज्ज्ञ काय सांगतात ?

याबाबत तज्ज्ञ सांगतात की प्रेम हे टॉनिकसारखे असते, जे आपल्या मेंदूतील फील-गुड केमिकल वाढवण्याचे काम करते. यामुळे माणसाला खूप छान वाटतं. पण त्याचवेळी ब्रेकअपनंतर अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या, चिंता आणि तणाव अशा स्थितीत स्ट्रेस हार्मोन्स वाढतात, जे हृदयविकाराचे कारणही ठरू शकतात. या स्थितीला ब्रोकन हार्ट सिंड्रोम म्हणतात. जेव्हा तुम्ही आनंदी असता , तुम्हाला सर्वोत्तम रहायचं आणि दिसायचं असतं. पण दु:खी असताना काहीही करण्याची इच्छा नसते, तुम्ही स्वत:कडे दुर्लक्ष करू लागता. मात्र, हे आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.

हे सुद्धा वाचा

ब्रेकअपनंतर तुमचे मानसिक आरोग्य राखण्यासाठी या मार्गांचा अवलंब करा.

– एकटं राहण्याऐवजी कुटुंबियांसह आणि मित्रांसोबत अधिकाधिक वेळ घालवा.

– तुमची दिनचर्या आणि भविष्यासाठी एक गोल किंवा लक्ष्य सेट करा आणि त्यावर तुमचे लक्ष केंद्रित करून पुढे चालायला सुरूवात करा.

– ध्यान, योग, संगीत, विश्रांती, व्यायाम आणि चालणे इत्यादींना तुमच्या दिनचर्येचा भाग बनवा. यामुळे आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात.

– तुमचा गमावलेला आत्मविश्वास आणि स्वातंत्र्य परत मिळवण्याचा प्रयत्न करा.

– या सर्व उपायांनंतरही तुम्ही या त्रासातून बाहेर पडू शकत नसाल तर मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

व्यस्त रहा

रिकामं मन किंवा रिकामं डोकं हे सैतानाचं घर असतं असं म्हणतात. त्यामुळे आपल लक्षं इकडे-तिकडे भरकटतं. अशा स्थितीत स्वतःला पूर्णपणे व्यस्त करा. यामुळे तुम्ही भूतकाळाबद्दल व समस्येपासून विचार करणे बंद कराल आणि तुमच्यामध्ये आत्मविश्वासही वाढेल. हवं असेल तर एखाद छंद जोपोसा किंवा ऑफीसच्या कामात झोकून द्या.

त्वचेची घ्या काळजी

ब्रेकअपनंतर मुली अनेकदा नैराश्यात जातात, ज्याचा परिणाम त्यांच्या त्वचेवरही दिसून येतो. निस्तेज चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी त्वचेची काळजी घ्या. घरगुती फेसपॅक लावा आणि चेहऱ्यावर स्क्रब करा. अशा गोष्टींमुळे चेहऱ्याचे सौंदर्य वाढते. तसेच, हे चेहऱ्याला थंडावा देण्याचे काम करते. याशिवाय नवीन हेअर स्टाइल आणि नेल आर्टच्या माध्यमातून स्वत:ला पॅम्पर करा.

फिटनेसकडे द्या लक्ष

अनेक वेळा ब्रेकअपनंतर लोकांना सहजासहजी पुढे जाता येत नाही. परिणामी, तणावामुळे, वाईट सवयी लागतात. सतत खात राहण्याची अशीच एक सवय असते, ज्यामुळे वजन वाढू लागते. अशा परिस्थितीत आरोग्याची काळजी घ्या आणि जास्त खाणे टाळा. आपल्या आरोग्याबद्दल आणि तंदुरुस्तीबद्दल जागरूक रहा, व्यायाम करा, त्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या सहजपणे टाळता येतात. याशिवाय तुमचे वजनही नियंत्रणात राहते.

सकारात्मक विचार करा

ब्रेकअपनंतर असं वाटू लागतं की आयुष्यात सगळं काही संपलं आहे. आता जगून काय उपयोग? असा प्रश्नही काही लोकांना पडू शकतो. पण हे योग्य नाही. त्यामुळे या भावनेतून बाहेर पडायचं असेल तर सकारात्मक विचार करा. तुमचे सांत्वन करण्यासाठी किंवा जुन्या आठवणींविषयी बोलण्यासाठी जे मित्र फोन करतात किंवा भेटतात, त्यांच्यापासून दूर रहा. ते तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतात. एक चांगले पुस्तक वाचा, तुमचे आवडते संगीत ऐका आणि सहलीला जा. यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल आणि तुम्हाला चांगले वाटू लागेल.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.