कोमट पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत चमत्कारिक फायदे, दुसरा फायदा तर प्रत्येकासाठी फारच महत्त्वाचा!

उन्हातून आल्यावर किंवा फार तहान लागल्यानंतर थंडगार पाणी पिण्याची फार इच्छा होते. मात्र थंड पाणी प्रमाणापेक्षा अधिक पिल्याने त्याचा शरीराला फायदा होतोच असे नाही.

कोमट पाणी पिण्याचे हे आहेत चमत्कारिक फायदे, दुसरा फायदा तर प्रत्येकासाठी फारच महत्त्वाचा!
drinking hot water benefits
| Edited By: | Updated on: Apr 14, 2025 | 5:57 PM

उन्हातून आल्यावर किंवा फार तहान लागल्यानंतर थंडगार पाणी पिण्याची फार इच्छा होते. मात्र थंड पाणी प्रमाणापेक्षा अधिक पिल्याने त्याचा शरीराला फायदा होतोच असे नाही. आपल्याला जसे थंड पाणी हवे असते तशाच प्रकारे शरीराला कोमट पाण्याचीही तेवढीच गरज असते. याच पार्श्वभूमीवर कोमट पाणी प्यायलाने शरीराला नेमका काय फायदा होतो? ते जाणून घेऊ या..

उन्हातून आल्यावर लगेच थंड पाणी प्यावे का?

उन्हाळ्याच्या दिवसांत तर आपल्याला थंड पाणी पिण्याची फार इच्छा होते. मात्र उन्हातून आल्यावर लगेचच थंड पाणी पिऊ नये. उलट थंड पाणी पिण्याऐवजी साधारण पाणी पिणे हे शरीरासाठी चांगले असते.

बॉडी डिटॉक्स करण्यासाठी कोमट पाणी फायदेशीर

कोमट पाणी शरीरासाठी अनेक अर्थांनी फायदेशीर ठरते. कोमट पाण्याच्या मदतीने तुमच्या शरीरातील घाण नैसर्गिक पद्धतीने बाहेर येऊ शकते. प्रमाणेपेक्षा जास्त थंड पाणी पिल्यावर त्याचा रक्ताभिसरणावर परिणाम पडतो. मुत्रपिंड आणि फुप्फुसाच्या आरोग्यासाठी कोमट पाणी फायदेशीर ठरू शकते.

आतड्यांसाठी कोमट पाणी फायदेशीर

आतड्यांच्या आरोग्यासाठी कोमट पाणी फायदेशीर ठरू शकते. पचन वाढवण्यासाठी, पोटदुखी कमी करण्यासाठी कोमट पाणी फायदेशीर ठरू शकते.

कोमट पाणी पिताना काय काळजी घ्यावी?

तुम्हाला कोमट पाणी पिण्याची सवय असेल तर ते पिण्यासाची वेळ लक्षात घेतली पाहिजे. सकाळी पोट रिकामे असताना कोमट पाणी पिले तर ते फायदेशीर ठरते. तसेच जेवम केल्यानंतर अर्ध्या तासानेही कोमट पाणी पिल्यास ते फायदेशीर ठरते. कोमट पाणी प्यायल्याने आतड्यांचे स्वास्थ्य सुधारते तसेच आतड्यांची सुज कमी करण्यास ते फायदेशीर ठरते.
तणावापासून मुक्तता

तुम्ही पोट रिकामे असताना कोमट पाणी पिल्यास तुमचा तणाव आणि चिंता कमी होऊ शकते. कोमट पाणी प्यायल्याने सूज कमी करणे, पेशींना आराम मिळणे, रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारणे असे फायदे होऊ शकतात. कोमट पाणी हे डोकेदुखी आणि मायग्रेन यासारख्या आजारांवर मात करण्यासाठीही फायदेशीर ठरू शकते.

सूचना- या लेखात दिलेली माहिती ही प्रातिनिधिक स्वरुपाची आहे. इंटरनेटवर आधारलेल्या माहितीवर हा लेख लिहिलेला आहे. तरी या लेखात दिलेल्या माहितीची अंमलबजावणी करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.