AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cold Chills After Eating: जेवण झाल्यानंतर तुम्हाला सुद्धा थंडी वाजते, तर जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारणे!!

आपल्यापैकी अनेकांच्या बाबतीत ही घटना वारंवार घडताना दिसत असते जसे की जेवण  झाल्यानंतर अचानक आपल्याला थंडी वाजू लागते. तसे तर अनेकदा आपण जेव्हा मसालेदार पदार्थ खातो त्यानंतर शरीरामध्ये गर्मी जाणवू लागते.

Cold Chills After Eating: जेवण झाल्यानंतर तुम्हाला सुद्धा थंडी वाजते, तर जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारणे!!
Cold
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Feb 05, 2022 | 8:27 AM
Share

आपल्यापैकी अनेकांच्या बाबतीत ही घटना वारंवार घडताना दिसत असते जसे की जेवण  झाल्यानंतर अचानक आपल्याला थंडी वाजू लागते. तसे तर अनेकदा आपण जेव्हा मसालेदार पदार्थ खातो त्यानंतर शरीरामध्ये गर्मी जाणवू लागते. परंतु, थंडी वाजणे (Cold) ही एक सर्वसाधारण बाब आहे. हिवाळ्याच्या (Winter) दिवसात जेव्हा आपण आईस्क्रीम सारखे थंड पदार्थ खातो त्यानंतर आपल्या शरीरामध्ये अचानक थंडी वाजून येते त्यानंतर शरीरामध्ये कंपण (Cold Chills) सुद्धा होताना जाणवते. अशावेळी आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की जेव्हा आपण आणि खाद्य पदार्थ सेवन करत असतो. त्या खाद्यपदार्थांचा आपल्या शरीराच्या तापमानाशी काही फरक असतो का?या परिस्थितीवर तज्ञ मंडळीचे म्हणणे आहे की, आपण जे काही अन्नपदार्थ खात असतो त्या सर्वांचा परिणाम आपल्या शरीरावरील तापमानावर प्रामुख्याने जाणताना दिसतो.

पचन प्रक्रिया घडत असताना या सर्वांचा परिणाम आपल्या शरीरावरील तापमानावर सुद्धा होतो आणि अशावेळी आपल्या शरीराचे तापमान प्रामुख्याने बदलत असते. आपल्या शरीराच्या तापमानामध्ये होणारे बदल याकडे अनेकांचे लक्ष जात नाही. तसेतर शरीराच्या तापमानामध्ये होणारी वाढ यामुळे अनेकांना जेवण केल्यानंतर गरमी होण्या ऐवजी थंडी वाजू लागते विशेष करून हे जेव्हा घडते तेव्हा तुम्ही काहीतरी गरमागरम पदार्थ खाल्ले असतील अशा वेळी हे चिंता करण्याचे कारण ठरू शकते.

न्यूट्रिशन एक्सपर्ट यांचे म्हणणे असे आहे की ,जर तुम्हाला सुद्धा जेवण केल्यानंतर लगेच थंडी वाजत असेल किंवा शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे कंपण होत असेल तर अशा वेळी तुम्हाला सावधानता बाळगणे गरजेचे आहे. तुम्ही घेत असलेला आहार तुमच्या शरीराच्या तापमानासाठी कारणीभूत ठरू शकतो, अशा वेळी वेगवेगळी कारणे सुद्धा असू शकतात त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये थंडी वाजून येणे किंवा कंपण होऊ नये यासाठी काही कारणे सुद्धा कारणीभूत ठरू शकतात.

कमी कॅलरीचे सेवन

काही प्रमाणात कमी कॅलरीचे केलेले सेवन यामुळे आपल्या शरीराला पोषक तत्व तर मिळतात पण त्याचबरोबर आपल्या शरीरातील तापमान नियंत्रण करण्यासाठी सुद्धा कॅलरीचे महत्त्वाची भूमिका असते. 2018 मध्ये करण्यात आलेल्या एकाअभ्यासा अंतर्गत असे सिद्ध झाले की जे लोक दीर्घकाळापासून जास्त प्रमाणामध्ये किंवा नियंत्रणामध्ये कॅलरीचे डाएट फॉलो करत असतील तर अशा व्यक्तींच्या शरीरामध्ये कॅलरीचे प्रमाण आपल्याला नियंत्रणात पाहायला मिळते तसेच अशा व्यक्तींचे शारीरिक तापमान सुद्धा जास्त नसते. त्यांच्या शरीरामध्ये कॅलरीची कमतरता असू शकते आणि म्हणूनच अशा वेळी जेवण केल्यानंतर त्यांना थंडी वाजू लागते.

​इंटरमिटेंट फास्टिंग

इंटरमिटेंट फास्टिंग हा जेवण्याचा एक पॅटर्न आहे ज्यामध्ये तुम्ही वेळोवेळी उपवास धरतात आणि जेवण करतात.या प्रकारच्या पॅटर्नमध्ये 14-16 तासांसाठी 8-10 तासांत विंडो ईटिंग सोबतच इंटरमिटेंट फास्टिंग करावी लागते. NCBI (2) मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातर्गत असे मानले गेले आहे की ,इंटरमिटेंट फास्टिंग ब्लड शुगर लेवलला कमी करते ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये तणाव वाढू लागतो त्यांना वाढल्यामुळे शरीरातील तापमानामध्ये सुद्धा कमतरता निर्माण होते यामुळे व्यक्तीला थंडी वाजून येते. जर तुम्हाला सुद्धा इंटरमिटेंट फास्टिंग दरम्यान नेहमी थंडी वाजून येत असेल तर अशावेळी हा संकेत दर्शवतो की तुम्हाला विंडो इटिंग दरम्यान आपल्या शरीरासाठी कॅलरीचे प्रमाण वाढविण्याची आवश्यकता आहे.

थंड पदार्थ किंवा पेय यांचे सेवन

थंड पदार्थ खाल्ल्याने किंवा पेय प्यायल्याने शरीरातील तापमानामध्ये बदल जाणवू लागतो. IOSR जर्नल ऑफ नर्सिंग एंड हेल्थ सांइसमध्ये प्रकाशित झालेल्या माहितीनुसार असे सिद्ध झाले आहे की थंड पाणी किंवा अन्य कोल्ड्रिंक्स प्यायल्याने आपल्या शरीराचे तापमान 5 मिनिटानंतर 0.28 डिग्री सेल्सियस कमी होते आणि यामुळे आपल्या शरीरातील तापमानात आपल्याला फरक जाणवू लागतो.

रक्ताची कमतरता

जेव्हा आपल्या शरीरातील पेशींमध्ये रक्ताचे योग्य प्रमाणात मात्रा उपलब्ध नसते तेव्हा अनेकांना एनिमिया सारख्या आजारावर उद्भवण्याची शक्यता असते. आपल्या शरीरातील रक्त पेशी आपल्या फुफ्फुसा जवळ असणाऱ्या सर्व अवयवांना रक्तपुरवठाचे कार्य करत असते. याच्या माध्यमातूनच आपल्या शरीरातील अन्य अवयवांना सुद्धा ऑक्सीजनची मात्रा तसेच पुरवठा देखील होत असतो. PubMed Central मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासा अंतर्गत असे सिद्ध झाले आहे की आपल्याला वारंवार थंडी लागणे हे एनीमियाचे कारण सुद्धा असू शकते. ही समस्या उद्भवणाऱ्या अनेक लोकांना त्यांच्या शरीरामध्ये ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्यामुळे सुद्धा अशा प्रकारची समस्या उद्भवू लागते तसेच म्हणूनच अनेकदा काही व्यक्ती थंड पदार्थ खाल्ल्यानंतर सुद्धा त्यांच्या शरीरामध्ये कंपण होते याचे प्रमुख कारण म्हणजे तुमच्या रक्तातील ऑक्सिजनची कमतरता होय.

​हायपोथायरॉइडिज्म

जेवण झाल्यानंतर सातत्याने थंडी वाजणे यामागील कारण हायपोथायरॉइडिज्म देखील असू शकते. ही अशा प्रकारची स्थिती आहे ज्यामध्ये तुमच्या शरीराला पर्याप्त प्रमाणात थायरॉईडचे हार्मोन निर्मिती होत नाही.हायपोथायरॉइडिज्म मध्ये आपल्या शरीरातील मेटॅबॉलिझम स्थिती धीम्या गतीमध्ये कार्य करू लागते. आणि अशावेळी आपल्या शरिरातील गरमीचे प्रमाण कमी होऊ लागते अशा वेळी जेवण झाल्यानंतर आपल्याला जास्त थंडी वाजू लागते

​डायबिटीज

डायबिटीज हा एक मेटाबॉलिक आजार आहे, जो हाय ब्लड शुगरचे कारण बनू शकतो. आपण जर डायबिटीज वर नियंत्रण करू शकलो नाही तर यामुळे सुद्धा तुमच्या शरीरामध्ये अनेक समस्या भविष्यात निर्माण होऊ शकतात. जर तुमच्या शरीरामध्ये डायबिटीसची मात्रा जास्त प्रमाणामध्ये झाली असेल तर अशा वेळी आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होत नाही त्यामुळे जेवण केल्यानंतर गरमी ऐवजी शरीरामध्ये थंडी जाणवू लागते.

काही पदार्थ चे सेवन केल्यानंतर शरीरामध्ये थंडी वाजू लागली की सर्वसाधारण बाब असते परंतु तुम्हाला नेहमीच जेवण केल्यानंतर वारंवार थंडी वाजत असेल किंवा शरीरामध्ये कंपण जाणवत असेल तर अशा वेळी डॉक्टरांना याबाबत माहिती करून देणे गरजेचे आहे अन्यथा भविष्यात तुम्हाला अनेक गंभीर आजारांना सामोरे जाण्याची शक्यता असू शकते.

टीप : या लेखामध्ये सांगितलेली माहिती सामान्य स्वरूपामध्ये सांगण्यात आलेली आहे तसेच टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपचार व सल्ला देत नाहीये. या लेखातील माहितीचा वापर करण्याआधी तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असेल तर घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

इतर बातम्या:

नकली हिऱ्याची अंगठी घालून प्रपोज, अभिषेक ऐश्वर्याची ‘प्यारवाली लव्हस्टोरी’!

Rocket Boys Review : होमी भाभा आणि विक्रम साराभाई यांचा संघर्ष पाहायचा असेल तर अजिबात चुकवू नका ही वेबसिरिज

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल