AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या ड्रायव्हरमध्ये ही लक्षणं दिसली, तर तुमच्या गाडीला यमराज आडवा आलाच समजा

हे तुम्ही हसण्यावर घेत असाल, पण असं अजिबात नाहीय.हा विकार किती गंभीर आहे, हे तुम्हाला या आजारावरील तज्ज्ञ डॉक्टरही सांगतील, अपघाता एवढाच शरीरासाठीही हा विकार गंभीर आहे.

तुमच्या ड्रायव्हरमध्ये ही लक्षणं दिसली, तर तुमच्या गाडीला यमराज आडवा आलाच समजा
| Updated on: Jan 30, 2023 | 8:41 PM
Share

मुंबई : गाडीचा ड्रायव्हर पाहताना, कुणीही या साध्या गोष्टी विचारात घेतं, पण ही लक्षणं तुम्ही पाहिली आहेत, किंवा तुम्हाला माहित आहेत का?. आम्ही याबद्दल अजिबात बोलत नाहीत की, तुमच्या ड्रायव्हरने गाडी चालवताना नशा करायला नको, मोबाईल वापरायला नको, ह्या गोष्टीतर सर्वांनाच नीट माहित आहेत. पण काही लक्षणं अशी आहेत की, ती तुम्हाला माहित झाली, तर तुम्ही नक्कीच म्हणाल, यात बोलण्यात काहीतरी महत्त्वाच नक्कीच आहे. तर पाहा नेमकी कोणती लक्षणं आहेत जी ड्रायव्हरमध्ये नकोच नको.

हे अनेकांचा जीव वाचवणारं आहे.दारु पिणारा ड्रायव्हर, सिगारेट पिणारा, गाडी चालवताना मोबाईल पाहणारा, वेगाने गाडी चालवणारा ड्रायव्हर याविषयी आम्ही बोलत आहोत असं नक्कीच नाही.कारण गाडी चालवताना तुमचे डोळे उघडे असणे फार महत्त्वाचं असतं, नाहीतर एक झपकी एक अपघात हे अजिबात खोटं नाही.यासाठी तुमच्या ड्रायव्हरची पुरेशी झोप झालेली असावी.

आता झोपेबद्दल बोलल्यावर तुम्ही नक्कीच म्हणाल, एवढंच ना, झोपतो आमचा ड्रायव्हर चांगला डाराडूर. हो डाराडूर झोपत असेल तुमचा ड्रायव्हर, किंवा तुम्ही गाडी चालवत असाल तर तुम्ही. पण गाडी चालवणारी व्यक्ती जर घोरत असेल, आणि तुम्ही गाडी चालवत असाल, तर अपघाताला तुम्हाला कधीही सामोरं जावं लागेल, यामागे शास्त्रीय कारण आहे, असं म्हटलं तर चुकीचं काहीच नाही

कारण घोरणाऱ्या माणसांच्या मेंदुला आणि शरीराला हवा तेवढा ऑक्सिजन मिळत नाही, त्यांची झोप पुरेशी होत नाही. यामुळे अशा लोकांना बसल्या बसल्या डुलक्या येतात, ते कधीही झोपू शकतात. अगदी एका सेकंदाच्या आत, आणि अशा लोकांनी जर गाडी चालवली, तर अपघाताची शक्यताच वाढते.

निद्रा नाश सारखा प्रकार अशा लोकांची झोप उडवतो, इंग्रजीत याला sleep apnea म्हणजेच OSA असं म्हणतात.रात्रभर तुम्ही झोपले, पण तुम्ही घोरत असता, तर हा गंभीर निद्रा विकार असू शकतो, सकाळी डोकेदुखी, थकल्यासारखं वाटणं, निरुत्साह अशी ही लक्षणं असतात, अशा लोकांचं वजन वाढतं.ही लोकं बसल्या बसल्या, गप्पा मारतानाही कधीही झोपेची डुलकी घेऊ शकता, या लोकांना स्लीप एपनिया हा विकार असू शकतो.

या आजारामुळे फॅटी लिव्हर, वजन वाढणे, किडन्या खराब होणे, त्वचा काळी पडणे अशी अनेक रोगांची मूळ वाढतात. घोरणे हे तुम्ही हसण्यावर घेत असाल, पण असं अजिबात नाहीय.हा आजार किती गंभीर आहे, हे तुम्हाला या आजारावरील तज्ज्ञ डॉक्टरही सांगतील,

डॉ.पुष्कर शिखरकाने म्हणतात, यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक, फॅटी लिव्हर ज्यामुळे सिरोसिस, ऍसिडिटी (GERD), अपघात प्रवणता, स्मृतिभ्रंश, पार्किन्सन, वंध्यत्व, PCOD, लठ्ठपणा, व्यसनाधीनता (तंबाखू, दारू इ.), चिंता, नैराश्य, लैंगिक समस्या, खांदेदुखी, ऍलर्जी, केस गळणे, काचबिंदू या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

स्लीए एपनिया या विकारावर काही उपाय आहेत, व्यायाम प्रकार देखील आहेत, वजन जास्त असेल तर वजन कमी करणे हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. घोरण्याचा विकार असेल, तर यावर डॉक्टर मिळत नाहीत, असं सर्वसामान्य तक्रारी आहेत, त्यासाठी खाली डॉक्टरांचा संपर्क देत आहोत. डॉ. पुष्कर शिखरकाने यांच्यावर तुम्हाला नक्कीच मदत करतील.

Dr. Pushkar A. Shikarkhane 203A, Guruprabha apartment, Senapati Bapat Road, Near Kohinoor technical institute, Dadar West, Mumbai 400028 For an appointment call 022 24314506 between 10 am to 5 pm (Mon to Sat)

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.