India-US ट्रेड डील संदर्भात महत्वाची अपडेट, फायद्याचा सौदा करण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांचा अमेरिकेत लागणार कसं
India-US Trade Deal : 7 फेब्रुवारीला भारतीय वस्तूंवरील टॅरिफ मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आला. टॅरिफ 50 टक्क्यावरुन 18 टक्क्यांवर आला. रशियाकडून तेल खरेदीसाठी लावलेला अतिरिक्त 25 टक्के टॅरिफही हटवण्यात आला.

भारत आणि अमेरिकेमध्ये काही महिन्यापूर्वी ट्रेड डील फायनल झाली होती. पण त्यानंतर अमेरिकन कोर्टाने टॅरिफला बेकायद ठरवून रद्द केलं. आजपासून नव्याने ट्रेड डीलवर चर्चा सुरु होत आहे. या ट्रेड डीलमध्ये मोठे बदल होऊ शकतात. दर्पण जैन यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 12 अधिकाऱ्यांचं प्रतिनिधीमंडळ अमेरिकी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करेल. तीन दिवस ही चर्चा होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात होणारी चर्चा स्थगित झाल्यानंतर ही पहिली औपचारिक भेट आहे. भारताच्या प्रतिनिधीमंडळात वाणिज्य, सीमा शुल्क आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफचा निर्णय अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर भारतीय प्रतिनिधी मंडळाची ही चर्चा होत आहे.
त्यानंतर ट्रम्प सरकारने 24 फेब्रुवारीपासून 150 दिवसांसाठी सर्वच देशांवर एक समान 10 टक्के टॅरिफ लावला. भारताला आता अमेरिकेकडून अन्य देशांच्या तुलनेत टॅरिफमध्ये कमी सवलत मिळते. या चर्चेनंतर टॅरिफमध्ये अजून कपात होईल अशी अपेक्षा आहे. 7 फेब्रुवारीला भारतीय वस्तूंवरील टॅरिफ मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आला. टॅरिफ 50 टक्क्यावरुन 18 टक्क्यांवर आला. रशियाकडून तेल खरेदीसाठी लावलेला अतिरिक्त 25 टक्के टॅरिफही हटवण्यात आला. भारताने सुद्धा अमेरिकेला व्यापक सवलत दिली. पुढच्या पाच वर्षांसाठी भारताने एनर्जी प्रोडक्ट्स, विमान, टेक्नोलॉजी आणि कोळशासह 500 अब्ज डॉलरपर्यंत अमेरिकी सामान विकत घेण्याचं उद्दिष्ट्य ठेवलेलं.
बदल घडवण्याचा प्रयत्न
जागतिक व्यापार समीकरणात अनेक बदल झाले आहेत. अमेरिकेला मागे टाकत चीन 2025-26 मध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला. अमेरिका चार वर्षांपासून भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. मागच्या आर्थिक वर्षात भारतातून अमेरिकी निर्यातीत 0.92% किरकोळ वाढ दिसली. व्यापार वाढून 87.3 अब्ज डॉलर झाला. आयातीत 16 टक्के वाढ झाली. 52.9 अब्ज डॉलरपर्यंत आयात वाढली. बीटीएवर अंतिम स्वाक्षरी होणं अजून बाकी आहे. भारतीय अधिकारी कराराला अंतिम रुप देण्याआधी त्यात बदल घडवण्याचा प्रयत्न करतील. समुद्री उत्पादन, ज्वेलरी, कपडा याची भारतातून अमेरिकेला प्रामुख्याने निर्यात होते. अमेरिकेकडून भारत शस्त्रास्त्र मोठ्या प्रमाणात विकत घेतो.