मोठी बातमी! युद्ध पेटले, इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई ठार, कुटुंबातील सर्व सदस्यांचा मृत्यू, थेट..

इराण आणि अमेरिकेतील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांना ठार करण्यात आले. त्यांच्या कुटुंबातील एकही व्यक्ती वाचला नाही. अमेरिकेकडून थेट आयातुल्ला अली खामेनेई यांना मारण्यात आलंय.

मोठी बातमी! युद्ध पेटले, इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई ठार, कुटुंबातील सर्व सदस्यांचा मृत्यू, थेट..
Ayatollah Ali Khamenei
| Updated on: Mar 01, 2026 | 10:00 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूची घोषणा केल्याने मोठी खळबळ उडाली. काल अमेरिकेकडून इराणवर थेट हल्ला करण्यात आला. इस्त्रायल आणि अमेरिका यांनी मिळून हा हल्ला केला. त्यानंतर 24 तास युद्धाला होत नाहीत तोवरच थेट इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूचा दावा करण्यात आला. फक्त दावाच नाही तर इराणी मीडियानेही म्हटले की, आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. इराणमध्ये 40 दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला. नुकताच इस्त्रायलकडून सांगण्यात आले की, आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांचे शरीर दाखवण्यात आले. आयातुल्ला अली खामेनेई यांना अमेरिकेने हल्ल्यात ठार केल्याचे कळताच जगात मोठी खळबळ उडाली. हेच नाही तर आयातुल्ला अली खामेनेई हे एकटेच नाही तर त्यांच्या परिवारातील सर्वच सदस्यांचा हल्ल्यात मृत्यू झाल्याचेही सांगितले जात आहे.

कालच इराणने म्हटले होते की, हे युद्ध तुम्ही सुरू केले आण आम्ही संपवणार आहोत. इराण कोणत्याही परिस्थितीमध्ये हार स्वीकारण्यासाठी तयार नाही. पण आता थेट त्यांच्या नेत्याला ठार करण्यात आले. यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी सैनिकांना हत्यार टाकण्याचे आव्हानही केले. तेहरानवर मोठे हल्ले अमेरिका आणि इस्त्रायलकडून करण्यात आली.

या हल्ल्यात अनेक लोकांचे जीव गेले. सरकारी इमारतींना या हल्ल्यात टार्गेट करण्यात आले होते. इस्रायली माध्यमांच्या वृत्तानुसार, शनिवारी सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या घरावर आणि कार्यालयावर हवाई हल्ले करण्यात आले. त्यांची मुलगी, जावई, सून, नातू आणि इतर नातेवाईक घरात उपस्थित होते, त्यापैकी एकही जण जिवंत राहिले नाही.

या हल्ल्यात इस्लामिक स्टेटचे अधिकारीही मारले गेले. इराणी माध्यमांनी खामेनेई त्यांचे कुटुंब आणि इतरांच्या मृत्यूची पुष्टी केली. खामेनी यांच्या निधनानंतर इराणने 40 दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. मात्र, यानंतर जगात खळबळ उडाली. अनेक देशांनी थेट पुढे येऊन अमेरिकेच्या कारवाईचा निषेध केला.

Follow Us