जगात हाहाकार! अमेरिकेचा इराणवर अत्यंत मोठा हल्ला, ज्याची भीती तेच घडलं, थेट..

इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. यामध्ये ज्याची जगाला भीती तेच घडले. इराणवर मोठा हल्ला अमेरिकेने केला. अमेरिकेच्या या हल्ल्याने तणाव अधिक वाढल्याचे बघायला मिळत आहे.

जगात हाहाकार! अमेरिकेचा इराणवर अत्यंत मोठा हल्ला, ज्याची भीती तेच घडलं, थेट..
America attack Iran
| Updated on: May 26, 2026 | 7:10 AM

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. अमेरिकेने मोठा हल्ला इराणवर केला. युद्धविरामाची दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू होती. शिवाय युद्धविरामाच्या अत्यंत जवळ पोहोचल्याचेही सांगितले जात होते. मात्र, आता अमेरिकेने जगाची झोप उडवत थेट इराणवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या सैन्याचे म्हणणे आहे की, आम्ही आत्मरक्षाकरिता हा हल्ला केला. मिसाईल लॉन्च आणि बारूदी सुरंगे टाकणाऱ्या जहाजांना टार्गेट करून त्यांनी हल्ला केला. फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार, होर्मुज खाडीच्या अब्बास बंदराकडून बॉम्ब हल्ल्याचा मोठा आवाज आला. इराणकडून समुद्रात बारूदी सुरंगे टाकण्याचे काम सुरू होते. त्यावेळीच हा हल्ला करण्यात आला. आता अमेरिकेच्या या हल्ल्याचा इराण नक्की काय उत्तर देते हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. या घटनेनंतर इराणने आपले एअर डिफेंस मिसाईल सिस्टमला अलर्ट केले.

धक्कादायक बाब म्हणजे हा हल्ला अशावेळी झाला, ज्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले होते की, आमच्यामधील युद्धविरामाची चर्चा खूप पुढे गेले. अमेरिकेने इराणवर केलेल्या या हल्ल्यामुळे तणाव वाढण्याचे संकेत आहेत. इस्त्रायलला इराणसोबतचा युद्धविराम करार मान्य नाही. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण चर्चेपासून इस्त्रायलला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला.

Loading...

अमेरिकेचे सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅप्टन टिम हॉकिन्स यांनी या हल्ल्याबाबत बोलताना म्हटले की, अमेरिकेच्या सैन्याने दक्षिण इराणच्या भागात हल्ला याकरिता केला की, इराणी सैन्याकडून आपल्या सैनिकांना होणारा धोका टाळला जावा. होर्मुज खाडी तणाव आहे. इराणसोबतच अमेरिकेच्या सैन्याचीही तिथे तटबंदी आहे. त्यामध्येच आता हा मोठा हल्ला करण्यात आला.

इराण आणि अमेरिका यांच्या युद्धाला दोन दिवसांनी तीन महिने पूर्ण होतील. या युद्धाचा फटका जगाला मोठ्या प्रमाणात बसत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध थांबले पाहिजे, अशी मागणी सर्वांची आहे. जागतिक बाजारपेठही अस्थिर झाली. कच्च्या तेलाचे भाव वाढत असून जगापुढे मोठे संकट आहे. त्यामध्येच अमेरिकेने केलेल्या या हल्ल्याने परिस्थिती अधिक चिघळू शकते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us