AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण आणि अमेरिका युद्धविराम करारात इस्त्रायलचा मिठाचा खडा, जगावर मोठं संकट..

इराण आणि अमेरिका युद्धात चांगली बातमी येत असतानाच आता पुन्हा एकदा जगाचे टेन्शन वाढले आहे. इराण आणि अमेरिका कराराच्या अत्यंत जवळ पोहोचले आहेत. मात्र, या कराराला आता अमेरिकेच्या मित्र देशाकडून जोरदार विरोध होत आहेत. बाकी आखाती देशांनी हा कराराला पाठिंबा दिलाय.

इराण आणि अमेरिका युद्धविराम करारात इस्त्रायलचा मिठाचा खडा, जगावर मोठं संकट..
Benjamin Netanyahu
| Updated on: May 25, 2026 | 9:47 AM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबवण्याच्या दिशेने पाऊल उचलली जात आहेत. वॉशिग्टन आणि तेहरान यांच्यात खिचडी शिजणे सुरू असतानाच इस्त्रायलनेही कान टवकारली आहेत. हेच नाही तर यादरम्यान इस्त्रायलकडून थेट चिंताही व्यक्त करण्यात आली. अणुकराराच्या मुद्द्यात अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेली जवळीकता इस्त्रायलकरिता एक चिंतेचा विषय बनली आहे. हेच नाही तर करारात काय गोष्टी नक्की ठरल्या आणि युद्धविरामाची घोषणा कधी होणार, याबाबत काही माहिती स्पष्ट नसतानाच इस्त्रायलने या नव्या करारास विरोध करण्यास सुरूवात केली. हा करार अजिबातच हिताचा नसल्याचे इस्त्रायलचे म्हणणे आहे. मात्र, दुसरीकडे आखाती देशांनी या नव्या कराराला थेटपणे अमेरिकेला पाठिंबा दिला. आता कुठे ना कुठे इस्त्रायल एकटे पडल्याचे बघायला मिळत आहे. ज्या गोष्टीची इस्त्रायलला भीती होती, तीच गोष्टी आता घडताना दिसत आहे.

इस्त्रायलच्या एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने या प्रकरणात मोठा इशारा दिला. इस्त्रायली प्रसारक चॅनल 12 च्या वृत्तानुसार, इस्त्रायली अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, अमेरिका आणि इराण यांच्यातील हा करार इ्त्रायलच्या सुरक्षेसाठी एक अत्यंत मोठा धोका निर्माण करू शकते. इराण आणि अमेरिका युद्धविरामाच्या अत्यंत जवळ पोहोचलेले असताना इस्त्रायल यात पाय घालताना दिसत आहे.

इस्त्रायलच्या सुरक्षा तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, इस्त्रायल आणि अमेरिकेला भविष्यात इराणविरोधात पुन्हा मोर्चा उघडणे कठीण होऊ शकते. त्यांच्या विरोधात युद्ध लढताही येणार नाही. इस्रायल या कराराला निर्बंधांच्या दबावातून स्वतःला मुक्त करण्यासाठी इराणने रचलेला एक डाव मानतो. मात्र, या कराराकरिता अमेरिका राजी असल्याचीही माहिती मिळतंय.

आता या कराराला इस्त्रायलकडून जोरदार विरोध होत असताना पुन्हा एकदा जगाचे टेन्शन वाढल्याचे बघायला मिळत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबले पाहिजे, आता कुठेतरी युद्ध थांबण्याचे संकेत मिळत असतानाच इस्त्रायलच्या भूमिकेने हाहाकार उडाला. मात्र, इस्त्रायलचे म्हणणे अमेरिका ऐकणार की इराणसोबत युद्धविराम करार करणार हे काही वेळातच स्पष्ट होईल.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ