AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेशात पुन्हा हिंसा भडकली… बँकेचं मुख्यालयच बॉम्बने उडवलं, ढाक्यातील जाळपोळ नियंत्रणाबाहेर; शेजारच्या देशात काय घडतंय?

Bangladesh Bomb Attack: बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांच्या ग्रामीण बँकेच्या मुख्यालयाबाहेर बॉम्बने हल्ला केला. यामुळे मोठा स्फोट झाला आहे. राजधानी ढाक्यात तणाव वाढला आहे, तुरळक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत असताना हा मोठा हल्ला झाला आहे.

बांगलादेशात पुन्हा हिंसा भडकली... बँकेचं मुख्यालयच बॉम्बने उडवलं, ढाक्यातील जाळपोळ नियंत्रणाबाहेर; शेजारच्या देशात काय घडतंय?
Bangladeh Bomb Blast
| Updated on: Nov 10, 2025 | 7:02 PM
Share

बांगलादेशात पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांच्या ग्रामीण बँकेच्या मुख्यालयाबाहेर बॉम्बने हल्ला केला. यामुळे मोठा स्फोट झाला आहे. राजधानी ढाक्यात तणाव वाढला आहे, तुरळक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत असताना हा मोठा हल्ला झाला आहे. त्यामुळे आता देशात पुन्हा देशात हिंसक आंदोलने सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बँकेवर हल्ला, बसेस पेटवल्या

मुहम्मद युनूस यांच्या एका सल्लागाराच्या दुकानांसमोरही हल्लेखोरांनी बॉम्ब हल्ला केल्याचे समोर आले आहे. तसेच ढाक्यातील 2 बसेसला आग लावण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यांमध्ये कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. मीरपूर पोलिस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘ग्रामीण बँकेसमोर पहाटे 3:45 वाजता बॉम्बस्फोट झाला. यामागे कोणाचा हात आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत.

मुहम्मद युनूस यांनी 1983 साली या ग्रामीण बँकेची स्थापना केली होती, गरिबी निर्मूलन आणि महिला सक्षमीकरणात या बँकेने महत्त्वाचे योगदान दिले होते, यासाठी त्यांना 2006 मध्ये युनूस यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला होता. आता याच बँकेला उडवण्याच्या हेतून हल्ला करण्यात आला आहे.

इतरही ठिकाणी बाँम्बस्फोट

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 7:10 वाजता मोहम्मदपूर परिसरातील प्रबर्तनसमोर दोन दुचाकीस्वारांनी कच्चे बॉम्ब फेकले आणि त्यांचा मोठा स्फोट झाला. तसेच शहरातील धनमोंडी परिसरातील दोन ठिकाणी अज्ञात हल्लेखोरांनी बॉम्बस्फोट केले. तसेच इब्न सिना हॉस्पिटलजवळही बॉम्बस्फोट करण्यात आला आहे. त्यामुळे आता देशात पुन्हा एकदा अशांतता निर्माण झाली आहे.

ओल्ड ढाक्यात गुन्हेगार ठार

ओल्ड ढाका परिसरातील एका रुग्णालयासमोर 50 वर्षीय लिस्टेड गुन्हेगाराची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. हा हल्लेखोर 2023 मध्ये झालेल्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला होता. तत्पूर्वी तो अनेक वर्षे तुरुंगात होता. त्याली जामीनीवर सुटका झाली होती, आता त्याची हत्या करण्यात आली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...