AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेनंतर भारताला ‘या’ देशाचा मोठा दणका, कधीही न भरून निघणारं नुकसान होणार!

Canada Student Visa: भारत आणि अनेरिकेतील संबंध ताणलेले आहेत. गेल्या काही काळापासून अमेरिकेने भारतीय विद्यार्थ्यांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता आणखी एका देशाना भारताला मोठा दणका दिला आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

अमेरिकेनंतर भारताला 'या' देशाचा मोठा दणका, कधीही न भरून निघणारं नुकसान होणार!
Modi sad
| Updated on: Nov 03, 2025 | 9:48 PM
Share

भारत आणि अनेरिकेतील संबंध ताणलेले आहेत. गेल्या काही काळापासून अमेरिकेने भारतीय विद्यार्थ्यांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता आणखी एका देशाना भारताला मोठा दणका दिला आहे. परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. कारण आता कॅनडानेही भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा नाकारण्यास सुरुवात केली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, चारपैकी 3 भारतीय विद्यार्थ्यांचे व्हिसा अर्ज नाकारण्यात येत आहेत. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी काम करत आहेत. मात्र आता कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांची गळचेपी सुरू केली आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवर कॅनडाने कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चारपैकी तीन भारतीय विद्यार्थ्यांचे व्हिसा अर्ज रद्द करण्यात येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कॅनडात शिक्षण घेण्याचे स्वप्न भंगले आहे. याआधी अनेकजण शिक्षणासाठी कॅनडात जात होते, मात्र आता विद्यार्थ्यांची संख्या कमी होणार आहे.

कॅनडाने स्थलांतरितांची संख्या कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची व्हिसाबाबत साठी होणारी फसवणूक कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या व्हिसावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे इमिग्रेशन विभागाने दिलेल्या माहितीनुसार आकडेवारीनुसार, ऑगस्ट 2025 मध्ये जवळपास 74 % भारतीय विद्यार्थ्यांचे अर्ज नाकारण्यात आले आहेत. मात्र दोन वर्षांपूर्वी हा आकडा केवळ 32 टक्के होता.

चिनी विद्यार्थ्यांना दिलासा

कॅनडाने भारतासह अनेक देशांचे व्हिसा नाकारण्यास सुरुवात केली आहे. मात्र चिनी विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. समोर आलेल्या आकडेवारीत ऑगस्ट 2025 मध्ये कॅनडाने केवळ 24 टक्के चिनी विद्यार्थ्यांचे व्हिसा अर्ज नाकारले आहे. त्यामुळे कॅनडा चीन आणि भारतात भेदभाव करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कॅनडाच्या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे.

भारत आणि कॅनडातील संबंध

गेल्या एका दशकात अनेक भारतीय विद्यार्थ्यांनी कॅनडात शिक्षण घेतलेले आहे. मात्र आता कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांचे अर्ज नाकारण्यास सुरुवात केली आहे. याआधी माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी 2023 मध्ये सरे येथे एका कॅनेडियन व्यक्तीच्या हत्येत भारत सरकारचा सहभाग असल्याचा आरोप केला. त्यामुळे दोन्ही देशांमधील ताणलेले आहेत, त्यामुळेच कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा नाकारण्यास सुरूवात केल्याचे बोलले जात आहे.

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.