AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाचा डाग पुसण्यासाठी चीनच्या उलट्या बोंबा, आता म्हणतो, जगभरात कोरोना पसरवण्यासाठी हे 3 देश जबाबदार!

चिनी प्रशासनाने लोकांना घरातील आवश्यक वस्तू जमा करून ठेवण्यास सांगितलं आहे. सरकार पूर्णपणे झिरो टॉलरन्सचे धोरण अवलंबत आहे. पण याच दरम्यान चीनचा सरकारी मीडिया पुन्हा एकदा खोटेपणा पसरवण्याचा पुरेपुर प्रयत्न करत आहे.

कोरोनाचा डाग पुसण्यासाठी चीनच्या उलट्या बोंबा, आता म्हणतो, जगभरात कोरोना पसरवण्यासाठी हे 3 देश जबाबदार!
कोरोना इतर देशांमुळे पसरल्याचा चीनचा नवा दावा
| Edited By: | Updated on: Nov 02, 2021 | 5:57 PM
Share

China on Coronavirus Spread: चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. सरकारी आकडेही वाढताना दिसत आहेत, त्यामुळे सरकार कडक निर्बंध लादत आहे. आता तर चिनी प्रशासनाने लोकांना घरातील आवश्यक वस्तू जमा करून ठेवण्यास सांगितलं आहे. सरकार पूर्णपणे झिरो टॉलरन्सचे धोरण अवलंबत आहे. पण याच दरम्यान चीनचा सरकारी मीडिया पुन्हा एकदा खोटेपणा पसरवण्याचा पुरेपुर प्रयत्न करत आहे. जगभरात कोरोना व्हायरस पसरवल्याचा आरोप असलेला चीन आता या साथीसाठी इतर देशांना जबाबदार धरत आहे. (China alleges that coronavirus spreading from US brazil saudi arabia through meat theory of maine lobsters)

चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी ब्राझीलचे गोमांस, सौदी अरेबियाची कोळंबी आणि अमेरिकेचे मेन लॉबस्टर (Maine Lobsters Theory) यांना कोरोना संसर्गासाठी जबाबदार धरलं आहे. चिनी अजेंडा पसरवणाऱ्या एका संशोधकाने ही माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय थिंक टँक पॉलिसी रिसर्च ग्रुप (POREG) साठी लिहिणारे संशोधक मार्सेल स्लेब्स यांनी “चीन समर्थक अजेंडा असलेली” शेकडो खाती ओळखली आहेत. ज्यामध्ये निर्यात केलेल्या मांसामुळे कोरोना विषाणू पसरत असल्याचे म्हटलं आहे.’ हा अहवाल अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

कोरोनाचं सर्वात मोठं कारण कुठलं?

अहवालात म्हटले आहे की, चीनचा दावा आहे की अमेरिकेची मेन लॉबस्टर थिअरी ही वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूचे सर्वात मोठे कारण आहे. या खोट्या गोष्टी पसरवण्यासाठी चीनचे राजदूत पूर्ण सहकार्य करत आहेत. विशेष म्हणजे, 2019 च्या शेवटी चीनमध्ये कोरोनाचं पहिलं प्रकरण समोर आलं. पण चीनने इतर कोणत्याही देशाला वेळेत माहिती दिली नाही किंवा आपल्या नागरिकांवर प्रवासी निर्बंध लादले नाहीत. त्यामुळे एका विषाणूचं महामारीत रूपांतर झालं. आतापर्यंत 24 कोटींहून अधिक लोक त्याच्या विळख्यात सापडले आहेत. तर 50 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

वुहान लॅबबद्दल दावा

चीनमधील वुहानच्या प्रयोगशाळेत हा विषाणू तयार करण्यात आल्याचा दावा अनेक वैज्ञानिकांनी केला आहे. तर काही देशांनी आतापर्यंत हे बायो वेपन असल्याचे सांगितले आहे. मात्र चीनने हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. या आरोपांची जागतिक आरोग्य संघटनेने चौकशी केली. यासाठी WHOची एक टीम चीनला पोहोचली होती. मात्र तिथंही या टीमला अंधारात ठेवण्यात आलं, संपूर्ण माहिती देण्यात आली नाही. अलीकडे, पुन्हा एकदा तपासाचा मुद्दा उपस्थित झाला, तेव्हा चीनने त्यास नकार दिला. उलट इतर देश राजकारण करत असल्याचा आरोप चीन करु लागला. त्यामुळेच चीन स्वतःवरील डाग काढण्यासाठी आता इतर देशांची बदनामी करत आहे.

हेही वाचा:

अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर भारताकडून NSA स्तरावरील बैठकीचं आयोजन, पाकिस्तानने निमंत्रण नाकारलं, आता ‘हे’ देश होणार सहभागी!

Russia Covid Update: रूसमध्ये मृत्यूंची विक्रमी वाढ; सप्टेंबरमध्ये 44,265 मृत्यू, World War II नंतर सर्वाधिक

 

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.