ड्रॅगनच्या मनात आहे तरी काय ?, सलग १९ व्या महिन्यात केले हे मोठे काम, परकीय चलनसाठा…

चीन आपला सोन्याचा साठा सतत वाढवत चालला आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतीवर मोठा दबाव असताना सतत १९ व्या महिन्यात पिपल्स बँक ऑफ चायनाने आपला गोल्ड रिझर्व्ह वाढवला आहे.

ड्रॅगनच्या मनात आहे तरी काय ?, सलग १९ व्या महिन्यात केले हे मोठे काम, परकीय चलनसाठा...
xi jinping
| Updated on: Jun 07, 2026 | 7:12 PM

सोने-चांदीच्या दरात (Gold-Silver Rates) गेल्या काही काळापासून मोठी वाढ दिसत आहे. यात दरम्यान चीन या काळात सोन्याच्या जागतिक बाजारात वेगळात गेम करत आहे. ड्रगनने सातत्याने त्यांच्या सोन्याच्या साठ्या वाढ करण्याचा सपाटाला लावला आहे. मे महिन्यात देखील चीनने मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले आहे. हा लागोपाठ १९ वा महिना आहे, त्यात चीनच्या सेंट्रल बँकेने सोन्याची मोठी खरेदी केली आहे.

चीनकडे आता किती Gold रिझर्व्ह आहे ?

बातमीनुसार चीनने सतत गोल्ड खरेदी करण्याचा सिलसिला कायम ठेवला आहे.मे महिन्यात चीनमध्ये सेंट्रल बँकने (People’s Bank Of China)आपल्या रिझर्व्हमध्ये ३,२०,००० ट्रॉय औंस सोने खरेदी केले आहे. रविवारी केंद्रिय बँकच्या आकडेवारीनुसार मे महिन्यात चीनच्या सोने खरेदीनंतर चीनचा एकूण गोल्ड रिझर्व्ह वाढून आता ७४.९६ दशलक्ष औंस झाला आहे. गेल्या एप्रिल महिन्यात हा आकडा ७४.६४ दशलक्ष औंस होता.

किंमत पाहायला गेले तर गेल्या महिनाअखेरपर्यंत चीनच्या सोने भांडाराची किंमत ३४०.७५ अब्ज डॉलर होते. मार्केट एनालिस्टनुसार गेल्या महिन्यात चीनद्वारा केलेली सोने खरेदी डिसेंबर २०२४ नंतर केलेली आता पर्यंतची सर्वात मोठी मासिक खरेदी आहे. तेव्हा चीनने एक महिन्यात ३,३०,००० औंस सोन्याची खरेदी केली होती.

२०१५ नंतरची सर्वात मोठी खरेदी

चीनच्या पिपल्स बँक ऑफ चायनाने मेमध्ये सोने खरेदी करुन या सिलसिला सलग १९ व्या महिन्यापर्यंत केला आहे. दीड वर्षाहून अधिक काल चीन दर महिन्याला सोने खरेदी करत आहे. त्यामुळे चीनने आपली आर्थिक अवस्था बळकट करण्याकडे लक्ष पुरवले आहे.

साल २०१५ नंतर चीनचा सोने खरेदीचा सर्वात मोठा पल्ला आहे. ही खरेदी अशावेळी केली आहे. ज्यावेळी आंतरराष्ट्रीय कमोडिटी मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतीवर मोठा दबाव कायम आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील शांततेची चर्चा फेल झाल्यानंतर मे महिन्यात सोन्याच्या किंमती सलग तिसऱ्या महिन्यात घसरण झाली आहे. तेलाच्या वाढत्या किंमतीने महागाईची जोखीम वाढविली आणि व्याजदरात दीर्घकाळ हायलेव्हलवर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकेचा डॉलर मजबूती कायम आहे. जूनमध्ये सोन्याच्या किंमतीत घसरण जारी आहे. आणि अलिकडेच सोन्याचे दर सुमारे ४,३३० डॉलर प्रति औंस नोंदले गेले आहेत.

चीनचा ‘Gold Game’ काय?

चीनची या सोने खरेदी मागची स्ट्रॅटेजी काय आहे हे पाहणे महत्वाचे आहे. चीन आपल्या अर्थव्यवस्थेला मजबूत करणे आणि ग्लोबल अर्थव्यवस्थेत आपली पकड मजबूत करण्यासाठी सतत सोन्यावर लक्ष्य केंद्रीत करत आहे. चीनने सतत सोने खरेदी करुन केवळ गुंतवणूकच नव्हे तर हा ड्रॅगनच्या लाँगटर्म आर्थिक रणनीतीचा भाग आहे. चीन अमेरिकेच्या डॉलरवरील अवलंबित्व कमी करीत आणि आपली परकीय चलन भंडारात सोन्या सारख्या अन्य सुरक्षित संपतीला जोडत आहे.

China साठी गुड न्यूज

चीनचा सोन्याचा साठी सतत वाढत आहेच त्यामुळे या देशाच्या परकीय चलन भंडारात मोठी उसळी आली आहे. साल २०१५ नंतर परकीय चलन भंडार सर्वात हाय लेव्हलवर आहे. रविवारच्या आकड्यांनुसार मजबूत अमेरिकन डॉलर आणि वाढती जागतिक परिसंपत्तीच्या किंमती दरम्यान चीनचे विदेशी चलन भंडार मेच्या अखेरपर्यंत ३१.७ अब्ज डॉलर म्हणजे ०.९३ टक्क्यांच्या वाढीने वाढून ३.४४२२ ट्रिलियन डॉलर झाले आहे.

Follow Us