AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात कोठे सर्वाधिक खाल्ले जाते बीफ, पाकिस्तानचा क्रमांक कितवा ?

Beef Consumption: जगभरात बीफ खूप खाल्ले जाते. चला माहिती घेऊयात कोणता देश बीफ खाण्यात सर्वात पुढे आहे. या यादीत असेही अनेक देश आहेत ज्यांची नावे पाहून तुम्हाला धक्का बसेल...

जगात कोठे सर्वाधिक खाल्ले जाते बीफ, पाकिस्तानचा क्रमांक कितवा ?
Beef Consumption
| Updated on: Jun 06, 2026 | 9:21 PM
Share

Beef Consumption: जगात मासांहारी लोकांची संख्या जास्त आहे आणि बिफ हे जगात सर्वाधिक खाल्ले जाणारे मांस आहे. परंतू ज्या देशात बिफ जास्त खाल्ले जाते त्यांची नावे लोकांना आश्चर्यचकीत करु शकतात. अनेक देशात बिफ आहाराचा प्रमुख भाग आहे. परंतू मोठी लोकसंख्या आणि पाळीव प्राण्यांची मुबलकता असूनही पाकिस्तानचा समावेश बीफ खाणाऱ्या प्रमुख देशात मात्र नाही. आहे ना आश्चर्याची गोष्ठ..

प्रति व्यक्ती बीफ खाण्यात कोण सर्वात पुढे

जेव्हा प्रति व्यक्ती बीफचा खपाचा आकडेवारी पाहिली तर अर्जेंटीना जगात पहिल्या स्थानावर आहे. आंतरराष्ट्रीय आकडेवारीनुसार अर्जेंटिना सरासरी एक नागरिक दर दिवशी सुमारे ४६.९३ किलोग्रॅम बीफ खातो. बीफ खाणे तेथील संस्कृती आहे. खान-पान आणि कृषी अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहे. अमेरिकेत वार्षिक प्रति व्यक्ती सुमारे ३८.०१ किलोग्रॅम बीफ खाल्ले जात असल्याने अमेरिकेचा दुसरा क्रमांक आहे. याच प्रकारे ब्राझील देखील या बाबतीत जवळपास असून ब्राझील येथील प्रत्येक व्यक्ती वार्षिक ३५ ते ३९ किलोग्रॅम बीफ खातो.

ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा यांचा समावेश

प्रति व्यक्ती बिफ खाण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा देखील जगातील प्रमुख देशात सामील आहेत. ऑस्ट्रेलियन लोक वर्षाला प्रति व्यक्ती २६.९९ किलोग्रॅम बीफ खातात. तसेच कॅनेडीयन लोक देखील सरासरी सुमारे २७.५ किलोग्रॅम बीफ खातात.

एकूण बीफ खपात अमेरिका सर्वात पुढे

मात्र प्रति व्यक्ती बीफ खाण्याच्या बाबतीत अर्जेटीना सर्वात पुढे आहे. मात्र, संपूर्ण लोकसंख्येच्या प्रमाणात एकूण बीफ विक्रीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. अमेरिकेत जगाच्या एकूण बीफ विक्रीपैकी १७.८ टक्के बीफ विक्री होते.

चीनचा दूसरा क्रमांक

जगभरातील एकूण बीफ विक्रीच्या बाबतीत चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रति व्यक्ती बीफच्या विक्रीत अनेक पाश्चात्य देशांच्या तुलनेत कमी असला तरी चीनच्या विशाल लोकसंख्ये येथे एकूण बीफची मागणी जास्त आहे. हा देश जगातला सर्वात मोठा बीफ आयातदार देखील आहे.

पाकिस्तानचा का समावेश नाही ?

पाकिस्तानात बीफ सहज मिळत असूनही जगातील सर्वात मोठ्या ग्राहकाच्या तुलनेत येथे याचा खप खूप कमी आहे. आंतरराष्ट्रीय अंदाजानुसार पाकिस्तानात वार्षिक प्रति व्यक्ती बीफचा खप सुमारे ९.२२ किलोग्रॅम आहे.

बिफची मागणी कमी असण्यामागे आर्थिक कारणांची मोठी भूमिका आहे. वाढती महागाई, कुटुंबाचे घटते इन्कम आणि वारंवार येणारी आर्थिक आव्हाने यांच्या मुळे अनेक कुटुंबांना नियमित रुपाने मांस खाणे अडचणीचे आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात