चीनचा गुपचूप मोठा गेम, इराणला… अमेरिकेची झोप उडवणारी गुप्त माहिती समोर; युद्ध सुरू…

China vs USA : एक गुप्त अहवाल समोर आला आहे. यात लवकरच चीन इराणला मोठी मदत करणार असल्याचे समोर आले आहे. यामुळे अमेरिकेची झोप उडाली आहे.

चीनचा गुपचूप मोठा गेम, इराणला... अमेरिकेची झोप उडवणारी गुप्त माहिती समोर; युद्ध सुरू...
Iran china usa
Image Credit source: Google
| Updated on: Apr 11, 2026 | 4:46 PM

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध सध्या थांबलेले आहे, दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी कराराबाबत चर्चा सुरू आहे. या चर्चेत एकमत न झाल्यास हे युद्ध पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी दोन्ही देशांकडून तयारी केली जात असल्याचीही माहिती समोर आली आहे. या युद्धात इराणचे मोठे नुकसान झाले आहे, तसेच अमेरिकेचे मध्य पूर्वेतील अनेक हवाई तळ उद्धवस्त झाले आहेत. अशातच आता एक गुप्त अहवाल समोर आला आहे. यात लवकरच चीन इराणला मोठी मदत करणार असल्याचे समोर आले आहे. यामुळे अमेरिकेची झोप उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

चीन इराणला मदत करणार

समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकन गुप्तचर संस्थांनी असा दावा केला आहे की, चीन येत्या काही आठवड्यांत इराणला नवीन एअर डिफेन्स सिस्टीम देण्याची तयारी करत आहे. सध्या इराण आणि अमेरिका याच्यातील कराराबाबत पाकिस्तानमध्ये बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. याच काळात आता ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनने नवीन एअर डिफेन्स सिस्टीम इराणला दिल्यास हा अमेरिकेला मोठा हादरा असेल. याआधी युद्ध थांबवण्यासाठी चीनने पुढाकार घेतल्याचे समोर आले होते, त्यानंतर आता ते इराणला शस्त्रे विकत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चीनच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

गुप्त पद्धतीने शस्त्रे पाठवली जाणार?

समोर आलेल्या माहितीनुसार, इराण आपला शस्त्र साठा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. आता चीन इराणला मदत करणार असल्याची माहिती समोर आली आहे. चीन नवीन एअर डिफेन्स सिस्टीम थेट इराणला न पाठवता दुसऱ्या देशांच्या मदतीने ती इराणमध्ये पोहोचवणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे चीन इराणला थेट मदत करत आहे असा संदेश जाणार नाही आणि त्यामुळे अमेरिका किंवा इतर देशाचा दबाव चीनवर पडणार नाही.

हवेत मारा करणारी प्रणाली

चीन जे एअर डिफेन्स सिस्टीम इराणला देण्याच्या तयारीत आहे, त्या खांद्यावरून डागल्या जाणाऱ्या अँटी-एअरक्राफ्ट मिसाईल सिस्टीम आहेत, ज्यांना MANPADS (मॅनपॅड्स) म्हटले जाते. या जमिनीवरून हवेत मारा करणारे शस्त्र आहे. हे एक किंवा दोन सैनिकांद्वारे सहज वाहून नेले जाऊ शकते आणि वापरले जाऊ शकते. कमी उंचीवर उड्डाण करणाऱ्या लढाऊ विमानांसाठी ही सिस्टीम धोकादायक आहे.

Follow Us