AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांगो नदीत 700 प्रवाशांनी भरलेलं जहाज पलटी, 60 जणांचा मृत्यू, अनेकांचा शोध सुरु

कांगो नदीत जहाज दुर्घटना घडली असून 700 प्रवाशांपैकी 60 जणांचा मृत्यू झालाय तर 300 लोकांना वाचवण्यात यश आलेय. Congo river overloaded boat sink

कांगो नदीत 700 प्रवाशांनी भरलेलं जहाज पलटी, 60 जणांचा मृत्यू, अनेकांचा शोध सुरु
कांगो नदी (AFP)
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Feb 16, 2021 | 1:39 PM
Share

नवी दिल्ली: डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो (Democratic Republic of Congo) मध्ये सोमवारी रात्री 700 प्रवाशांनी भरलेली जहाज पलटल्याची घटना घडली आहे. या घटनेत 60 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जहाजातून प्रवास करणाऱ्या 700 प्रवाशांपैकी 300 लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. तर, इतर प्रवासी बेपत्ता असल्याची माहिती आहे. जहाजतून क्षमेतेपेक्षा जास्त व्यक्ती प्रवास करत असल्यानं दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. ही घटना कांगो नदीत घडली आहे. (Congo river overloaded boat sink sixty person died and most of people missing)

जहाजावर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी

कांगो देशाचे मंत्री स्टीव मबिकायी (Steve Mbikayi) यांनी जहाजातून 700 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती दिली. त्यापैकी 300 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. ही घटना माई-नोमडबे प्रांतातमध्ये घडली. ते जहाज रविवारी रात्री किनहासा प्रांतातून मबनडाका येथे जाण्यासाठी रवाना झाली होती. माई-नोमडबे प्रांतातील लोंगगोला इकोती गावाजवळ जहाज पोहोचल्यानंतर दुर्घटना घडली. मंत्री स्टीव मबिकायी यांनी दिलेल्या माहितीनुसार क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास करणे हे आहे. याशिवाय जहाजामध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजनाचं साहित्य देखील भरलं गेलं होतं. मबिकायी यांनी या घटनेत जीव गमावलेल्यांना आदरांजली व्यक्त केली आहे. तर, या घटनेत जीव गमावलेल्या परिवाराच्या सदस्यांप्रती सहवेदना व्यक्क केल्या आहेत. त्यासह या घटनेला कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

300 लोकांना वाचवण्यात यश 60 जणांचा मृत्यू

जहाजातून एकूण 700 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी 300 लोकांना वाचवण्यात यश आलं असून 60 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. इतर प्रवासी बेपत्ता असून त्यांचा शोध लागणं बाकी आहे. या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी कांगो नदीतून प्रवासाला प्राधान्य

कांगो नदीचा वापर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी केला जातो. कांगो नदीत जहाज दुर्घटना सातत्यानं होतं असतात. कांगो देशातील रस्त्यांची स्थिती खराब असल्यान लोक कांगो नदीतून प्रवासाला प्राधान्य देतात. यामुळे जहाजातून प्रवास करताना क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी एका जहाजामध्ये बसलेले आढळतात. कांगोमधील रहिवाशांसाठी कांगो नदीतून प्रवास करणं सोपा पर्याय आहे. मात्र, जहाजातून अधिक लोक प्रवास करत असल्यानं दुर्घटना घडतात. कांगोमधील अर्थव्यवस्था खराब असल्यामुळे पायाभूत सोयी सुविधांचा विकास झालेला नाही.

संबंधित बातम्या:

डोळ्यांदेखत पाहिला पत्नीचा मृत्यू, भरधाव पिकअपने जोडप्याला 7 फुटांपर्यंत फरफटत नेलं अन्…

धक्कादायक, लँडिंगआधी काही अंतरावर विमान डोंगराला धडकलं, प्रवास करणाऱ्या सर्व 119 जणांचा मृत्यू

(Congo river overloaded boat sink sixty person died and most of people missing

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...