Donald Trump : अमेरिकेने भर समुद्रात जहाज उडवलं, ट्रम्प यांच्या निर्णयानंतर खळबळ…आता समुद्रात युद्ध?

अमेरिका हा देश कधी काय करेल हे सांगता येत नाही. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाने एक जहाज थेट उडवून टाकण्यात आले आहे.

Donald Trump : अमेरिकेने भर समुद्रात जहाज उडवलं, ट्रम्प यांच्या निर्णयानंतर खळबळ...आता समुद्रात युद्ध?
donald trump and venezuela ship attack
| Updated on: Oct 15, 2025 | 4:01 PM

Venezuela Ship Attack : अमेरिका हा या जगातील एकमेव महाशक्ती देश आहे. या देशाने एखादा निर्णय घेतल्यास त्याचा फटका संपूर्ण जगावर पडतो. या देशाचे लष्करी सामर्थ्यदेखील चांगलेच मोठे आहे. त्यामुळेच या देशाला अन्य देश घाबरून असतात. अमेरिका आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी टोकाची कारवाई करण्यासदेखील तयार असतो. लादेनला मारण्यासाठी तर अमेरिकेने थेट पाकिस्तानात घुसून कारवाई केली होती. दरम्यान, आता याच अमेरिकेच्या एका कारवाईची जगभरात चर्चा होत आहे. या देशाच्या लष्कराने भर समुद्रात एक जहाज उडवून टाकले आहे. थेट हल्ला केल्यामुळे या जहाजातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

नेमका कुठे हल्ला केला? हल्ला का केला?

या हल्ल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच दिली आहे. त्यांनी ट्रुथ या आपल्या सोशल मीडिया खात्यावर या हल्ल्याची माहिती दिली आहे. या माहितीनुसार अमेरिकेच्या सैन्याने समुद्रात व्हेनेझुएलाजवळ एका हजारावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. याच हल्ल्याबाबत सिन्हुआ या वृत्त संस्थेनेही माहिती दिली आहे. ड्रग्स तस्करीच्या संशयाखाली अमरेकिने आतापर्यंत अशा अनेक कारवाया केल्या आहेत. या कारवायांत आतापर्यंत 27 लोकांचा मृत्यू झालेला आहे. अमेरिकनेने या सर्व कारवाया व्हेनेझुएलाच्या आसपासच केल्या आहेत, असे सिन्हुआ या वृत्तसंस्थेने सांगितले आहे. हल्ला करण्यात आलेले जहाज ड्रग्स तस्करीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सागरी मार्गाने निघाले होते. तसेच हे हजाज ड्रग्ज, नशा आणणाऱ्या पदार्थांच्या तस्करीसाठी दहशतवादी नेटवर्कशी संबंधित होते, अशी गुप्त माहिती अमेरिकन गुप्तचर संस्थांनी दिली होती. याच माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

व्हेनेझुएलाचा आरोप काय?

ड्रग्स तस्करी थांबावी यासाठी आम्ही जहाजावर ही कारवाई केली आहे, असे अमेरिकेकडून सांगितले जात आहे. पण व्हेनेझुएलाने मात्र वेगळाच आरोप केला आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती नकोलस मादुरो यांनी या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिका ड्रग्स कार्टेल हे फक्त कारण सांगत आहे. मात्र अमेरिकेला व्हेनेझुएलातील सरकार बदलायचे आहे. सोबतच अमेरिकेला व्हेनेझुएलात आपल्या सैन्याची उपस्थिती आणखी वाढवायची आहे. त्यामुळेच अशा प्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत, असा आरोप मादुरो यांनी केला आहे.

व्हेनेझुएलाने केला होता निषेध

काही दिवसांपूर्वी अमेरिकेची लढाऊ विमाने व्हेनेझुएलाच्या सीमेच्या साधारण 75 किमी जवळ पोहोचली होती. त्यावेळी अमेरिकेच्या या कृत्याचा व्हेनेझुएलाने निषेध केला होता. आता अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या समुद्रकिनाऱ्याजवळी एक जहाजच उडवून टाकले आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.