इस्त्रायलचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठा घात, पकडला इराणचा हात, थेट..
US Iran Peace Talk : इराण आणि अमेरिका युद्धात धक्कादायक माहिती पुढे येत आहे. ज्याने एकच खळबळ उडाली. अमेरिकेने आपल्या मित्र देशालाच धोका दिला. थेट इराणची साथ अमेरिकेने दिली आहे. ज्याने एकच थयथयाट बघायला मिळत आहे.

इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम शांतता करारावर चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे युद्धविरामाच्या अत्यंत जवळ दोन्ही देश पोहोचल्याचे सांगितले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या जवळच्या मित्राला मोठा दणका दिल्याचे बघायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या सुरू असलेल्या युद्धविराम चर्चेतून इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना थेट बाजूला काढले. सध्या नक्की काय चर्चा सुरू आहे आणि कोणत्या मुद्द्यावर करार होत आहे, यापासून इस्त्रायलला बाजूला काढण्यात आले. न्यूयॉर्क टाइम्सने शनिवारी दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणच्या मुद्द्यावर पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना बाजूला सारत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना आता कोणत्याही परिस्थितीमध्ये शांती हवी आहे. न्यूयॉर्क टाइम्सनेच्या रिपोर्टनुसार, अमेरिका आणि इराण यांच्या युद्धात इस्त्रायलला चर्चेतून जवळपास पूर्णपणे वगळण्यात आलंय.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रायलला या युद्धविराम कराराबाबत काहीच माहिती दिली जात नाहीये. यादरम्यान माहिती मिळवण्याकरिता इस्नायलने एक वेगळा मार्ग अवलंबला आहे. राजनैतिक संबंध आणि इराणच्यामध्ये असलेल्या गुप्त सुत्रांकडून इस्त्रायल माहिती मिळवत आहे. इस्त्रायलचा ज्याने साधा कधी विचारही केला नाही, असे काम डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून केले जात आहे.
ॲक्सिऑसच्या एका अहवालानुसार, हा अहवाल नेतान्याहू यांना मिळाल्यानंतर त्यांनी ट्रम्प यांच्यासोबत फोनवरून संवाद साधत संतप्त प्रतिक्रिया दिली. ज्यावेळी ते ट्रम्प यांना बोलत होते, त्यावेळी ते अत्यंत संतप्त होऊनच बोलत होते. यावरून आता हे स्पष्ट दिसत आहे की, सध्याच्या परिस्थितीला डोनाल्ड ट्रम्प यांना इस्त्रायलला मान्य असो किंवा नसो.. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना युद्धविराम करारा करायचा आहे.
28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्तपणे मोठी कारवाई केली. या कारवाईने जगात खळबळ उडावी. थेट इराणच्या सर्वाेच्च नेत्याची पहिल्याच हल्ल्यात हत्या करण्यात आली. त्यानंतर इराण इतका खंबीरपणे उभा राहिल, याचा साधा विचारही कोणी केल नाही. इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद झाल्याने तेलाचा मोठा तुटवडा निर्माण झाला.