AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणची अमेरिकेला थेट मोठी धमकी, अमेरिकेत उडाली खळबळ, उद्ध्वस्त होण्याकरिता..

इराण आणि अमेरिका यांच्यात गेल्या अडीच महिन्यांपेक्षा जास्त काळापासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाहीत. दोन्ही देशांमध्ये युद्धविरामाबाबत चर्चा सुरू आहे. दुसरीकडे इराणकडून आता अमेरिकेला अत्यंत मोठी धमकी देण्यात आली.

इराणची अमेरिकेला थेट मोठी धमकी, अमेरिकेत उडाली खळबळ, उद्ध्वस्त होण्याकरिता..
Iran threat to America
| Updated on: May 25, 2026 | 10:40 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धविराम कराराच्या अत्यंत जवळ पोहोचल्याचे सांगितले जात असतानाच मोठा इशारा इराणकडून देण्यात आला. इराणच्या या इशाऱ्याने एकच मोठी खळबळ उडाली. वॉशिंग्टनला थेट हा इशारा देण्यात आला. इराणकडून स्पष्ट सांगण्यात आले की, स्वत:ची वाट लावून घेण्यापासून अमेरिकेला जर वाचायचे असेल तर इराणने ठेवलेल्या अटी मानल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्यांच्याकडे नाही. होर्मुज खाडीत इराणचे नियंत्रण स्वीकारणे हा त्यांच्याकरिता चांगला निर्णय असेल. या युद्धादरम्यान अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजून ती पूर्ण उद्धवस्थ होणार हे नक्की आहे. इराणचे सर्वाेच्च नेते मोजतबा खामेनेई यांचे सल्लागार मोहसेन रेजाई यांनी अमेरिकेला मोठा संदेश दिला. इराणची तस्त्रीम न्यूज एजन्सीला बोलताना रेजाई यांनी म्हटले की, होर्मुज खाडीत इराणचे नियंत्रण हे कायद्याने अगदी बरोबर आहे. ते कायदेशीर आहे.

त्यांनी स्पष्ट केले की, होर्मुज खाडीवर नियंत्रण म्हणणे आम्हाला जागतिक बाजार रोखायचा नाहीये. फारस खाडीतील असुरक्षा रोखणे आणि बाहेरील देशांच्या लष्कराला रोखणे हा इराणचा मुख्य उद्देश आहे. पुढे अमेरिकेला इशारा देत त्यांनी म्हटले की, जर युद्धाच्या रस्त्यांनी चालण्याचे अमेरिकेने ठरवले तर त्यांना त्याचे मोठे नुकसान सहन करावे लागेल. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर याचा गंभीर परिणाम होईल आणि उद्धवस्थ होईल.

इराणसोबत चर्चा करून मार्ग काढण्यातच अमेरिकेचा फायदा असल्याचेही त्यांनी म्हटले. यादरम्यान मोहसेन रेजाई यांनी म्हटले की, जर इराणला भीती घालण्याची किंवा कोणत्याही बॉम्ब हल्ल्याची धमकी दिली तर इराण कोणत्याही क्षणी परमाणु अण्वस्त्र प्रसारबंदीच्या जागतिक करारातून म्हणजेच एनपीटीमधून तात्काळ माघार घेऊ शकते.

इराणची ही अत्यंत मोठी धमकी म्हणावी लागणार आहे. अमेरिकेसोबतच्या युद्धात कोणत्याही परिस्थितीमध्ये इराण माघार घेताना दिसत नाही. उलट आता त्यांनी अमेरिकेलाच धमकी दिल्याचे बघायला मिळत आहे. इराण युद्धाचा मोठा परिणाम अमेरिकेत बघायला मिळत आहे. स्थिती अधिक गंभीर होत आहे. त्यामध्येच आता इराणच्या अटी अमेरिका मान्य करणार असल्याचे संकेत आहेत, अमेरिका सर्व बाजूने फसल्याचेही बोलले जात आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ