जगाची उडाली झोप, डोनाल्ड ट्रम्प यांची भयंकर मोठी घोषणा, थेट या देशावर..

डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच मोठी घोषणा केली असून अमेरिका आता अजून एका देशावर हल्ला करणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे बोलणे ऐकून जगाची झोप उडाली असून महायुद्धाच्या दिशेने अमेरिकेने एक अजून पाऊस टाकल्याचे बोलले जातंय.

जगाची उडाली झोप, डोनाल्ड ट्रम्प यांची भयंकर मोठी घोषणा, थेट या देशावर..
Donald Trump major announcement
| Updated on: Jan 09, 2026 | 9:52 AM

अमेरिकेने मोठी कारवाई वेनेजुएलावर करत थेट त्यांच्या अध्यक्षांना पत्नीसह अटक करत अमेरिकेत आणले. तेलासाठी हा मोठा खेळ सुरू झाला. आता अमेरिकेने वेनेजुएलाच्या तेलावर नियंत्रण मिळवले. पुढच्या आठवड्यात अमेरिकेचे अधिकारी वेनेजुएलातील तेल कंपन्यांसोबत महत्वाची बैठक घेणार आहेत. मात्र, अमेरिकेने ज्याप्रकारे वेनेजुएलावर हल्ले करत त्यांच्या तेलावर नियंत्रण मिळवले, त्यानंतर देशात खळबळ उडाली. त्यावेळी ते अंमली पदार्थांची तस्करी वेनेजुएलामधून होत असल्याचा दावा करत हल्ले करताना दिसले. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात वेनेजुएलाच्या जवळपास 40 नागरिकांचा जीव गेला. अमेरिकेने मेक्सिकोमध्ये जमिनीवरील लष्करी कारवाई सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी रात्री फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ही घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या विधानाने जगात खळबळ उडाली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, आम्ही आता अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध थेट जमिनीवरील कारवाई करणार आहोत. मेक्सिकोमधून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी होते. तेथील परिस्थिती पाहून आम्हाला नक्कीच दु:ख होते. तेथील अंमली पदार्थांचे तस्कर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. कारण अमेरिकेत दरवर्षी 300,000 लोकांचे जीव यामुळे जातात.

यादरम्यान बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, समुद्रातून येणारी 97 टक्के अंमली पदार्थांची तस्करी आम्ही रोखली आहे. आम्ही अंमली पदार्थ तस्करांच्या टोळ्यांविरुद्ध लवकरच जमिनीवरील कारवाई सुरू करणार आहोत. ट्रम्प यांनी मेक्सिकोमध्ये जमिनीवरून हल्ला करण्याचा इशारा दिला. मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शिनबाम यांनी अमेरिकेकडून कोणत्याही प्रकारच्या लष्करी कारवाईला तीव्र विरोध केला आहे.

मेक्सिकोच्या जमिनीवर येऊन कोणचीही कारवाई आम्ही सहन करणार नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटले. वेनेजुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर मेक्सिको असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिका आणि मेक्सिकोतील तणाव वाढल्याचे सध्या बघायला मिळत आहे. सुरक्षेसंदर्भात मेक्सिकोने अमेरिकेसोबत सहकार्य करावे, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. मात्र, मेक्सिकोने स्पष्ट केले की, कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या भूमीवर येऊन हल्ले करू देणार नाहीत.