भारतीयांविरोधात बांगलादेशचे धक्कादायक पाऊल, मुंबई, कोलकता आणि थेट चेन्नईमध्येही…
मागील काही दिवसांपासून भारत आणि बांगलादेशामध्ये प्रचंड असा तणाव वाढला. भारतीय दूतावास कार्यालयावर बांगलादेशात मोठी दगडफेक करण्यात आली. त्यानंतर आता बांगलादेशाने थेट धक्कादायक निर्णय घेतला.

भारत आणि बांगलादेशातील अनेक वर्षांचे चांगले संबंध सध्या तणावात असल्याचे बघायला मिळतंय. हिंदू लोकांवर बांगलादेशात प्रचंड अत्याचार होत असून भर दिवसा आणि बाजारपेठेत त्यांची हत्या केली जात आहे. फेब्रुवारी महिन्यात बांगलादेशात निवडणुका आहेत. मात्र, त्यापूर्वीच बांगलादेश अस्थिर होताना दिसतोय. कट्टरपंथींकडून विद्यापीठांचीही तोडफोड केली जात आहे. भारतीय दूतावास कार्यालयावर मोठा हल्ला करण्यात आला आणि दगडफेक करून तोडफोड करण्यात आली. भारत आणि बांगलादेशातील संबंध तणावात असतानाच बांगलादेशातील परिस्थितीवर सरकारचे बारीक लक्ष असून हिंदूंवरील होणारे अत्याचार थांबवावे, याकरिता पाऊले उचचली जात आहेत. याचे पडसाद थेट आयपीएल सामन्यांवरही बघायला मिळत आहेत. बांगलादेशच्या खेळाडूला आयपीएलमध्ये न घेण्याविरोधात लोक आक्रमक झाले. शेवटी केकेआरला बांगलादेशच्या खेळाडूसोबत केलेला करारही रद्द करावा लागला.
आता भारत आणि बांगलादेशमध्ये व्हिसाच्या मुद्द्यावरून तणाव वाढला. बांगलादेशने भारतीय नागरिकांसाठी व्हिजा प्रतिबंधना अधिक कडक करत मुंबई, चेन्नई आणि कोलकता येथे हाय कमिशन व्हिसा सेवा बंद केली. मिळालेल्या माहितीनुसार, बांग्लादेशच्या विदेश मंत्रालयाने बुधवारी रात्री नवीन आदेशानुसार, व्यवसाय आणि रोजगार व्हिसा वगळता इतर सर्व प्रकारच्या व्हिसांवर तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला.
यादरम्यान बांगलादेशने सुरक्षेची कारणे पुढे करत हा निर्णय घेत असल्याचे म्हटले. मागील काही दिवसांपासून भारत आणि बांगलादेशातील संबंध अधिक तणावात असल्याचे दिसतंय. माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर भारताने त्यांना शरण दिले असून शेख हसीना भारतात आहेत.
बांगलादेशच्या मंत्रालयाने म्हटले की, सध्याच्या परिस्थितीत गंभीर सुरक्षाविषयक चिंता आहेत, त्यामुळेच आम्ही अशाप्रकारचा निर्णय घेत आहोत. त्यांनी स्पष्ट म्हटले की, हा निर्णय कोणत्याही एका गोष्टीमुळे नाही तर अनेक गोष्टींवरून आम्ही घेतले. आता भारतीय लोकांना बांगलादेशात जाता येणार नाही. भारताने देखील काही दिवसांपूर्वीच बांगलादेशातून येणाऱ्या लोकांवर काही निर्बंध लादले आहेत. मुळात म्हणजे भारतातून बांगलादेशात जाणाऱ्या लोकांची संख्या तशी फार काही नाही. यामुळे याचा काही फटका भारतात बसणार नाहीये.
