AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घराचं खोदकाम सुरू असताना सापडलं घबाड; कुदळीने खोदता खोदता खळ्ळं खळ्ळं आवाज आला अन् मातीतून…

Treasure Found in Beed : बीड जिल्ह्यात घराच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू असताना सापडलेला खजिना पोलिसांनी आणि महसूल प्रशासनाचे जप्त केला आहे. याची सखोल चौकशी सुरू आहे.

घराचं खोदकाम सुरू असताना सापडलं घबाड; कुदळीने खोदता खोदता खळ्ळं खळ्ळं आवाज आला अन् मातीतून...
Coin FoundImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Mar 04, 2026 | 5:32 PM
Share

एखाद्या ठिकाणी खोदकाम करताना मोठा खजिना सापडल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा वाचल्या असतील. जुन्या काळातील लोक चोरांच्या भीतीने सोनं-दागिने किंवा पैसे जमिनीत पुरून ठेवत असत. त्यामुळे आता काही कामासाठी खोदकाम करताना अनकेदा दागिने किंवा इतर महत्त्वाच्या वस्तू सापडतात. असाच एक खजिना बीड जिल्ह्यात सापडला आहे. घराच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू असताना सापडलेला खजिना पोलिसांनी आणि महसूल प्रशासनाचे जप्त केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बीडमध्ये चांदीची 250 नाणी सापडली

बीडच्या आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे घराच्या बांधकामासाठी खोदकाम करण्यात येत होते. या खोदकामादरम्यान चांदीची 250 नाणी आढळून आली आहेत. पोलिसांनी पंचनामा करून तहसील प्रशासनाकडे ही नाणी जमा केली आहेत. मात्र यातील बरीच नाणी गायब असल्याचं नागरिकांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे आता ही नाणी नेमकी कुठे गेली याचा शोध घेण्याचं आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.

नाण्यांवर One Rupee India 1941 असा उल्लेख

समोर आलेल्या माहितीनुसार, आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील शशिकांत खुटाळे यांच्या घराच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या खोदकामात मातीच्या ढिगार्‍यात मुलांना चांदीची नाणी आढळून आली. याची चर्चा गावभर पसरली. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस आणि महसूल विभागाने घटनास्थळी धाव घेत आढळून आलेली 250 चांदीची नाणी जप्त केली आहेत. या नाण्यांवर One Rupee India 1941 असा उल्लेख असून ती शुद्ध चांदीची असल्याचे सांगण्यात येत आहे.

आणखी मोठा खजिना सापडण्याची शक्यता

महसूल प्रशासनाने ही नाणी ताब्यात घेतली असली तरी याची संख्या अधिक असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर तहसील प्रशासनाने पुरातत्व विभागाला याबाबत माहिती दिली आहे. खोदकामादरम्यान जवळपास चार ते पाच किलो नाण्यांचा साठा आढळून आल्याचा संशय आहे. तसेच या ठिकाणी अजूनही मोठा खजिना सापडण्याची शक्यता आहे. ही नाणी कुणी लपवली होती? तसेच सापडलेली इतर नाणी कुणाकडे आहेत? याची चौकशी पोलिसांसह महसूल प्रशासनाकडून सुरू आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...