Gold Silver Price : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाने सराफा बाजारात मोठी खळबळ, सोने धाड धाड कोसळले, चांदी 10 हजारांनी स्वस्त..
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून सतत आपल्या भूमिक बदलत आहेत. त्यातच आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानाने सराफा बाजारात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. सोन्याचे भाव कोसळले आहेत.

इराण आणि अमेरिका यांच्या युद्धात सोन्याचे भाव घसरताना दिसले. त्यातच अमेरिकेच्या अध्यक्षांनी एक विधान केले, ज्याचा परिणाम थेट सराफा बाजारात बघायला मिळतोय. मध्यंतरी सोन्याचे भाव वधारले होते. आता पुन्हा सोन्याच्या भावात मोठी घसरण नोंदवण्यात आली. सोन्याच्या भावात घसरण झाली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानाचा परिणाम सोन्याच्या आणि चांदीच्या भावावर झाला. मागील काही दिवसांपासून जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यातच सोन्याचे भाव घसरले. आता पुन्हा सराफा बाजारात वादळ आले. भारतात पुढील काही दिवसात सणवार आहेत. यावेळी सोन्याच्या दरात वाढ होईल, असे सांगितले जातंय. मात्र, प्रत्यक्षात सोन्याच्या दरात घसरण होताना दिसतंय.
देशातील विविध शहरांमध्ये एका आठवड्यातच सोन्याच्या दरात तब्बल 3 हजार 760 रूपयांनी घसरण झाली. 22 कॅरेटच्या भावात 3 हजार 450 रूपयांनी घसरण झाली. त्यातच आजही सोन्याचा भाव घसरला आहे. फक्त सोनेच नाही तर चांदीच्या भावातही मोठी घसरण झाली. एका आठवड्यात चांदीचा भाव तब्बल 10 हजारांनी घसरला आहे. पुढील काही दिवसात ही घसरण कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.
राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,47,810 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,35,500 रूपये झाला. मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,35,350 रूपये झाली. आठवड्याभरात सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली. दुसरीकडे चांदीचेही भाव घसरले. अजून सोने स्वस्त होण्याची शक्यता असल्याचे बघायला मिळतंय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्याचा पर्याय शोधला जात असल्याचे म्हटले.
ज्यानंतर पुन्हा सोने घसरताना दिसतंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यंतरी म्हटले होते की, अमेरिकेतील निवडणुका होऊपर्यंत अमेरिका युद्धापासून दूर राहिल. त्यातच त्यांनी आता विधान केले की, आम्ही इराणवर हल्ला करण्यासाठी नवीन पर्याय शोधत आहोत. आम्ही परमाणू हल्ला करणार नाहीत, पण इराणवर पर्यायी हल्ला करणार आहोत. ज्याने पुन्हा जागतिक बाजारात खळबळ उडाली असून अमेरिका इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे.