AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प आपटले तोंडावर, तो दावा खोटा, इराणच्या..

इराण आणि अमेरिका युद्ध पेटले. आता हल्ले थांबवण्यात आली. मात्र, हल्ले जरी थांबवण्यात आली असली तरीही होर्मुज खाडीतील तणाव काही कमी होत नाहीये. त्यात मोठा हल्ला करण्यात आला. भारताने याचा निषेध केलाय.

डोनाल्ड ट्रम्प आपटले तोंडावर, तो दावा खोटा, इराणच्या..
Donald Trump
| Updated on: Oct 12, 2026 | 12:07 PM
Share

मागील काही महिन्यांपासून होर्मुज खाडीत तणाव वाढला आहे. इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडीत मोठा तणाव होता. होर्मुज खाडी आपल्या ताब्यात घेण्यासाठी अमेरिकेने मोठे प्रयत्न केले पण त्यांना यश मिळाले नाही. या भागातून होणाऱ्या जहाजांच्या वाहतुकीबाबत बरीच चर्चा होत असली तरी वास्तव हे आहे की होर्मुजचा हा मार्ग आता मृत्यूची दरी बनला आहे. कधी कुठून हल्ला होईल, हे सांगणे कठीण आहे. भारतासारख्या देशांना होर्मुज खाडी वापरल्याशिवाय पर्यायच नाही. मागील काही दिवसांपासून भारतीय जहाजांवर हल्ले होत आहेत. भारताने यावर भूमिकाही घेतली आहे. भारतात दाखल होणार एलपीजी गॅस याच मार्गाने भारतात दाखल होतो. एखादे जहाज या मार्गावरून सुरक्षितपणे आपल्या गंतव्यस्थानी पोहोचेल की नाही, हे बऱ्याच अंशी नशिबावर अवलंबून असते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला होता की, होर्मुज खाडीतील समुद्रातील सुरुंगे त्यांच्याकडून काढण्यात आली. मात्र, त्यांचा हा दावा खोटा असल्याचे दिसतंय. दरम्यान इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या नौदलाने दावा केला आहे की, 11 ऑक्टोबर रोजी एका तिसऱ्या तेल टँकरला ‘नेव्हल माइन’चा समुद्रातील सुरुंग फटका बसला. धडकेनंतर मोठा स्फोट झाला. ज्यानंतर जहाजाला मोठी आग लागली. आयआरजीसीच्या माहितीनुसार, या शटल टँकरमधून सुमारे 7,50,000 बॅरल्स कच्चे तेल वाहून नेले जात होते.

इराणने यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली. इराणकडून स्पष्ट करण्यात आले की, या टँकरने यापूर्वी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. तेहरानच्या मते अनधिकृत असलेल्या सागरी मार्गावरून जाण्याचा प्रयत्न केला. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांवर प्रसारित करण्यात आलेल्या आयआरजीसीच्या नौदलाच्या निवेदनानुसार, या जहाजाची नेव्हिगेशन आणि पोझिशनिंग यंत्रणा बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर हे जहाज धोकादायक मार्गावर गेले.

इराणने ज्याठिकाणी जाण्यास नकार दिला होता. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि आग लागली. युनायटेड किंगडम मॅरिटाइम ट्रेड ऑपरेशन्सने ओमानमधील सोहार अँकरेजजवळ एका टँकरवर ड्रोनद्वारे हल्ला झाल्याची आणखी एक घटना असल्याचे दुजोरा दिला आहे. स्थानिक अधिकारी जहाजावरील कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने होर्मुजची सामुद्रधुनी परिसरातील व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांचा निषेध केला आहे. या जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर दोन भारतीय खलाशी बेपत्ता असल्याचे वृत्त आहे.

Follow Us
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...