AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

60 किमी वेगाने धडकणार महासंकट, धो धो पाऊस, या राज्यांमध्ये अलर्ट जारी..

देशातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. कुठे पाऊस तर कुठे कडाक्याची थंडी अशी स्थिती बघायला मिळत आहे. जोरदार वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे.

60 किमी वेगाने धडकणार महासंकट, धो धो पाऊस, या राज्यांमध्ये अलर्ट जारी..
Indian weather
| Updated on: Nov 25, 2026 | 10:03 AM
Share

येत्या काही दिवसात हवामानात प्रचंड बदल होण्याचे संकेत आहेत. भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. देशात एल निनोचा प्रचंड मोठा प्रभाव बघायला मिळत आहे. कधी थंडी तर कधी पाऊस अशी स्थिती बघायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने 30 नोव्हेंबरपर्यंत दक्षिण भारतातील अनेक राज्यांत पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाचा मोठा इशारा दिला. केरळ, तामिळनाडू, माहे, कराईकल आणि पुद्दुचेरीत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. आंध्र प्रदेश, रायलसीमा, कर्नाटक आणि तेलंगणासह विविध भागांत पाऊस, मेघगर्जना आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. अनेक राज्यातून थंडी हळूहळू कमी होताना दिसत आहे. काही ठिकाणी गारठ्याचाही इशारा देण्यात आला.

दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये सकाळच्या वेळी दाट धुक्याबाबत इशारा देण्यात आला. एकीकडे कडाक्याची थंडी तर दुसरीकडे पावसाचा इशारा देण्यात आला. हवामान विभागाच्या मते, हवामानातील हा बदल अनेक घटकांच्या एकत्रित परिणामामुळे झाला आहे. पुढील काही दिवस काही राज्यात पाऊस होईल. देशातून मॉन्सून गेला आहे.

मॉन्सून गेल्यानंतरही पाऊस कोसळताना दिसत आहे. विक्षोभ, चक्रीय वाऱ्यांची स्थिती आणि पूर्वेकडील वाऱ्यांमधील द्रोणी यांचा समावेश आहे. एका पश्चिमी विक्षोभाशी संबंधित द्रोणी 28° उत्तर अक्षांशाच्या उत्तरेस, 90° पूर्व रेखांशाजवळ स्थित आहे. दक्षिण भारतात पावसाचा जोर कायम असताना उत्तरेकडे कडाक्याची थंडी आहे. हवामान विभागाने छत्तीसगडमध्ये दाट धुक्याचा इशारा दिला आहे.

ताशी 60 किमी वेगाने वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यातच मुंबईमध्ये आज AQI 140 च्या घरात नोंदवला गेलाय. काही भागांमध्ये मात्र हवेचा गुणवत्ता निर्देशांक 200 च्या पुढे गेला आहे. हवा ‘अस्वस्थ’ श्रेणीत आहे. हवेतील प्रमुख प्रदूषकांमध्ये PM2.5 आणि PM10 चे प्रमाण अधिक आहे. PM2.5 ची पातळी 101 मायक्रोग्रॅम, तर PM10 सुमारे 130 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर नोंदवला गेलाय. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून प्रदूषण खूप जास्त प्रमाणात वाढले आहे, त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.

Follow Us
रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चावरून सुप्रिया सुळे नाराज? विश्वासात...
Rohit Pawar : रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चावरून सुप्रिया सुळे नाराज? विश्वासात घेतले नाही, पत्रकार परिषदेत फोटोही नव्हता- सूत्र
नागपुरात मोर्चाची तयारी, इकडे सरकारकडून बैठकीचं आमंत्रण; रोहित पवार...
Chandrashekhar Bawankule : नागपुरात मोर्चाची तयारी, इकडे सरकारकडून बैठकीचं आमंत्रण; रोहित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
रोहित पवारांची नागपुरात दोन तास गुप्त बैठक; ट्रॅक्टर मोर्चाआधी नेमकी
Rohit Pawar : रोहित पवारांची नागपुरात दोन तास गुप्त बैठक; ट्रॅक्टर मोर्चाआधी नेमकी काय रणनीती ठरली?
रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्य
Pune : रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्यावर 20 वर्षीय तरुणाला जीवदान
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं
Aditya Thackearay : आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं; नेमकं कारण काय?
शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह..
Shivsena : शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज युक्तिवाद
ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील...
Rohit Pawar Tractor Morcha : ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील चर्चांना पुन्हा उधाण
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी