AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासगी तेल कंपन्यांकडून मोठी भाव वाढ, सरकारी तेल कंपन्यांनी जारी केले आजचे पेट्रोल डिझेलचे दर..

Petrol and diesel prices : इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले होते. यादरम्यान जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती भडकताना दिसल्या. असूनही युद्ध थांबले नाही. त्यातच जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव अस्थिर झाले. तेल कंपन्या भावात वाढ करत आहेत.

खासगी तेल कंपन्यांकडून मोठी भाव वाढ, सरकारी तेल कंपन्यांनी जारी केले आजचे पेट्रोल डिझेलचे दर..
petrol and diesel prices
| Updated on: Oct 12, 2026 | 8:37 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात जागतिक बाजार संकटात आला. इराणवर अमेरिकेने हल्ले केले आणि जागतिक बाजारात कच्चे तेल भडकले. इराण आणि अमेरिका युद्धाची झळ जगाला बसली. तेल पुरवठा विस्कळीत झाला. भारतातही पेट्रोल डिझेलच्या किंमती झपाट्याने वाढल्या. तब्बल चार वेळा भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर भडकले. इराण आणि अमेरिका युद्धात भारतातही महागाई वाढली. अजूनही तेलाचे दर स्थिर झाले नाहीत, भारतीय तेल कंपन्यांवरील दबाव वाढला आहे. रिलायंस ग्रुपची कंपनी जियो बीपीने किंमतीमध्ये वाढ केली. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे आजचे भाव जाहीर केले आहेत. जियो बीपीने रविवारी पेट्रोलच्या भावात 5 रूपयांनी वाढ केली तर डिझेलच्या भावात 3 रूपयांनी वाठ केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंजाबमध्ये पेट्रोलचा दर 108.54 आणि डिझेलचा भाव 99.19 प्रति लीटर गेला.

अगोदर नायरा कंपनीने 3 ऑक्टोबर रोजी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता जियो बीपीनेही पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ केली. नायरा आणि जियो बीपीने वाढवलेल्या दरानंतर सरकारी तेल तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ केली नाही. सरकारी तेल कंपन्यांही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्याची शक्यता आहे.

इराण आणि अमेरिका युद्धापासून सरकारी तेल कंपन्यांवर मोठा ताण आहे. सरकारी तेल कंपन्यांनी मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 7.50 प्रति लीटर वाढ केली होती. देशात एक लाखपेक्षाही अधिक पेट्रोल पंप 90 पेक्षा जास्त सरकारी तेल कंपन्यांच्या नियंत्रणात आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलरच्या आसापास गेल्या आहेत. त्यातच साैदी अरेबियाच्या जहाजावर मोठा हल्ला हूतींनी केला.

त्यानंतर पुन्हा तणाव वाढला. सोमवारी ब्रेंटच्या किंमती 103.63 च्या आसपास पोहोचल्या आहेत. आता सरकारी तेल कंपन्या नक्की किती भाव वाढ करतात, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. जागतिक बाजारातील तणाव कमी होणार नाही तोपर्यंत कच्च्या तेलाच्या किंमती अस्थिर राहणार आहेत. आगामी काळातील निवडणुका लक्षात घेता, अमेरिका युद्धापासून दूर राहणार आहे.

Follow Us
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?