AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुहागरमध्ये वृद्धाच्या मृत्यूप्रकरणी शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांसह चौघांवर गुन्हा, नेमकं काय घडलं?

जमिनीच्या व्यवहारातून सुरू झालेल्या वादाने गुहागरमध्ये गंभीर वळण घेतले आहे. वृद्धाला मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यूपूर्वी वृद्धाने धमकीची चिठ्ठी लिहून ठेवल्याचा दावा मुलाने केला आहे.

गुहागरमध्ये वृद्धाच्या मृत्यूप्रकरणी शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांसह चौघांवर गुन्हा, नेमकं काय घडलं?
guhagar land dispute elderly man death case shiv senaImage Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 24, 2026 | 11:09 PM
Share

कृष्णकांत साळगावकर, टीव्ही९ मराठी प्रतिनिधी :  गुहागरमध्ये जमिनीच्या व्यवहारातून वृद्धाला जीवन संपविण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यानुसार शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष जैतापकर आणि शिंदे गटाचे गुहागर तालुका सचिव संतोष आग्रे यांच्या सह दोघांच्या विरोधात गुहागरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडिलांवर दबाव टाकून जीवन संपविण्यासाठी प्रवृत्त केल्याचा मुलाचा आरोप केला आहे. मृत्यूपूर्वी धमकीची चिठ्ठी लिहून ठेवल्याचा फिर्यादीने दावा केला आहे.

जमिनीच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातून एका वृद्धाला मानसिक त्रास देत जीवन संपविण्यासाठी प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी गुहागर तालुक्यातील चार जणांविरोधात जीवन संपविण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे गुहागर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांत दाखल झालेल्या फिर्यादीनुसार,गोणवली-कुंभारवाडी येथील यशवंत महादेव कुळे (वय ६६) यांचा जमिनीच्या व्यवहारावरून काही जणांशी वाद सुरू होता. संबंधित सामाईक जमिनीच्या व्यवहारात आपल्या नावाचा समावेश करून देण्यासाठी वारंवार तगादा लावला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या दबावामुळे आपले वडील मानसिक तणावाखाली होते. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आरोपींकडून दिलेल्या धमकीबाबतची चिठ्ठी लिहून ठेवली होती, असा दावा फिर्यादीने केला आहे. त्यानंतर ७ नोव्हेंबर २०२६ रोजी राहत्या घरी गळफास घेऊन यशवंत कुळे यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी मृताचे पुत्र नरेश यशवंत कुळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुहागर पोलीस ठाण्यात २१ नोव्हेंबर २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०८ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पराग कोळवणकर (रा. पडवे), संतोष जैतापकर (रा. नरवण), संतोष आग्रे (रा. तवसाळी) आणि दीपक पालशेतकर (रा. पालशेत) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जमिनीच्या व्यवहारातून सुरू झालेला वाद एका वृद्धाच्या मृत्यूपर्यंत पोहोचल्याने या प्रकरणाची चर्चा गुहागर तालुक्यात सुरू झाली आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता पोलीस तपासातून स्पष्ट होणार असून, संबंधित आरोपीची चौकशी गुहागर पोलीस करत आहेत.

Follow Us
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर...
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं...- CM फडणवीस
Sharad Pawar : शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून शेखर निकम आक्रमक
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचं विधान...
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद देण्याची तयारी