AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनील तटकरेंचा मोठा गेम; संवाद मेळाव्यातून भाजप-शिंदे सेनेला दिला धक्का, शेकडो कार्यकर्ते…

खोपोलीत शिंदेसेना आणि भाजपला पक्षप्रवेशाचा धक्का? दोन्ही पक्षांतील सुमारे 100 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशामुळे रायगडच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

सुनील तटकरेंचा मोठा गेम; संवाद मेळाव्यातून भाजप-शिंदे सेनेला दिला धक्का, शेकडो कार्यकर्ते...
NCP Poltics Khopoli NewsImage Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 24, 2026 | 11:31 PM
Share

संतोष गोतार्णे टीव्ही९ मराठी प्रतिनिधी : खोपोलीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या संवाद मेळाव्यात मोठा पक्षप्रवेश झाला आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या सुमारे 100 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशामुळे खोपोलीसह कर्जत-खालापूरमधील राजकीय घडामोडींकडे लक्ष लागले आहे.

नेमकं काय घडलं?

रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचा संवाद मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षातील सुमारे 100 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना पक्षसंघटना मजबूत करण्याचे आवाहन केले. या पक्षप्रवेशामुळे खोपोलीसह कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सुप्रिया ताईंच्या वक्तव्याचं पुन्हा स्वागत करीन

खोपोली रायगड: सुनील तटकरे on डीलिमिटेशनवरून सुप्रिया सुळेंचं स्वागत केलंय मग भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र दिसतील का या प्रश्नावर यावेळी सुनील तटकरे यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की,  मी मत स्पष्ट केलं, आताही करतोय, संसदेमध्ये येणारं विधेयक त्या संदर्भामध्ये सुप्रिया ताईंनी केलेले वक्त्यव्य याचं मी मनापासून स्वागत केलंय.

विलीनीकरणाचा कुठलाही मुद्दा आज आमच्या सर्वांच्या समोर नाही. आम्ही सर्व जण आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनी पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष मजबूत करणं, संघटित करणं, जनतेपर्यंत पोहोचणं, शेतकऱ्यांपर्यंत जाणं याच विषयावरती कार्यक्रम घेऊन पुढच्या कालावधीमध्ये वाटचाल करणार आहोत, असं यावेळी तटकरेंनी स्पष्ट केलं.

ते पुढे म्हणाले की,  जे विधेयक आता येतंय त्या मध्ये ५० टक्के जागा समान वाढणार असतील, लोकसंख्येचा विचार न करता प्रत्येक राज्यातली संख्येच्या ५० टक्के आरक्षण दिलं जात असेल, तर त्याला पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा राहील हे विधान सुप्रिया ताईनी केलं आहे. सुप्रियाताई लोकसभा खासदार आहेत, राज्यसभे मध्ये त्यांनी काम केलं आहे, उत्कृष्ट संसदपटू आहेत; त्यांच्या या विधानाचं मी पुन्हा एकदा स्वागत करीन एनडीएचा घटक म्हणून. एनडीएचा क्रांतिकारी निर्णय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतला जातोय, असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर...
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं...- CM फडणवीस
Sharad Pawar : शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून शेखर निकम आक्रमक
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचं विधान...
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद देण्याची तयारी