जग हादरलं! सौदी अरेबियाच्या तेल प्रकल्पासह विमानतळावर हल्ले, भारतीयासह थेट इतके लोक..
Saudi Arabia Dammam Airport Aramco Oil Facility Attacked : सौदी अरेबियात तणाव अधिक वाढताना दिसत आहे. स्थिती गंभीर आहे. मोठे हल्ले केले जात आहेत. त्यातच पुन्हा हुथींकडून हल्ला करण्यात आला. त्यानंतर विमान कंपन्यांनी थेट आपली मार्ग बदलल्याची माहिती मिळतंय..

सौदी अरेबियात परिस्थिती अधिक भीषण होताना दिसत आहे. पुन्हा एका विमानतळ आणि तेल प्रकल्पावर भीषण हल्ले करण्यात आली. ज्याने एकच मोठी खळबळ उडाली. या हल्ल्यात तब्बल 3 जणांचा जीव गेला तर अनेकजण गंभीर जखमी आहेत. यात एका भारतीय व्यक्तीचाही समावेश असल्याची माहिती मिळतंय. मध्यरात्री दम्माम शहरातील किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा हल्ला करण्यात आला. सौदीच्या जनरल अथॉरिटी ऑफ सिव्हिल एव्हिएशनने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत तब्बल 10 जण गंभीर जखमी झाले. हुथी बंडखोर थैमान घातलाना दिसत आहे. अनेक विमान कंपन्यांनी सौदी अरेबियाची आपली सेवा बंद केली. इराणचे समर्थन असलेल्या हुथी बंडखोरांनी हा हल्ला केल्याचे सांगितले जातंय. मात्र, त्यांच्याकडून काहीच प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
21 ऑक्टोबर रोजी सौदी अरेबियाच्या शायबाह तेल क्षेत्रात ड्रोन आढळून आले. या घटनेत काही व्यक्ती जखमी आढळून आले. त्यात नेपाळ, फिलिपिन्स आणि भारतीय नागरिकाचा समावेश आहे. विमानतळावर रात्री उशिरा झालेल्या हल्ल्यात एक सौदी नागरिक ठार झाला. यासोबतच विमानतळाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळतंय. सौदीने नक्की किती नुकसान झाले याबाबत माहिती दिली नाही.
जागतिक विमान ट्रॅकिंग सेवा फ्लाईटराडार 24 ने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले की, रात्रीच्या वेळी अनेक विमानांचे मार्ग बदलण्यात आले. कधीही आणि कोणत्याही क्षणी विमानतळांवर हल्ले होऊ शकतात, यामुळे विमान कंपन्या अलर्ट मोडवर आहेत. किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पर्शियन आखाताजवळ आणि बहरीन व कतारच्या जवळ स्थित जवळ हल्ले करण्यात आलीत.
याआधीही सौदी अरेबियातील प्रमुख विमानतळांना हुथी बंडखोरांकडून टार्गेट करण्यात आले. स्थिती अधिक गंभीर जखमी होत आहे. मागील काही दिवस शांतता बघायला मिळाली. आता पुन्हा हल्ले सुरू झाली आहेत. अनेक भारतीय विमान कंपन्यांनी पुढील काही दिवसांसाठी सौदी अरेबियातील विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. इराणचे समर्थक हुथींकडून ही हल्ले केली जात आहेत.